शेती विकणे आहे

Author: Share:

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


भारतात बहुसंख्य लोक शेतीवर उदरनिर्वाह करतात. ती शेती आहे, म्हणुनच आपण आहोत.. शेती जर नसती तर आपण भारतीय जगलो नसतो असे नाही, पण आपल्याला जगावर अवलंबून राहावं लागलं असतं.

भारतात बहुसंख्य लोक शेती करतात. त्या शेतीवर वेगवेगळे पीक काढुन येथील शेतकरी आपले पोट भरतात. त्यासाठी काबाडकष्ट करतात. पण त्यांच्या कष्टाला देशात कोणतीच किंमत नाही.

शेतात पीक पिकविण्यासाठी जीवाचे रान करीत असतांना निसर्गही त्यांची सोबत करीत नाही.उलट निसर्ग कोपल्यासारखा कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ निर्माण करीत असतो. यातच सततची नापीकी व सतत वाढता कर्जाचा डोंगर पाहुन हे शेतकरी आत्महत्या करतात.हे सर्वांनाच दिसत आहे. पण जे शेतकरी नाहीत त्यांना शेतक-यांचं दुःख कसं कळणार…… ते शेतक-यांना मदत न करता त्यांचं रक्तच चुसण्याचं काम करीत असतात.

महत्वाचे म्हणजे एवढे काबाडकष्ट करुनही,तसेच संकटं झेलुनही जेव्हा पीक शेतक-यांच्या हातात पडतं.तेव्हा त्या मालाला भावच नसतो विकतांना. अतिशय अल्प भावात पीक विकावं लागतं. ह्या रकमेतुन शेतीसाठी घेतलेलं कर्जही फिटत नाही.

ओल्या कोरड्या दुष्काळाने त्रस्त असलेला शेतकरी, धान्य शेतात पेरल्यानंतरही शेतात अळीच्या साम्राज्यावर विजय मिळविल्यावरही जेव्हा हातात हे धान्य पडते. तेव्हा त्याला भाव न मिळणे ही हास्यास्पद गोष्ट आहे. उलट त्या धान्यापासुन बनलेल्या पक्क्या मालाला जास्त किंमत मिळते. पक्का माल हा कामगारांचा घाम गाळुन बनविलेला असतो. त्या कामगारालाही त्याचं व्यवस्थीत मुल्य मिळत नाही. पण मालक म्हणुन कामगारांना राबविणा-या घटकाला त्याची जास्त किंमत मिळते. तो मात्र एसीत विदेशयात्रा करतो. कोणाच्या भरवश्यावर तर शेतकरी आणि कामगार यांच्या भरवश्यावर…..

अलिकडे शेतात धान्य पीकत जरी नसले,शेतमालाला भाव जरी नसला तरी काही भागात शेतीच्या किंमती वाढल्या आहेत.शेत पीकत नाही म्हणुन आपले शेत विका. बेशेत व्हा. देशातील लोकं उपासमारीनं मेली तरी चालेल, देशातील लोकसंख्या कमी झाली तरी चालेल,पण शेती करु नका हा संदेश फैलावणारे भुमाफिया शेतक-यांना शेती कष्टातुन बाहेर काढण्याचा प्रयत्न या माध्यामातुन करतात.त्यांच्या शेताला जास्तीत जास्त किंमत देतात.तसेच त्या ठिकाणी गाळे पाडुन त्याची विक्री करीत असतात.

जमीनीवर होणारी शेती ही बीजगणित पद्धतीने वाढते तर लोकसंख्या भुमीती पद्धतीने. आज शेती पीकत नसल्याने शेतक-यांची मुलंही शेती करायला तयार नाही. इतरांचं सोडा. जमीनी ज्यांनी घेतल्या तेही शेती करीत नाहीत. उलट शहरालगत असलेली शेती ही बंजर होत असुन त्या शेतीवर आता गाळे पडल्याने अशी शहरालगतची हजारो एकर शेती कमी होत आहे. तसेच खेड्यावरही शेती कमी होतांना दिसते. तिथेही अधिवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी चांगल्या पीकाच्या जमीनी जाणुनबुजून बंजर करुन त्या ठिकाणीही गाळे पाडणे यामुळे एकंदर सांगायचे झाल्यास शेती कमी होत आहे

जगातही हीच स्थिती सुरु आहे. पृथ्वीवर जमीन आणि पाणी यांची वाटणी पाहता समतोल नाही.पाणी एकाहत्तर टक्के व जमीन फक्त एकोणतीस टक्के आहे. त्या एकोणतीस टक्के जमीनीपैकी काही जमीन ही निव्वळ बंजर असुन काही जमीनीवर जंगलं आहेत तर काही जमीनीवर डोंगर, पर्वत टेकड्या आहेत. तसेच जी जमीन उरते त्यातील काही जमीनीवर घरे, रस्ते, टावरलाईन, धरण क्षेत्र आहेत.बं जर जमीनीवर ठीक आहे. पण उपजावु जमीनीही आता कमी होत चाललेल्या असुन या जमीनीचा काही उपयोग नाही.या जमीनीवर गाळे पाडलेले असुन त्या जागेचा काही उपयोग नाही. अर्थात ज्या जमीनी उपजावु आहेत. त्या जमीनी अधिवासासाठी जाणुनबुजून निरुपयोगी केल्या जात आहेत.हे असेच जर सतत सुरु राहिले तर एक दिवस येथील लोकांना अन्नधान्य मिळणार नाही. तसेच त्यांना उपासमारीने मृत्यु येईल. कारण वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न ऐरणीवर आहे.

सध्या औषधोपचाराने माणसाचे आयुर्मान वाढले आहे. पण औषधाच्या अति फवारणीने शेती नापीकीची होत चालली आहे. शिवाय कुटूंबनियोजन जरी असलं तरी ख-या अर्थानं मुलं ही ईश्वराची लेकरं समजणारी मंडळी कुटूंबनियोजन शस्रक्रिया करीत नाही. चांगले सुशिक्षित वाटणारी मंडळीही कुटूंबनियोजनाच्या फक्त गोष्टी करतात. पण प्रत्यक्षात अंमलबजावणी शुन्य.त्यामुळंच की काय मुत्यूदर कमी तर जन्मदर जास्त आहे. परिणामी लोकसंख्या वाढत आहे.

शेती पिकविणारे शेतकरी…..ते आजही इमानदारीनं आपल्या शेतात काम करतात. पण त्यांना पाहिजे तेवढं फलित त्यातुन न मिळत असल्याने तसेच सतत नुकसानीचा सामना करावा लागत असल्याने तसेच अपार मेहनत करुनही बाजारात त्यांच्या धान्याला बाजारभाव न मिळत असल्याने ते निराश झाले आहेत. शिवाय यामुळंच त्यांची मानसिकता खराब होवुन ती मंडळी आज शेती करायला तयार नाहीत.तर शेती चांगल्या दामात विकुन शहराकडे पलायन करतात. शहरात रोजंदारीवर काम करुन आपल्या संसाराचा गाडा रेटतात.त्यांना आता शेती नकोशी झालीय.एवढी मेहनत करुनही आपण आपले नीट पोट भरु शकत नसल्याने आता शेती ठेवुन काय उपयोग?असा विचार करुन शेती ही करण्यापेक्षा कसे रिकामे राहुन पैसे कमावता येईल याचा विचार येथील तरुणाई करीत आहे.

शेती ओस पडत चालली आहे.तसेच खेडीही ओस पडत चालली आहे. त्यामानानं शहरं वाढत आहेत. शेती विकुन जवळ आलेल्या बक्कळ पैशातुन ही तरुणाई शहरात एक प्लाट घेवुन त्यावर एक आलीशान मकान बांधुन तसेच शेतात राबण्यापेक्षा शहरात राबुन आपल्या संसाराचा गाडा रेटतांना या तरुणांना काहीच वाटत नाही. शेतात उन्हातान्हात राबण्यापेक्षा शहरात मिळेल ते काम या शेती करण्यापेक्षाही बरे असा विचार प्रत्येक तरुण करतो. तर शहरातील माणुस खेड्यात शेती घेवुन त्याचं फार्महाऊस बनविण्याकडे जास्त लक्ष देतो. त्याला पिकाशी काही लेणंदेणं नाही. काही काही तर शेत्या शहरातील माणसांनी घेतलेल्या असुन त्या बंजर ठेवलेल्या आहेत.

काही दिवसांनी शेती करायला माणसे सापडणार नाहीत. शहरातील व्यक्तीजवळ शेत्या राहतील. पण त्याही काटेरी कुंपण टाकुन बंजर अवस्थेत. साहजिकच देशात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल. ज्यांच्याजवळ जास्त पैसा असेल, तीच माणसे विदेशातुन निर्यात होणारं धान्य खावु शकतील.बाकी मात्र उपासात मरतील ही शंका नाकारता येत नाही. म्हणुन प्रत्येक देशात राहणा-या माणसाने तसेच सरकारने यावर विचार करावा. शेती तरुणांनी करावी यासाठी वेगवेगळ्या योजना राबवाव्यात. शेतमालाला भाव द्यावा. नाहीतर ज्यांच्याकडे शेत्या उरल्या आहेत. तीही माणसे एक दिवस आपल्या शेतीवर ‘शेती विकणे आहे’ याचा फलक लावतील. तसेच शेती बंजर करण्यास कारणीभुत ठरतील.

अंकुश शिंगाडे लेखक नागपुर

९३७३३५९४५०


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


Previous Article

विजयदुर्ग

Next Article

संकोचुणी काय झालासे लहान..!

You may also like