Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

‘स्पायडर मॅन’ चे पिता स्टेन ली वयाच्या ९५व्या वर्षी कालवश 

Author: Share:
जगप्रसिद्ध कार्टून सुपरहिरो स्पायडरमॅन ची निर्मिती करणारे पिता स्टेन ली (स्टॅनली लिबर) यांचे वयाच्या ९५व्या वर्षी निधन झाले. १९६० मध्ये त्यांनी टायटन ह्या त्यांच्या कॉमिक पुस्तकात स्पायडरमॅन हे सुपरहिरो कार्टून जन्माला घातले होते. स्पायडरमॅन सोबत इनक्रेडिबल हंक आणि फँटॅस्टिक फॉर हि पात्रेही त्यांनी निर्माण केली.
कॉमिक ह्या पुस्तकप्रकाराला त्यांनी मान्यता मिळवून दिली. मार्वल ह्या कंपनीसाठी त्यांनी काम करायला सुरुवात केली, आणि ते तिचे प्रकाशकही बनले. ह्याच मार्वल पब्लिकेशनने टायटन कॉमिक पुस्तके काढली. “माणसाला त्याच्या आयुष्यापेक्षा भव्य अशा गोष्टींचे नेहमी आकर्षण असते , आणि त्या बद्दलचे त्याचे प्रेम कमी होत नाही” असे त्यांचे म्हणणे होते.
त्यांचे मूळ नाव स्टॅनली मार्टिन लिबर. त्यांचा जन्म २८ डिसेंबर १९२२ ला न्यू यॉर्क मध्ये झाला. ते तरुण वयात कॉमिक कंपनीत काम करू लागले. कंपनीचा डायरेक्टर कंपनी सोडून निघून गेल्यावर ती कानोकानी तरुण वयातच त्यांच्या हाती आली. ह्याच कंपनीचे नाव त्यांनी मार्वल असे ठेवले. सुरुवातीच्या काही प्रयत्नांनंतर १९६० मध्ये त्यांना आपल्या सुपर हिरोंचा सूर गवसला, आणि त्यांचे सुपर हिरो आणि ते लोकप्रिय ठरले. १९८० नंतर कॉमिकचा सेल घटला आणि कंपनीची वाताहत झाली आणि ते बाहेर पडले. नंतर ते त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपनीत डीसी मध्येही काम करत होते, ज्या कंपनीने सुपरमॅन, बॅटमॅन ही पात्रे निर्माण केली होती. नंतरच्या काळात ते इंटरनेट वर प्रोजेक्ट करीत होते.
त्यांच्या सुपरहिरोंचे वैशिष्ट्य होते की ती आधी माणसे असायची आणि नंतर सुपरहिरो. आपल्यातील वैगुण्यावर मात करण्यासाठी किंवा अशा काही कारणांतें ती सुपरहिरो व्हायची. त्यामुळे लोकांना ती अधिक आवडतात.
त्यांच्या सुपरहिरोवर आज हॉलिवूड मध्ये सिनेमे निघाले आहेत जे ब्लॉकब्लस्टर ठरले आहेत.
Previous Article

स्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल

Next Article

Review: आरण्यक: एक मंत्रानुभव

You may also like