Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

शहीद शुभम मुस्तापुरे

Author: Share:

होता एक तू शुरवीर जवान, महाराष्टाच्या या मातीचा
अवघ्या २०व्या वर्षांचा, पण होता निधड्या छातीचा

रक्षण करावे देशाचे, हा एकच निश्चय केला होता
झुंज मोठी लढावया, तू देशासाठी गेला होता

शत्रूंशी लढता लढता, काश्मीरच्या त्या धर्तीवरती
वीरमरण लाभले तुला, आयुष्याच्या अर्ध्या वाटेवरती

एक वीर सुपुत्र गमावल्याचे, दुःख आहे भारतभूमीला
जगण्याचे ते वय तुझे, पण तारुण्यातच तू शहीद झाला

कर्तृत्वाबद्दल तुझ्या या, थोडंसं काहीेे लिहिताना,
दुःख बहु जाहले रे, माझ्या या कवी मनाला

नाव तुझे सदा अमर राहो, या जगी रे
भाग्यवान तू होतास, शुभम मुस्तापुरे

कविता: रोहिदास गो. चौधरी
दातिवरे (पालघर)


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


Previous Article

माझा पाऊस आज गहिवरला

Next Article

स्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार

You may also like