सेतू माधवराव पगडी

Author: Share:

जन्मदिन : २७ ऑगस्ट  १९१०

स्मृतिदिन १४ ऑक्टोबर१९९४

एक बुद्धिमान इतिहाससंशोधक, सृजनशील विचारवंत, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, म्हणून महाराष्ट्राला आणि विशेषतः अभ्यासू इतिहासप्रेमींमध्ये ज्ञात असेलेले सेतू माधवराव पगडी हे कार्यक्षम मुलकी अधिकारी सुद्धा होते. याशिवाय ते गॅझेटियर्स’चे संपादक व लेखक सुद्धा होते. पगडींची अनेक संशोधने पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यासासाठी जी पुस्तके प्रमाण मानली जातात त्यामध्ये सेतू माधवराव पगडी यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी या पुस्तकाचा अग्रक्रम लागतो. हे पुस्तक नॅशनल बुक ट्रस्ट या नवी दिल्लीतील प्रकाशनाने मराठीतेही  प्रसिद्ध केले आहे.

इतिहासाच्या संशोधनासोबतच विपुल प्रमाणात स्फुट व ग्रंथलेखनसुद्धा त्यांनी केले आहे.

उर्दूचा त्यांचा गाढा भ्यास होता. इकबालच्या उत्तम व रसभरीत कविता व फिरदौसीचा जाहीरनामा त्यांनी मराठीमध्ये भाषांतरित केला आहे. इंग्रजी, मराठी, उर्दू, फारसी, बंगाली, अरबी, तेलुगू, कन्नड अशा जवळपास सतरा भाषा त्यांना अवगत होत्या. राष्ट्रपती डॉ. राजेंदप्रसाद औरंगाबादेत आले तेव्हा पगडींनी एक तास अस्खलित उर्दूमधून सूफी संप्रदायावर भाषण दिले. ते राष्ट्रपतींना इतके आवडले की, त्यांनी     ‘अ मोस्ट लनेर्ड पर्सन’ या शब्दात पगडी यांची प्रशस्ती केली.

गोंडी व कलामी या आदिवासींच्या बोलींवर त्यांनी लिखाण केले.

पगडी हे इ.स. १९६० ते इ.स. १९६९पर्यंत महाराष्ट्राच्या गॅझेटिअर विभागाचे सचिव होते. १९५१ साली औरंगाबाद जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून त्यांनी काम केले होते. त्यापूर्वी ते हैदराबाद संस्थानमध्ये सनदी अधिकारी होते.

पगडी यांचे वाचनही अफाट होते.  मुंबईत वास्तव्यास असताना पगडी यांनी तेरा वर्षांत किमान तेराशे गंथ अभ्यासले. त्यांच्याकडे आत्मचरित्र लिहिण्याचा आग्रह धरला गेला तेव्हा त्यांनी विविध भाषेतील किमान शंभर आत्मचरित्रे वाचून काढली.

“मराठवाडा साहित्य परिषद“ , “इंदूर साहित्य सभा“, “मराठी वाड्मय परिषद“ यांचेअध्यक्षपद सेतुमाधवराव पगडींनी भूषविले आहे.

‘जीवनसेतू’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

Previous Article

सदा सर्वदा योग तुझा घडावा: विवेचन

Next Article

महाराष्ट्राबाहेरील गणपती: श्री अमेय पांडे, छत्तीसगड

You may also like