सुफी व स्टील ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे दुसरे ऑटोमोटिव्ह स्टील संमेलन संपन्न

Author: Share:

स्टील आणि ऑटोमोटिव्ह उद्योगातून ३०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

पुणे, १५ सप्टेंबर २०१७: पाचवे जीपीसी संमेलन आणि तिसर्या स्टील लॉंग प्रोडक्ट्स संमेलनाला मिळालेल्या उदंड प्रतिसाद आणि यशानंतर स्टील ग्रुप आणि सुफीतर्फे आज हॉटेल वेस्टीन, पुणे येथे दुसरे ऑटोमोटिव्ह स्टील संमेलन आयोजित करण्यात आले. प्रमुख स्टील उत्पादक, ऑटो कंपन्या, ऑटो विक्रेते, उपकरणे आणि तंत्रज्ञान पुरवठादार आणि मोठे स्टील वितरक यांनी ऑटोमोटिव्ह संमेलनात भाग घेतला. चार वेगवेगळ्या देशांतील स्टील आणि ऑटोमोटिव्ह उद्योगातील ३०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री, निकुंज तुराखिया, स्टील युजर्स फेडरेशन ऑफ इंडिया (सुफी)चे अध्यक्ष म्हणाले की “दुसरे ऑटोमोटिव्ह स्टील संमेलन म्हणजे स्टील मिल्स आणि ऑटो कंपन्यांना त्यांच्या विक्रेत्यांसोबत एकच मंचावर आणण्यासाठी हा एक प्रयत्न आहे. ऑटो इंडस्ट्रीची वाढ ही ’मेक इन इंडिया’साठी मेक इन स्टील हा थेट प्रमाणबद्ध अजेंडा आहे. म्हणूनच या अजेंडाला पुढे घेऊन जाण्यासाठी चर्चासत्रांची आवश्यकता आहे. मेक इन इंडिया आणि ऑटोमोबाइल क्षेत्रावर पॅनेल चर्चा झाली आणि दुचाकी आणि चारचाकी इंडस्ट्रीससाठी उच्च शक्ती स्टीलवर सुद्धा चर्चा झाली.
श्री संजय जयराम (कार्यकारी उपाध्यक्ष – जेएसडब्ल्यू स्टील), श्री पवन विज (महाव्यवस्थापक – पेंट शॉप, व्होक्सवॅगन इंडिया), श्री संजीव रघुवंशी (स्टील स्ट्रिप्स व्हील्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक), श्री. एस कुमारगुरुपरन (सॉर्सिंग ऍंड सप्लाय चेन, अशोक लेलॅंड), श्री. सत्यजिथ महोपात्रा (जीएम – ऍप्लिकेशन इंजिनियरिंग, एस्सर स्टील इंडिया लिमिटेड), श्री. सी. सॉंग, एचओडी ऑटो ऑफ पीओएससीओ आणि श्री. संजय गुप्ता – अमीरात स्टील, अबू धाबी असे उद्योग क्षेत्रातील काही दिग्गज मंडळी यावेळी उपस्थित होते.

ऑटोमोटिव्ह कंपन्या, स्टील इंडस्ट्री, ऑटोमोटिव्ह अँसीरी सप्लायर्स, टेक्नॉलॉजी अॅण्ड इक्विपमेंट सप्लायर्स, कन्सल्टंट्स, ट्रेडर्स, सप्लाई आणि लॉजिस्टिक कंपन्या, वित्तीय संस्थांनी सुद्धा या संमेलनात भाग घेतला. भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योग स्टीलचा वापर करणारे सर्वात मोठ्या क्षेत्रांपैकी एक आहे, जे देशांतर्गत उत्पादन आणि आयात दोन्ही मार्गांवर उपलब्ध आहे.

(सुफी) स्टील युजर्स फेडरेशन ऑफ इंडियाबद्दल

सुफी हा एक महासंघ आहे, जो भारतातील स्टील मिल्स, स्टील वापरकर्ते, स्टील ट्रेडर्स, स्टील ब्रोकर्स आणि स्टील सेवा प्रदाते असे स्टील जगतातील सर्व भागधारकांचे प्रतिनिधीत्व करतो. सर्व भागधारकांना एकाच मंचावर आणणे हा सुफीचा मूळ उद्देश आहे. ज्यामुळे स्टील मंत्रालयाने सध्याचे स्टील धोरण निर्धारित केल्याप्रमाणे लक्ष्य गाठण्यासाठी क्रमबद्धपणे पुढे जाता येऊ शकेल. हे उद्दिष्ट भागधारकांमधील अविरत संवाद घडवून आणून आणि धोरणात्मक समस्यांवर सरकारशी एकत्रित चर्चा करुन साध्य करता येऊ शकते. स्टीलचे नवीन अनुप्रयोग, नवीन गुण परिचय आणि नवीन संशोधन आणि विकार यासंबंधी स्टील जगतातील लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे. हे केवळ सेमीनार आणि परिषदांद्वारे शक्य आहे. हे सर्व उद्देश पूर्ण करण्याच्या दृष्टीने विविध संमेलन, परिषद आणि सेमीनार आयोजित करण्यासाठी स्टील ग्रूप सोबत संबद्ध झाल्याबद्दल सुफीला अभिमान वाटत आहे. स्टील वापरामध्ये ऑटोमोबाईल्स हे एक वेगळे आणि महत्वपूर्वक घटक आहे.

Previous Article

नांदगाव-येथील महाविद्यालयात अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय

Next Article

१५ सप्टेंबर

You may also like