ती

Author: Share:

माझ्या प्रोफाईल वर कधी
“ती”
महाराष्ट्रातील होती,
तर कधी ‘ती’ दिल्लीची होती,
तर कधी आदिवासी पाड्यातील
प्रातिनिधिक ‘ती’,
आणि आज माझ्या प्रोफाईल वर
‘जन्मू कथुआ’ मधील ती आहे.
कधी ती तथाकथित उच्च होती
सवर्ण होती आणि काही वेळी
ती तथाकथित दलित होती.
पण कुठलीही असो
ती जेव्हा जेव्हा माझ्या प्रोफाईल वर
आली तेव्हा ती पीडित शोषित होती.

तिच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगून
लोकसभेत बाकडी वाजवत बसलीयेत
माणसं.
ती आजही प्रोफाईल वर आहे माझ्या
निरागस डोळ्याने.
काय करावं ?
निर्लज्ज,
मुर्दाण्ड,
पाशवी झालेल्या माणसांचं?

उद्या दुसरी कोणी ती माझ्या प्रोफाईल
वर येण्याआधी जागं झालं पाहिजे.
बेटी बचाओ फक्त बोंबलण्यापेक्षा
काहींतरी केलं पाहिजे.
बाकडी वाजवत बसणाऱ्यांच्या
न वाजवता कानात आवाज घुमला
पाहिजे.
त्यांच्याच घोषणेचा.
बेटी बचाओ….बचाओ.

कविता: स्वप्निल नंदकुमार करळे
8149976612


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


Previous Article

आशिफा प्रकारणामधील तिसरी बाजू

Next Article

नृशंसतेचा कडेलोट!

You may also like