स्पर्धेच्या माध्यमातून झुंजने साधला चिमुकल्यांशी संवाद…

Author: Share:

कल्याण तालुक्यातील दहिवली गावात झुंज प्रतिष्ठानने विद्यार्थ्यांसाठी रोगप्रतिकारक लस देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी ५४ विद्यार्थ्यांना रोगप्रतिकारक लस देण्यात आली. तसेचं विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, निबंधस्पर्धा व बुद्धीमत्ता चाचणी घेण्यात आली.

आजची तरुणाई सजग आहे. सामाजिक कार्यात ती अग्रेसर असते. ग्रामीण भागाकडे ती वळली तर इथल्या मातीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया यावेळी दक्ष प्रकल्पाचे प्रमुख सोमनाथ राऊत यांनी दिली. तर मंगेश किंजावडे यांनी विशेष सहकार्य केले .

झुंज प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात डॉ. दिनेश ठाकर, शिवाजी पाटील, कैलास भोईर, हर्षल भगत, निखिल भोईर, दिनेश लोहकरे, कमलाकर राऊत, आनंद खरे, रूपेश पठारे, संदीप लांडे, विकास म्हारसे, सुदर्शन मिरकुटे, राहुल हरिभाऊ, रविराज राउत, हरिचंद्र राऊत, लक्ष्मण राउत, योगेश राउत, प्रेम राउत, विशाल मिरकुटे, महेश राउत, अजय मिरकुटे, नयन मिरकुटे हे शिलेदार सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous Article

सेना भाजप युती महत्वाची

Next Article

मराठा मोर्चाच्या वतीने आज लासलगाव दिवस भर कडकडीत बंद

You may also like