बॉलिवूडची चांदणी श्रीदेवीची अकाली एक्झिट

Author: Share:
आपले सौंदर्य, बोलके पाणीदार डोळे आणि मुलायम आवाजाने आणि अदाकारीने प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी बॉलिवूडची हवाहवाई श्रीदेवीचे रविवारी पहाटे दुबई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ह्या अनपेक्षित बातमीने चित्रपटसृष्टी आणि रसिकांना तीव्र ‘सदमा’ पोहोचला आहे. श्रीदेवीचे वय ५४ वर्ष होते. श्रीदेवी कुटुंबासमवेत लग्नासाठी युएई येथे गेल्या होत्या.
श्रीदेवीने १९६७ मध्ये तामिळ चित्रपट थुनैवन मधून बाललाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी बालकलाकार म्हणून  तामिळ, कन्नड आणि मल्याळम चित्रपट केले. बॉलिवूड मध्ये ज्युली चित्रपटातून बालकलाकार म्हणून त्यांनी एंट्री घेतली. अभिनेत्री म्हणून कमल हसन आणि रजनीकांत यांच्या सोबत मुन्द्रु मुदीचू ह्या चित्रपटात १९७६ मध्ये पदार्पण केले. १९७८ मध्ये सोलहवा सावन चित्रपटातून बॉलिवूड मध्ये अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. १९८३ मधील जितेंद्र सोबतच्या हिम्मतवाला चित्रपटाने त्या स्टार बनल्या. त्यानंतर त्यांनी बॉलिवूड, तामिळ आणि मल्याळम मध्ये अनेक चित्रपट केले. केवळ रसिकांनीच नाही तर समीक्षकांनीही काही चित्रपटांचे भरभरून कौतुक केले. हिम्मतवाला, सदमा, खुदा गवाह, नगिना, आखरी रस्ता, कर्मा, मिस्टर इंडिया ह्या चित्रपटांनी बॉलिवूड मध्ये श्रीदेवीने एक वेगळा ठसा उमटवला.
अनिल कपूर आणि उर्मिला मातोंडकर सोबतच्या जुदाई चित्रपटानंतर त्या चित्रपटापासून दूर राहिल्या. मधल्या काळात छोट्या पडद्यावर त्यांचे दर्शन घडले. २०१२ मध्ये गौरी शिंदे दिग्दर्शित       ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटाने त्यांनी पुनरागमन केले. ह्या पात्राचे समीक्षकांनी आणि रसिकांनी कौतुक केले. सूड उगवणाऱ्या आईचा रोल असलेला ‘मॉम’ हा शेवटचा चित्रपट होता.
श्रीदेवींना २०१३ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.
बॉलिवूडच्या ह्या हवाहवाईला स्मार्ट महाराष्ट्र तर्फे आदरांजली.
Previous Article

स्त्री रक्षण महाजागरासाठी वणीत उसळला जनसागर:बेटी बचाओ अभियानाच्या प्रणेते डॉ राख यांचे जंगी स्वागत

Next Article

सागरमाला प्रकल्पामुळे कोकणातील मच्छिमारांना मोठा फायदा-भुमिपुत्रांना नोकऱ्या – नितीन गडकरी गडकरी

You may also like