सेन्सेक्सची ५७७ अंशांची झेप: ३३५०० ची पातळी ओलांडली

Author: Share:
सेन्सेक्स ने आज ५७७ अंशांची जोरदार उसळी मारून ३३५९६.८० पर्यंत मजल मारल्याने गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सकाळपासून मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण होते, आणि मार्केटमधील तेजी दिवस संपताना अधिक वाढत गेली.

आज सर्वाधिक वाढलेल्या ए कॅटेगरी समभागात व्हीआयपी इंडस्टीज चा शेअर १७.१५% तेजीसह प्रथम क्रमांकावर राहिला. ५४.४० अंश वाढून तो ३७१.५५ वर बंद झाला. शेवटच्या अर्ध्या तासात त्याच्यामध्ये जोरदार खरेदी पाहावयास मिळाली.  आज व्हीआयपीने नोव्हेंबरची हाय लेव्हल (३७१) गाठली आहे, त्यामुळे ती सस्टेन केल्यास अधिक तेजी पाहायला मिळेल. फ्युचर ग्रुप चा फ्युचर लाइफस्टाइल फॅशन चा समभाग ९.५१% वाढून ४३० वर बंद झाला. हा समभाग सुद्धा एका महिन्याच्या चार्टवर आकर्षक दिसत आहे. महिन्याभरात ३६० वरून तो ४३० पर्यंत पोहोचला आहे. त्या खालोखाल जाणारा बँक ८.२६%, केअर रेटिंग ७.८२% वाढले. केअर रेटिंग सडे बारा नंतर तब्ब्ल १०० अंश वाढून १३०३.७५ वर बंद झाला. जिंदाल स्टील अँड पावर ७.४७% वाढून २३५.९० वर बंद झाला. प्राजु इंडस्ट्रीजइं  ७. ३९% वाढून ९१.६० वर बंद झाला.
इंडियाबुल्स व्हेंचर्स ७.३९% वाढून २८६.३५ वर बंद झाला.हा समभाग मागील आठवड्यात २४८.३५ वरून २८६ पर्यंत वाढला आहे. दीघकालसाठी हा समभाग चांगला वाटत आहे. मागील वर्षभरात १०० वरून तो २८६ पर्यंत वाढला आहे (१८६%). बँक ऑफ इंडिया (७.१६%), हिंदाल्को (६.५३%), एलएन्डटी फायनान्स६.३५%, उज्जीवन फायनान्शिअल सर्व्हिसेस हे समभाग वाढलेले पाहावयास मिळाले.
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सचा समभाग ५.८९% वाढून १५४२ वर जाऊन पोहोचला. मागील महिन्याभरात १३०० वरून तो २४२ अंश  (१८%)  वाढला आहे.
 ३३००० ची लेव्हल सस्टेन करणे मार्केटसाठी महत्वाचे आहे. सद्ध्यातरी तिथे त्याला स्ट्रॉंग सपोर्ट दिसत आहे.
Previous Article

‘मसापचा कै. रा. श्री. जोग पुरस्कार डॉ. वासुदेव मुलाटे याना जाहीर’

Next Article

दर्जेदार शिक्षण असे देता येईल.

You may also like