Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

मनमाड शहरातील मानाच्या श्री निलमणीची स्थापना; पालखी मिरवणुक संपन्न

Author: Share:

नांदगाव – मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिध्द असणार्‍या वेशीतील श्रीनिलमणी गणेश मंदीरातील श्री निलमणीच्या पार्थीव मुर्तीची स्थापना मिरवणुक पालखीतून काढण्यात आली. मनमाड शहराच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेमध्ये मानाचे स्थान असणार्‍या आणि आम्ही परंपरा पाळतो..

आम्ही संस्कृतीचे रक्षण करतो हे ब्रीदवाक्य घेवून काम करणार्‍या श्री निलमणी गणेश मंडळातर्फे यंदा सन 1997 पासून सलग 21 व्या वर्षी या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मानाच्या पालखी मिरवणुकीचा शुभारंभ श्री निलमणी गणेश मंडळाचे जेष्ठ सदस्य रामदास इप्पर यांनी श्रीफळ वाढवून केला. संस्कृती व परंपरेचे दर्शन घडविणार्‍या या मिरवणुकीत मिरवणुक मार्गावर सुशोभित रांगोळी, तसेच पालखीच्या समोर चंद्र सूर्य व भगवा ध्वज (मानाची अब्दागिरी), सनई चौघडा व वाद्यवृंद लावण्यात आले होतेे. मिरवणुकीत शंखनादासह गणपती आगमनाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. मनमाड शहरात श्री निलमणीच्या पालखी स्थापना मिरवणुकीचा शुभारंभ झाल्यानंतर इतर सार्वजनिक मंडळांमध्ये मिरवणुक निघून स्थापना करण्यात येते. मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर श्री निलमणीच्या पार्थीव मुर्तीचे स्वागत करण्यात आले आणि सुवासिंनीद्वारे औक्षण करण्यात आले.

मिरवणुकीमध्ये खडी साखरेचा महाप्रसाद सर्व भाविकांना वाटण्यात आला. मान्यवर पुरोहितांच्या मार्गदर्शनाने व वेदमंत्रांच्या घोषात श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टचे विश्‍वस्त श्री शेखर पांगुळ यांच्या हस्ते पार्थीव मुर्तीची विधीवत स्थापना करण्यात आली. या स्थापना मिरवणुकीत श्री निलमणी गणेश सार्वजनिक ट्रस्टचे विश्‍वस्त नितीन पांडे, किशोर गुजराथी, गोविंद रसाळ, शेखर पांगुळ, श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष संतोष बळीद, निळकंठ त्रिभूवन, रोहित कुलकर्णी, सचिन वडक्ते, मनोज छाबडा, क्रांती आव्हाड, प्रशांत चंद्रात्रे, शेखर सानप, राजाभाऊ गुप्ता, सतिष शेकदार, अक्षय सानप, दिपक शिंदे,किशोर आव्हाड, अथर्व गुजराथी, प्रतिक पांगुळ, अक्षय छाबडा, किरण त्रिभूवन, सिध्देश वाघ, प्रणव ललवाणी, अथर्व कुलकर्णी, अनंत कुलकर्णी, दिक्षा पांगुळ, गौरंग कुलकर्णी, जागृती आहेर, सान्नीध्य शिंदे, प्रियेश चंद्रात्रे, ऐश्‍वर्या जोशी, निकीता ढासे, मधुरा जोशी यांच्यासह गणेशभक्त मोठ्या संख्येने या पालखी मिरवणुकीत सहभागी झाले.

या मिरवणुकीनंतर शिवाज्ञा ढोलपथकाने पारंपारिक पध्दतीने श्री निलमणी गणेश मंदीरावर ढोल वादनाची प्रात्यक्षिके सादर केली. बारा दिवस निलमणी गणेश मंदीरात भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पालखी मिरवणुकीचे नियोजन श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टच्या विश्‍वस्त मंडळाने केले.

बातमी: प्रा.सुरेश नारायणे

Previous Article

प्रा. सुरेश नारायणे यांना अण्णाभाऊ साठे उत्कृष्ट साहित्यीक पुरस्कार प्रदान

Next Article

बादशाहो मध्ये ‘कह दू तुम्हे’ गाणे घेण्यास उच्च नायालयाचा नकार

You may also like