Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

सिद्धिविनायक मंदिराची रोमहर्षक कथा

Author: Share:

सिद्धिविनायक या प्राचीन देवळाला १९ नोव्हेंबर १८०१ रोजी बांधण्यात आले. आपल्या हिंदू पंचांगानुसार हा दिवस म्हणजे शके १७२३ च्या दुर्मुख संवत्सरातील कार्तिक सुधा चतुर्दशी. या देवळाच्या बांधकामाचे क्षेत्रफळ .६० मीटर x .६० मीटर होते. त्याची बांधणी तळमजल्याची होती. देवळाला ४५० मिलीमीटरची जाड विटांची भिंत असून जुन्या प्रकारचा विटांचा घुमट त्यावर कळस होता. घुमटाच्या बाजूने लोखंडाची जाळी असलेला कठडा होता. देवळाची रस्त्याची पातळी समान होती.

हे देऊळ काकासाहेब गाडगीळ मार्ग आणि एस के बोले मार्ग या दोन्हींच्या कोपयावर असून त्यासमोर प्रचंड रहदारी असते. स्व. सौं देऊबाई पाटील यांच्या सूचनेनुसार आणि आर्थिक मदतीमुळे व्यावसायिक कंत्राटदार स्व. लक्ष्मण विठू पाटील यांनी या देवळाची बांधणी केली होती. स्व. सौं देऊबाई पाटील या आग्री समाजाच्या एक श्रीमंत व्यक्ती होत्या, पण त्यांना कोणी वारस नव्हता.

प्रार्थनेच्या वेळेस स्व. सौं देऊबाई पाटील यांना देवळाच्या बांधणीची कल्पना सुचली. त्यांनी गणपतीला विनंती केली, “मला मूल होऊ शकत नाही. पण इतर बायका, ज्यांना मूल होत नाही त्यांन मंदिरात येऊन, तुझी प्रार्थना करून मूल लाभावे.” मंदिराच्या यशस्वी इतिहासाकडे पाहता असे वाटते की भगवान गणपतीने देऊबाईंच्या प्रार्थनेला, श्रद्धेला आणि त्यांच्या कार्याला मान्यता दिली आहे. सिद्धिविनायक देऊळ हे भक्तगणांमध्येनवसाचा गणपतीकिंवानवसाला पावणारा गणपती” (नम्र भावनेने केलेल्या प्रार्थनांना गणपती पावतो.) म्हणून प्रसिद्ध आहे.

श्री सिद्धिविनायकाची मूर्ती एका काळ्या दगडामधून कोरून बनवलेली आहे त्याची उंची ” (७५० मिमि) असून रुंदी ‘ (६०० मिमि) आहे. त्याला उजव्या बाजूला सोंड आहे. गणपतीचा हा अवतार जरासा असामान्य आहे. ह्या मूर्तीच्या वरील उजव्या हातात कमळ वरील डाव्या हातात कुहाड आहे आणि खालील उजव्या हातात जपमाळ खालील डाव्या हातात मोदकांची वाटी आहे. मूर्तीच्या डाव्या खांद्यापासून पोटाच्या उजवीकडे पवित्र धाग्याशी समरूप असलेला साप आहे. मूर्तीच्या कपाळावर एक डोळा आहे जो शंकराच्या तिसया डोळ्यासारखा दिसतो. गणपतीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी सिद्धी या देवींच्या मूर्ती अशाप्रकारे ठेवल्या आहेत की त्या गणपतीच्या मूर्तीमागून डोकावत आहेत असे दिसून येते. गणपतीसोबत असलेल्या या दोन्ही देवी हे देऊळ सिद्धिविनायक देऊळ म्हणून जाणले जाते. या दोन्ही देवी पावित्र्य, यश, विपुलता समृद्धी या गोष्टींचे प्रतिक आहे.

साधारणपणे १२५ वर्षांपूर्वी, स्व. रामकृष्ण जांभेकर महाराज, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ यांचे अनुयायी असून ते गणेशभक्तही होते आणि गायत्री मंत्राचे उपासकही होते. त्यांना सिद्धीचा लाभ झाला होता. एकदा स्वामी समर्थांनी त्यांना साया दैवी मूर्ती घेऊन यायला सांगितले. त्यांनी जांभेकर महाराजांना सर्व मूर्तींपैकी दोन मूर्ती वगळता उरलेल्या मूर्ती त्यांचे आणखी एक अनुयायी, श्री चोलप्पा, यांच्या अंगणात, जिथे स्वामी समर्थ काही काळासाठी निवास करीत होते, तेथे पुरायला सांगितल्या.

जांभेकर महाराज गणेशभक्त होते त्यांना गणेशासमोर उरलेल्या दोन मूर्ती पुरायला सांगितले गेले. जांभेकर महाराजांनी स्वामी समर्थांच्या सहवासात असताना असे भाकित केले की त्या जागी २१ वर्षांनंतर मंदार झाड वाढेल, स्वयंभू गणेश त्या पवित्र भूमीवर प्रकट होतील आणि त्यानंतर भक्तगणांच्या श्रद्धेला सीमा उरणार नाही.

काही वर्षानंतर, जांभेकर महाराजांचा मठ मुंबईत दादरच्या समुद्र किनायाजवळ होता. त्यांनी स्व. पुजारी गोविंद चिंतामण पाठक यांना सिद्धिविनायक देवळाची नियमित काळजी घेण्यास पूजा करण्यास साठी नेमले. त्यांच्या आधी स्व. नामदेव केळकर देवळात पुजायाचे काम बघत असत.

उपलब्ध असलेल्या माहिती नोंदींनुसार देवळाचा भाग साधारणपणे २५५० चौ.मी. होता. देवळाच्या पूर्व दक्षिण दिशेला ३० x ४० चौ.मी. आकाराचा तलाव होता, जो १९व्या शतकात नार्दुल्ला यांनी बांधला होता. त्या भागातील पाण्याच्या तंचाईचा प्रश्न सुटावा, म्हणून हा तलाव बांधण्यात आला होता. त्यानंतर तलाव भरला गेला आता तिथे मैदान असून हे काकासाहेब गाडगीळ मार्गाचा भाग आहेत.

तिथे एक प्रकारची धर्मशाळाही होती . इंच उंचीच्या खडकावर काम केलेली दीपमाला होती. तिथे या प्रभागाच्या मालकासाठी राहण्याची जागा सुद्धा होती. पूर्वीच्या काळात या भागात अशा प्रकारची रहदारी व्यावसायिक इमारती फार कमी होत्या. १९५२ नंतर देवळात येणाया भक्तगणांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली १९६५ पासून दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा दिसू लागल्या.

मालकाने देवळाच्या आजूबाजूच्या भागाची विभागणी करून तो भाग विविध लोकांना भाड्याने दिला असल्याने प्रत्यक्ष जून्या देवळाची जागा अत्यंत कमी होऊन फारच लहान झाली. १९७५ नंतर भक्तगणांमध्ये भौमितिक दृष्ट्याही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गणपतीचे दर्शन घेणे सोडा पण देवळात प्रवेश करणेही अवघड झाले. लहान आकाराच्या दरवाज्यातून प्रवेश करण्यास भक्तांना फारच त्रास होऊ लागला. आणि आता हे भव्य मंदिर सर्व सुखसोयीसमृद्ध उपलब्ध आहे.

लेखन: टीम स्मार्ट महाराष्ट्र

 

Previous Article

तेलाची गोष्ट भाग: १

Next Article

सोमवार बाजार

You may also like