Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

शेलारांनी उद्धव ठाकरेंना म्हटले उद्धट; पालिकेच्या खुर्च्यांमधील सत्ताधीश कुठे लपुन बसले होते? मॅनहोलमधे?

Author: Share:

मुंबई: आता “उध्दट” भाषा बोलण्यापेक्षा ज्या प्रवाशांचे हाल झाले.. संसार उघड्यावर आले.. त्यांची नम्रपणे माफी मागावी आणि चुका दुरुस्त करायला लागावे, अशी परखड टीका उद्धव ठाकरेंचे नाव न घेता आशीष शेलार यांनी केली आहे.

काल पावसाने हैदोस घातला होता. जनजीवन विस्कळीत झाले होते. यामुळे संतप्त झालेल्या मुंबईकरांनी शिवसेना व पालिकेला दोषी ठरवले होते. त्यावर उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली होती. पाऊस जास्त पडल्यानं मुंबई पाण्याखाली गेली? हेच उत्तर किती वेळा ऐकायला मिळणार आहे? असा प्रश्न विचारण्यात आला असताना उत्तर देण्याचे टाळून ठाकरे पत्रकारांवर संतापले.

यावर आशीष शेलार यांनी ट्विटरवरुन उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे. नालेसफाई झाली असा “ढेकर” दिला.फोटो काढले.पण आता ज्यांच्या घरात पाणी शिरून संसार उध्वस्त झाले..त्यांचे काय करणार? असे ट्विट त्यांनी केले आहे. पालिकेच्या खुर्च्यांमधील सत्ताधीश कुठे लपुन बसले होते? मॅनहोलमधे? रस्त्यावर भाजपचे आमदार, नगरसेवक लोकांसाठी झटत होते. अर्थात कर्तव्य म्हणूनच! असा मिश्किल सूरही त्यांनी छेडला आहे.

Previous Article

३१ ऑगस्ट

Next Article

नांदगाव-साकोरा येथे महाअवयवदान महोत्सव जनजागृती रँली

You may also like