कमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय!!

Author: Share:

मराठी माणूस उद्योगात का उतरत नाही यांचे एक कारण देताना तो म्हणतो, “भांडवल नाहीये!”.. आत्ता आम्ही तुमच्यासमोर असे काही उद्योग प्रस्तुत करतो, जे अगदी कमी भांडवलात सुद्धा जमून जातील . उद्योग करण्यासाठीपैसा नाही, जिद्द आणि इच्छाशक्ती हवी. तरीही भांडवल हा तुमचा प्रश्न असेल, तर बघा खालील उद्योग! हे व्यवसाय घरच्या घरी किंवा कुठल्याही लहान जागेत कमीत कमी भांडवलावर सुरु करता येण्यासारखे आहेत.

कमी भांडवलात करता येण्यासारखे व्यवसाय

१. डबे पुरवणे 

अनेक महिला आणि बचत गट हे व्यवसाय करीत आहेत. डबे पुरवणे हा एक उत्तम जोडव्यवसाय आहे. तुमच्या आजूबाजूच्या ऑफिसमध्ये मार्केटिंग करता येईल.

भांडवल : १०,०००/-

मनुष्यबळ: सुरुवातीला एकटीने किंवा बचत गटातील महिलांना काम सुरु करता येईल. डबे पुरवण्यासाठी एखाद्या मुलाला ठेवता येईल. जास्त डबे असतील तर डबेवाल्यांची मदत येईल.

स्थिर भांडवल: शेगडी, भांडी, शेफ चे कपडे, जेवणाची उपकरणे, स्वच्छतेची उपकरणे

खेळते भांडवल: कच्चे अन्न, डबे, इतर साधनसामग्री

साधारणत: गुंतवणुकीचा परतावा मिळण्याचा कालावधी: १ वर्ष

२. केटरिंग व्यवसाय:

बे पुरवण्यापलीकडे जाणे म्हणजे जेवण पुरवणे. यामध्ये रोजचे जेवण आणि रेस्तरॉ प्रमाणे जेवण पुरवणे यांचा समावेश होतो. मात्र यासाठी तुमच्याकडे फूड आणि ड्रग्स संचालनालयाचे लायसन्स असणे आवश्यक आहे.

या व्यवसायाला खूप मागणी आहे. लोकांकडे पैसा असल्याने पूर्वीपेक्षा हॉटेलिंग वर अधिक पैसा खर्च होऊ लागला आहे. दुसरीकडे थकाथकीच्या दिवसानंतर घरी येउन जेवण बनवणे नकोसे वाटते. अशा वेळी रोज किंवा काही ठराविक दिवशी तुमच्याकडे जेवणाची ताटे मागवली जाऊ शकतात. त्यातून तुम्ही घरगुती जेवण देत असल्याने ते अधिक रुचकर आणि पौष्टिक असेल. त्यामुळे तुम्च्याकासे येणारी पावले वाढतील.

३. घरगुती सेवा- एकच छताखाली (होम युटीलिटी सर्विसेस) 

प्रत्येक घराला इलेक्ट्रीशिअन, प्लंबर, पेंटर आणि कार्पेंटर यांची आवश्यकता असतेच. मात्र योग्य वेळी योग्य माणूस मिळेलच असें नाही. विशेषतः घर बदलून येणार्यांना आणि नवीन घर घेऊन भागात येणार्यांना अधिक सतावतो.

अशा वेळेस जर तुम्ही यातील कुठलीही एक किंवा सर्व सेवा एकत्र देऊ शकत असाल तर तुमचे फोन दिवसभर खणखणतील. तुम्ही अनेक सेवा देणार्यांना एकत्र करून एक ग्रुप किंवा असोसिएशन बनवू शकता.

भांडवल: साधारण १०,०००/-

स्थिर भांडवल: वापरावयाचे सामान, तुमच्या सेवेच्या नावाचा लोगो असणारे विशिष्ट कपडे.

खेळते भांडवल: मार्केटिंग साठी आणि लहान सहन वस्तू मार्केट मधून आणण्यासाठी एक मुलगा.

४. गिफ्ट वस्तू

भारत हा सणासुदीचा देश. आपण उत्सवप्रिय माणसे! अर्थात आपल्या आप्तजनांना विविध वस्तू गिफ्ट म्हणून देण्याची आपल्याकडे परंपरा आहे. देणार्याच्या क्षमतेनुसार १०० रुपयापासून १०००० पर्यंत काहीही वस्तू गिफ्ट म्हणून देत येऊ शकते. त्याचबरोबर उद्योगपती आपले क्लायनट्स, उद्योगातील सहकारी, विक्रेते यांना चांगले संबंध म्हणून गिफ्ट्स देत असतात.

त्यामुळे गिफ्ट वस्तू पुरवणे यासारखा व्यवसाय भारतात नाही. यात विशिष्ट व्यवसायासाठी भेटवस्तू त्या कंपनीच्या ब्रान्डींगने करून देणे हा महत्वाचा भाग आहे. अनेक कंपन्या अशा भेटवस्तू मोठ्या प्रमाणात देत असतात. विशेषतः दिवाळीच्या सुमारास. त्याचप्रमाणे एखाद्या कंपनीच्या २५ वर्षे पूर्ण होणे, ५० वर्षे पूर्ण होणे अशा विशिष्ट समायासही भेटवस्तू दिल्या जाऊ शकतात.

या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी दोन गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे, एक प्रचंड सृजनशीलता- काय नवीन काय वेगळे आपण सुचवू शकतो, मार्केटचा अभ्यास आणि दुसरे म्हणजे मोठ्या प्रमाणात स्टोक देण्यासाठी भरवशाचा विक्रेता पाठीशी असणे.

गिफ्ट वस्तुंमध्ये चोक्लेत्स पासून ते लहान मोठी इलेक्ट्रोनिक उपकरणे आणि पाठीवरच्या बॅगांपासून हातातील नक्षीदार पिशव्या यापर्यंत काहीही असू शकते.

भांडवल : साधारण : २०-२५,०००

खेळते भांडवल: मार्केटिंग, मार्केट फिरण्यासाठी मुलगा, जमल्यास एखादी रिक्षा आणि गाडी.


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 


४. ऑफिस स्टेशनरी

प्रत्येक ऑफिसला स्टेशनरीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. यात बेगांपासून स्टेपलर पिनांपर्यंत आणि नोटपेड पासून ते हाउसकिपिंनग च्या सामानापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात यादी आहे. महाराष्ट्रात विशेषतः मुंबई ठाण्यात लहान मोठी अनेक ऑफिसेस आहेत. त्यांना लागणाऱ्या स्तेशनरीचे प्रमाण किती असेल याचा अंदाज लावा.

भांडवल: साधारण: २०-२५,०००/-

स्थिर: तुमच्या ब्रँड च्या टोप्या, बिझनेस कार्ड, ब्रोशर.

खेळते: मार्केटिंग, मार्केट फिरण्यासाठी मुलगा, जमल्यास एखादी रिक्षा आणि गाडी. तसेच थोडाफार माल तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

५. इंडस्ट्रीला लागणारी उपकरणे 

हा थोडासा विशेष प्रविण्याचा व्यवसाय आहे. प्रत्येक उत्पादकाला मशिनरी, विविध पार्टस इथपासून नट्स, स्क्रू ड्रायव्हर्स, हेल्मेट्स, हातमोजे अशा अनेक लहान मोठ्या गोष्टी लागतात. कंपनी जेवढी मोठी गरज तेवढीच मोठी.

विविध उत्पादकांशी तुमचे चांगले संबंध असणे आवश्यक आहे. ऑफिस स्टेशनरी पेक्षा या व्यवसायाची निकड खूप वेगळी असते . लागणारी वस्तू आज किंवा उद्या हवी असू शकते. त्यामुळे वेळेवर वस्तू पुरवणे अत्यंत आवश्यक आहे.

भांडवल: साधारण: २०-२५,०००/-

स्थिर: तुमच्या ब्रांड च्या टोप्या/कपडे , बिझनेस कार्ड, ब्रोशर.

खेळते: मार्केटिंग, मार्केट फिरण्यासाठी मुलगा, जमल्यास एखादी रिक्षा आणि गाडी

६. टोटल सर्विसेस 

वर उल्लेखलेल्या होम अप्लायन्सेस पेक्षा हि वेगळी सेवा आहे. अनेक लहानसहान घरगुती किंवा व्यवसायाची कामे करण्यासाठी वेळ नसतो- जसे बेन्केची कामे, पोस्टाची कामे. विशेषतः वृद्ध राहत असतील तर त्यांना याची निकड असतेच. त्यामुळे टोटल सर्विसेस हा एक वेगळा सेवा उद्योग होऊ शकतो. दिलीप प्रभावळकरांचा बोक्या कसा समोरच्या आजी आजोबांची कामे करतो, तशाच सेवा तुम्ही देऊ शकता- फक्त पैसे घेऊन, आनंदाने द्यायला तयार असतात. अनेक आजी आजोबांना फक्त वेळ घालवण्यासाठी कोणाची गरज असते. अनेक लहान सहन उद्योगांना वरवरची कामे करून देऊ शकेल असा कोणी हवा असतो. या सर्व्ह गोष्टी टोटल सर्विसेस मध्ये येतात.

भांडवल: भांडवल: साधारण: १०-१५,०००/-

स्थिर: तुमच्या ब्रांड च्या टोप्या/कपडे,बिझनेस कार्ड,

खेळते: मार्केटिंग, दिमतीला एक-दोन मुले.

७. रिअल इस्टेट सल्लागार 

सध्या रिअल इस्टेट चे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र तरीही त्यांची मागणी कमी होत नाही. भाडेकरूंची संख्या वाढते आहे. तसेच अनेक उद्योगांना गाळे, ऑफिसेस हवी असतात. तुम्हाला तुमच्या परिसराची व्यवस्थित माहिती असेल आणि बोलण्याचे चातुर्य असेल तर रिअल इस्टेट एजंट हे मोट्ठे क्षेत्र तुमची वाट पहात आहे .

तुम्हाला स्वतःला फिरावे लागेल आणि तुमच्या परिसरात कुठे काय विकायला किंवा भाड्याने द्यायला उपलब्ध आहे याची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे.

सुरवातीला केवळ तुम्ही, तुमचा बोलघेवडेपणा आणि बिझनेस कार्ड या भांडवलावर हा व्यवसाय तुम्ही सुरू करा. लोकांकडे तुमचा नंबर असेल आणि त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी तुम्ही हजर राहू शकत असाल तर तुम्हाला ऑफिस ची काहीच गरज नाही.

भांडवल- ५ ते १०,०००/-

८. क्लास

तुम्हाला शिकवायला आवडते का? तर क्लास हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला तुमचा विद्यार्थी गट निवडावा लागेल. म्हणजे दहावी पर्यंत, कोलेज- आर्ट्स कॉमर्स सायन्स, त्यापुढे मग आयटी, मास मिडिया, इञ्जिनिअरिङ्ग वगैरे. त्याचप्रमाणे तुम्ही कोम्प्युतर, वेब डिझायनिंग, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, फर्निचर असे विशिष्ट क्लासेससुद्धा घेऊ शकाल.

परकीय भाषा क्लास 

तुम्हाला एखादी परकीय भाषा येत असेल(असतील) तर दुधात साखर. सध्या परकीय भाषांची मागणी विशेषतः जापनीस, चायनीज, जर्मन आणि फ्रेंच वाढत जाणार आहे. त्याचे तुम्ही क्लासेस घेऊ शकता. यात प्रचंड पैसा आहे. तुमच्या क्लास ची उत्तम जाहिरात तुमचे विद्यार्थीच करतात.

सध्या तुमच्या राहत्या घरी तुम्ही क्लास सुरु करा. किंवा एखाद्या क्लास शी टाय अप करून त्याला ठराविक हिस्सा देण्याच्या बोलीवर सुरु करा.

भांडवल: १०-१५,०००/- ते ४०-५०,०००/-

स्थिर: फळा, मार्कर, लेप्टोप, प्रोजेक्टर

खेळते: मटेरिअल

९. सॉफ्ट स्किल 

बाहेरच्या जगात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला पुस्तकी ज्ञानापेक्षासुद्धा अधिक काही वेगळे हवे असते . ते म्हणजे तुमच्यातील विविध किंवा विशिष्ट गुणांचा विकास. यात आंतर मानवी संबंध आले किंवा एखादा विशेष गुण आला. वेळेचे व्यवस्थापन, ऑफिस व्यवस्थापन, सेक्रेटरी सर्विसेस, उद्योगातील आंतर मानवी संबंध व्यवस्थापन, सेलिंग स्किल्स, मार्केटिंग स्किल्स, संवाद (कम्युनिकेशन) अशा अनेकविध गोष्टींचे प्रशिक्षण तुम्ही देऊ शकता.

तुम्ही सध्या उद्योग किंवा नोकरी मध्ये एका चांगल्या हुद्द्यावर असाल किंवा मार्केटिंग, मनुष्यबळ अशा विशेष क्षेत्रात असाल तर तुम्ही हे प्रशिक्षण देऊ शकता. पूर्णवेळ किंवा शनिवार रविवार अशा स्वरुपात हे क्लासेस तुम्ही घेऊ शकता. पूर्णवेळ करणार असाल तर अनेक कंपन्या दोन तीन दिवसांचे कोर्सेस घेण्यासाठी तुम्हाला बोलावू शकतात.

भांडवल: साधारण ४० ते ५०,०००/-

स्थिर वेबसाईट, चांगले कपडे, बिझनेस कार्ड आणि लेप्टोप.

खेळते: स्वतःला अद्ययावत ठेवण्यासाठी विविध सेमिनार्स, मेग्झींस, पेपर यांचे वाचन, पुस्तके यावरील खर्च, मटेरिअल.


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 


१०. सल्लागार

तुम्हाला विशिष्ट क्षेत्राचे ज्ञान आणि अनुभव असेल तर तुम्ही उद्योगांना खालील क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करू शकता-

१. व्यवस्थापन सल्लागार

यासाठी तुमचा विशेष क्षेत्रांचा अनुभव असणे गरजेचे आहे. तुम्हाला व्यवस्थापनातील खाचाखोचा आणि बारकावे, मार्केट, ग्राहक यांचे अद्ययावत ज्ञान असणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमच्या क्लायंट च्या गरजा समजून घेऊन त्यांना सल्ला देत आला पाहिजे.

भांडवल: ४०-५०००० ते ३-५ लक्ष

स्थिर: उत्तम कपडे, लेप्टोप, बिझनेस कार्ड, गाडी

तुमच्या शिक्षणाची आणि अनुभवाची जंत्री जेवढी चांगली आहे तेवध्ये तुम्ही या क्षेत्रात नावारूपाला लवकर याल.

२. मनुष्यबळ सल्लागार 

तुम्हाला जर मनुष्यबळ क्षेत्रातील अनुभव असेल तर हे एक फार विस्तीर्ण क्षेत्र आहे. मनुष्यबळाचे व्यवस्थापन, मनुष्यबळाचा विकास म्हणजे त्यांना ट्रेनिंग देणे आणि विविध मनुष्यबळ पुरवणे म्हणजे एचआर सर्विशेस अशा तीन गोष्टींचा समावेश होतो. तुम्ही एका वेळी एकच गोष्ट निवडणे योग्य आहे.

भांडवल: ४०-५०,०००/-

स्थिर: लॅपटॉप , बिझनेस कार्ड, प्रोजेक्टर

खेळते: विविध कंपन्याशी ओळखी वाढवण्यासाठी सेमिनार्स, विविध चेम्बर्स मध्ये नोंदणी, मटेरिअल, गाडी (असल्यास उत्तम)

३. मार्केटिंग सल्लागार

कुठलाही व्यवसाय मार्केटिंग शिवाय चालू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जर ,मार्केटिंग तज्ज्ञ असाल तर नोकरी सोडून या क्षेत्रात सल्लागार म्हणून काम सुरु करा. मार्केटिंग सल्लागार एखाद्या उत्पन्नाच्या ब्रॅण्डिंगपासून ते त्याच्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचे सल्ले देत असतो. या मध्ये जाहिरात कशी कुठे करावी , किती खर्च करावा, ग्राहकाची नस कशी ओळखावी, काय उत्पादन करावे ते कसे कुठे,विकावे लोगोचा रंग काय असावा, लोगो कसा असावा, तुमच्या उत्पादनाची एक लाइन काय असावी ह्या सर्व गोष्टींचा सल्ला मार्केटिंग सल्लागार देत असतो.

भांडवल: ४०-५०,०००/- ते ३-५ लक्ष

स्थिर भांडवल: उत्तम कपडे, लेप्टोप, बिझनेस कार्ड, गाडी

तुमच्या शिक्षणाची आणि अनुभवाची जंत्री जेवढी चांगली आहे तेवध्ये तुम्ही या क्षेत्रात नावारूपाला लवकर याल.

४. आर्थिक सल्लागार

एलआयसी एजंट किंवा एखाद्या म्युच्युअल फंड कंपनीच्या एजंट पेक्षा हे वेगळे क्षेत्र आहे. यात क्लायंट ची आर्थिक कमाई, क्षेत्र, खर्च या सर्वांचा गोषवारा घेऊन दर महिना किती गुंतवणूक करावी, गुंतवणुकीचे , विशिष्ट ओकेजन साठी पैसे साठवणे अशा सर्व गोष्टींचा सल्ला गुंतवणूक सल्लागार देतो. तो कुठल्याही विशिष्ट कंपनीशी बांधील नसतो.

गुंतवणूक सल्लागार होण्यासाठी फायनान्शिअल प्लानिंग बोर्ड ऑफ इंडिया या सास्न्ठेचा गुतंवणूक सल्लागाराचा कोर्स करणे सयुक्तिक आहे. त्यामुळे तुम्हाला पदवी आणि मान्यता मिळते.

तसेच विविध कर्जे मिळवून देणे, आर्थिक व्यवसाय सांभाळणे हि सुद्धा कामे आर्थिक सल्लागार करू शकतो.

भांडवल: १-३ लक्ष

स्थिर भांडवल: उत्तम कपडे, लेप्तोप, बिझनेस कार्ड, (सुसज्ज ऑफिस)

खेळते भांडवल: ऑफिस, किमान एक मुलगा.

५. पब्लिक रिलेशन/ संवाद सल्लागार 

पब्लिक रिलेशन म्हणजे एखाद्या संस्थेची मते, बातम्या आणि संवाद लोकांपर्यंत पोहोचवणे. तुम्ही जर्नलिझम किंवा पब्लिक रिलेशन मध्ये असाल तर तुम्हाला या क्षेत्रात स्वतःचा ठसा निर्माण येईल. यासाठी तुमच्याकडे कल्पकता, सृजनशीलता आणि ग्राहकांच्या आर्थिक क्षमतेप्रमाणे आणि गरजेप्रमाणे त्याला संवादाच्या, माध्यमाचा सल्ला देता आला पाहिजे.

तुमचे पत्रकार, पत्रकार संघ यांच्याशी चांगले संबंध असणे आवश्यक आहे.

भांडवल: १-३ लक्ष

स्थिर भांडवल: उत्तम कपडे, लेप्टोप, बिझनेस कार्ड,

खेळते भांडवल: किमान एक मुलगा.

महत्वाचे म्हणजे हे सर्व उद्योग सेवा उद्योग असल्याने तुम्ही आणि तुमचे ज्ञान/ कौशल्य हे त्याला लागणारे सर्वात मोठे भांडवल आहे.

११. ऑनलाईन मार्ट:

थोडासा वेगळा आणि आधुनिक जगाची हाक ऐकणारा हा व्यवसाय आहे. फ्लिपकार्ट, एमेझॉन असे शॉपिंग मार्ट तुम्ही ऐकले, पहिले आणि वापरणेही असतील. तसाच एखादा मार्ट तुम्हीही सुरु करू शकता. मात्र मोलाचा सल्ला असा, कि सगळ्याच गोष्टी त्यावर ठेवण्याचा प्रयत्न करू नका. कुठल्यातरी एखाद्या वस्तूत तुमचे स्पेशिअलायझेशन असू द्या!

यासाठी तुम्हाला पहिल्यांदा करून घ्यावी लागेल तुमचे ईकॉमर्स वेबपोर्टल. यासाठी साधारणतः ५०,००० ते ७०,००० पर्यंत खर्च येऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला तुमच्या वस्तू ठरवून, त्या डिस्ट्रिब्युटर्स किंवा उत्पादकांशी बोलावे लागेल. यामध्ये महत्वाचे असते कि तुमच्याकडे वस्तूंच्या बऱ्या प्रमाणात व्हरायटी असणे आवश्यक असते, आणि व्हरायटीच्या किमान १०-१० वाटूनच साठा तुमच्याकडे असणे आवश्यक ठरते. डिस्ट्रिब्युटर्स पकडल्यास असे साठे तुम्हाला मिळू शकतील. उत्पादकांना गाठल्यास तुम्हाला अजून स्वस्त वस्तू मिळतील पण साठा असेलच असे नाही. लक्षात घ्या तुम्ही साठा करण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला अधिक भांडवलाची आवश्यकता असेल, ज्यात जागा आणि महत्वाचे म्हणजे वस्तूंची काळजी हा मोठा भाग येतो.

तुम्ही अशा वेळेस ठराविक प्रॉडक्ट्स आणि त्याचे डिस्ट्रिब्युटर्स गाठून काम करून घेऊ शकता.

दुसरा महत्वाचा भाग म्हणजे वस्तूची डिलिव्हरी. तुमचे प्रॉडक्त्त लहान असल्यास एखाद्या कुरिअर कंपनीशी तुम्ही हातमिळवणी करू शकाल. बऱ्याच कंपन्या आणि पोस्ट सुद्धा ईकॉमर्स साठी वेगळ्या सुविधा देते. मात्र त्यासाठी ठराविक बिजनेस दर दिवशी तुम्ही त्यांना देणे आवश्यक असते. सुरुवातीला ते शक्य होणार नाही, म्हणून थोडा खर्च तुम्हाला सहन करावा लागेल. अर्थात डिलिव्हरी चार्जेस तुम्ही ग्राहकाकडून घेऊ शकता.

भांडवल: १ लक्ष

स्थिर: लहान जागा- ऑफिस कम वेअरहाऊस कम डिस्प्ले

खेळते: ऑफिस क्लार्क


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 


१२.  फॅशन हाऊस

तुम्हाला फॅशन ची भाषा समजते का? लोकांची ड्रेसची रुची तुम्ही समजू शकता आणि त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे तुम्ही लोकांना एखाद्या कपड्यांचे डिझाईन बनवून देऊ शकता का? तर तुम्ही फॅशन मध्ये येऊ शकता.

आजकाल काही शैक्षणिक संस्था तुम्हाला बऱ्यापैकी कोर्सेस या विषयात देतात. यामध्ये पदवीपासून एका वर्षाच्या पदविकेपर्यंत कोर्सेस तुमच्या गरजेप्रमाणे मिळतात. उदा. वरळीच्या सासमीरा मॅनेजमेंट स्कुल मध्ये हे कोर्सेस आहेत.

भांडवल: रु १ लक्ष

स्थिर: ऑफिस जागा/घरातून, एक कॉप्युटर, तुमच्यासाठी लॅपटॉप

खेळते: ऑफिस गर्ल (या विषयातील असल्यास उत्तम)

 १३. नर्सरी आणि लँडस्केपिंग 

तुम्हाला हिरवळ आवडत असेल आणि हिरवळ पसरवणे आवडत असेल तर हा तुमच्यासाठी उत्तम व्यवसाय आहे. यात तुम्हाला जास्त गुंतवणुकीची आवश्यकता नाही. मात्र तुम्हाला उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.

नर्सरी मध्ये तुम्ही उत्तम बीज, रोपे अंबी त्यासाठी लागणारे सामान ज्यात माती, खत, गांडूळखत, कीटकनाशके इ समावेश असतो.

लँडस्केपिंग म्हणजे ज्या कंपन्या किंवा मैदाने किंवा तत्सम मोकळ्या जागेत उत्तम उद्यान फुलवायचे असते, अशांना तुम्ही मदत करता. इथे तुम्ही सेवाही देता आणि वृक्ष, रोपे बिया आणि वस्तू सुद्धा विकता.

मुंबई विद्यापीठाच्या बहिःशाल विभागात यासाठीच कोर्स चालतो.

गुंतवणूक : रुपये ५०,०००

स्थिर: एखादी लहानशी जागा, उत्तम सजवलेली, कॅटलॉग्स, माहितीपुस्तिका इ.

खेळते: एखादा माळी हाताशी असल्यास उत्तम

१४. दुकान

 तुमच्याकडे एखादे लहानसे दुकान असल्यास तुम्ही खालील गोष्टींमध्ये स्पेशिअलायझेशन करू शकता:

१. ऑफिस स्टेशनरी, गिफ्ट आणि स्कुल स्टेशनरी (यात तुम्ही रिटेल सोबत होलसेलशिप घेण्याचा प्रयत्न करा)

२. पक्षी आणि शोभिवंत मासे आणि कुत्रा सांभाळवस्तू: यामध्ये खाणे हा महत्वाचा भाग आहेच. पण सोबत तुम्ही इतर वस्तू सुद्धा ठेऊ शकता. कुत्रा, शोभिवंत मासे  आणि पक्षी सांभाळणारे हौशी कमी नाहीत. ते आपसूक तुमच्याकडे वळतील. अट एकच तुम्हालासुद्धा पशु-पक्ष्यांमधील कळले पाहिजे. यापैकी शोभिवंत माशांमध्ये तुम्हाला रस असल्यास मुंबई विद्यापीठ बहिःशाल विभाग लहान मुदतीचा कोर्स राबवते.

माणसाला आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम करण्याची क्षमता फक्त उद्योगामध्येच आहे. नोकरीपेक्षा व्यवसाय अधिक मानसिक शांती देतो, स्वतःसाठी काम करण्याचे सुख वेगळे असते. आज महाराष्ट्राला श्रीमंत व्हायचे असेल तर उद्योजकतेची कास धरणे आवश्यक आहे. उद्योगाचा विचार करताना मराठी तरुण फारसा दिसत नाही.


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 

Previous Article

ग्राहकांची वैयक्तिक माहिती हॅक करीत असल्याच्या गंभीर संशयावरुन चिनी मोबाईल कंपन्यांना नोटिसा

Next Article

इंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंतिम तारीख : ५ सप्टेंबर

You may also like