राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला . यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली . 91.46 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 86.51 आहे.
बारावीप्रमाणे दहावी परीक्षेतही कोकणच अव्वल ठरला आहे. कोकणचा निकाल 96.18 टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.
सकाळी 11 वाजता दहावीचा निकाल जाहीर झाला तर दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतो आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका 24 जून रोजी दुपारी 3 वाजता शाळेत मिळेल, असं बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हामणे यांनी सांगितले आहे.
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा 18 जुलैपासून होणार असल्याची माहिती बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली.
विभागनिहाय निकाल
कोकण -96.18 टक्के
कोल्हापूर – 93.59 टक्के
पुणे – 91.95 टक्के
मुंबई – 90.09 टक्के
औरंगाबाद – 88.15 टक्के
नाशिक – 87.76 टक्के
लातूर – 85.22 टक्के
अमरावती – 84.35 टक्के
नागपूर – 83.67 टक्के