सोशल मीडियाचा वापर जरा जपूनच

Author: Share:

सोशल मीडिया एक अवलिया शब्द. या शब्दाचा अर्थ समाजकेंद्रित वाटत असला तरी बहुतेक वेळा तो आत्मकेंद्रित असतो. आज घरात व मनात वाऱ्यासारखा हा शब्द विसावला आहे. सुरवातीला या माध्यमातून हजारो दुरावलेली नाती एकत्र आली. आता तर सोशल मीडियाशी समाजाची एक प्रकारची बांधिलकीच झाली आहे. सोशल मीडिया तारक की मारक हा जरी वादाचा मुद्दा असला तरी तो जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे हे मात्र निश्चित. त्याच्या वापराबाबत मतमतांतरे असू शकतात.
प्रेम हा खर पाहिलं तर खाजगी विषय मात्र आज सोशल मीडियावर त्याचा बाजार पहावयास मिळत आहे.

एकांतात असताना फेसबुक, व्हॉट्सऍप वर एकमेकांशी प्रेमाचा संवाद हा तर जणू आज एक ट्रेंडच झाला आहे. त्यामुळे घराघरात संशयनाट्य सुरू आहे. सेलिब्रिटिनी तर या माध्यमाचा चोथा केला आहे. घटस्फोट, दुरावा, प्रेमभंग याची राजरोस चर्चा होते. फ़ॉलो, लाईक्स, फ्रेंड, अनफ्रेंड, जॉईन, निकनेम, आयडॉल हे शब्द सहज प्रचलित होत चालले आहेत.

सोशल मीडियाच्या जाळ्यात केवळ तरुण पिढीच नव्हे तर स्त्रिया, जेष्ठ नागरिक देखील अडकत चालले आहेत. वेळ घालविण्यासाठी एक प्रभावी साधन म्हणून त्याच्याकडे आज पाहिले जात आहे

. बस, शाळा, मंदिर, बगीचा, घर, नोकरीचे ठिकाण, सभास्थान, स्मशानभूमी काहीही त्याला अपवाद राहिलेले नाही. माणूस हा जरी सामाजिक प्राणी असला तरी सोशल मीडिया हा काही त्याच्या जीवनाचा मुख्य दुवा आहे असे कसे म्हणता येईल?


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


आज घरचा कर्ता पुरुष थकून भागून घरी येतो काय चित्र दिसते? घरची सर्व मंडळी टीव्ही समोर बसलेली असतात. आता तर सायंकाळी सात ते साडे दहा सलग मालिकेत रममाण होणारी मंडळी काही कमी नाहीत. सोशल नेटवर्किंग मुळे आज बरेचजण नेटच्या संपर्कात असतात. ग्रामीण भागात देखील त्याची क्रेझ वाढतच चालली आहे. अनेकजण फेसबुक, व्हॉट्सऍप, ट्वीटर वर पहाटेपासून असतात. रात्री झोप पण घेत नाहीत. नवनवीन माहिती स्त्रोत उपलब्ध होतात त्यामुळे अपडेट राहणे सहज शक्य होते.

सोशल मीडिया वापराचे स्वातंत्र्य हा नक्कीच प्रत्येकाचा हक्क आहे मात्र घटनेने त्याच्या काही मर्यादा देखील स्पष्ट केल्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आज सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे अनेक मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. वादग्रस्त पोस्ट टाकल्या जात असतील. त्यावर कोणतेही निर्बन्ध नसतील तर माणसा माणसात संवाद कसा निर्माण होईल.

मला असे वाटते की ज्या पॉर्न साईटमुळे समाज बिघडत चालला आहे त्याच्यावर कडक निर्बन्ध आणण्याची गरज आहे. त्यासाठी सोशल मीडियाच्या कायद्यात योग्य ते बदल केले पाहिजेत. संकेतस्थळानी देखील स्वनिययंत्रण पाळले पाहिजे. बोगस अकौंट वर कडक कारवाई झाली पाहिजे. डीपी, स्टेटस, सेल्फी, ट्विट, ओ एम जी हे शब्दच नवीन आहेत. जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी तयार झालेले हे माध्यम. आज खर तर येणारे संदेश ही एक डोकेदुःखी मानावी लागेल. कोणीही काहीही लेखन करते त्याची सत्यासत्यता न पडताळता ते लेखन जसेच्या तशे पुढे पाठवले जाते. त्यातून कुणाच्या तरी भावना दुखावतात. कोणाचातरी अपमान होतो यास कोण जबाबदार? सोशल मीडियावर खूप काळ राहणारी माणस एकटेपणाच आयुष्य जगतात.

सोशल मीडिया हा केवळ तरुणांसाठी नसून तो सर्व वयोगटातील व्यक्तीसाठी आहे. प्रत्येकाचे बघण्याचे कल वेगवेगळे आहेत. या मीडियाचा योग्य वापर केला तर 90 ते 95 टक्के अचूक मार्केटिंग करता येते. इंटरनेटच्या अति वापरामुळे गुन्हेगारीला रोखण्याचे मोठे आव्हान आज उभे राहिले आहे. फ्रेंड रिक्वेस्ट हा एक सापळा असू शकतो. अनोळखी व्यक्तीची रिक्वेस्ट स्वीकारणे केव्हांही धोक्याचे ठरू शकते.

आपली माहिती किंवा छायाचित्रे सरसकट सार्वजनिक करून चालत नाही. हे माध्यम जेवढे प्रभावी आहे तेवढेच ते धोकादायक व जीवघेणे आहे. घरातील मुले हे माध्यम हाताळत असताना पालकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. वेगळा पासवर्ड देऊन मुले अश्शील मजकूर जतन करून ठेऊ शकतात.

आजची पिढी खूप हुशार आहे. अगदी शाळेत नुकतीच जायला लागलेली मुले मुली सुद्धा मोबाइल सराईतपणे हाताळू लागली आहेत. त्यामुळे सोशल मीडिया हाताळत असताना सर्वांनी सजग राहण्याची गरज आहे.

लेखक: प्रदीप जोशी विटा
मोबाईल.. 9881157709


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


Previous Article

गोळाफेकचा थरार

Next Article

नावीन्याच्या शोधातून जगणे अधिक परिपूर्ण

You may also like