आरोग्यरहस्य लेखमाला भाग १

Author: Share:

आरोग्यरहस्य लेखमाला भाग १

वाचक हो, चला आजपासून आपण सहज सुलभ आरोग्यप्राप्तीची रहस्य जाणून घेऊयात!
मला आज पोटात कसं तरीच होतय आज जडं अन्न नको! मी हलकं फुलकं काहीतरी खाईन! असे आपण बयाचदा म्हणतो.हे जडं नि हलकं अन्न काय असतं?, नि त्यामागील आयुर्वेद संदर्भ काय?, ते पाहूयात!

जड अन्न म्हणजे गुरु आहार
हलके अन्न म्हणजे लघु आहार

गुरु लघु आहाराची चर्चा करताना द्रव्य स्वभाव, संस्कार, मात्रा, अन्न, काल आदि बाबींचा विचार करावा लागतो.

*स्वभावः-
काही पदार्थ स्वभावतःच गुरू असतात.उदाः श्रीखंड, मांसाहार इ.
तर काही स्वभावतःच लघु असतात. उदाः साळीच्या लाह्या, कुरमुरे इ.

*संस्कारः-
दूधापासून बनवलेले खवा, रबडी, श्रीखंड आदि पदार्थ गुरु असतात तर दूधात सुंठ घातली कि ते लघु होते.
म्हणजे संस्काराने जसे आपले स्वभाव गुण बदलता येतात तसेच अन्नसंस्काराने अन्नाचे गुण बदलतात बरं का!

*मात्राः-
मात्रा म्हणजे प्रमाण.
श्रीखंड असले की पोटास तडस लागेपर्यंत न खाता थोडे घास कमी खाणे किंवा त्यावेळी भात न खाणे अशा युक्त्या आपण करतो कि नाही ? हाच मात्रा विचार!

*अन्नः-
ताप असेल किंवा अजीर्ण झाले असेल ,तर आपण काय करतो बरं?;भाताची किंवा मूगाची पेज पितो,राजगीरा लाडू खातो;हा विचार अंगवळणी पडलाय ना आपल्या!

*कालः-
रात्री उशीरा जेवून लगेच झोपल्याने अपचन होते, आळस येतो कालांतराने वजन वाढते, हे ऐव्हाना सर्वांना माहित असेलचं!

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline

आता आपण पाहू, गुरु-लघु आहाराची विशेष काळजी कोणी घ्यावी?म्हणजे हे पचायला जडं कि हलकं एवढा बारीक सारीक विचार कोणी करावा ?

*मंदकर्मी-

सावकाश हालचाली करणार्‍या व्यक्ती
उदाः ज्यांना वेळेत कोठेही पोचता येत नाही, वेळेत कामे पूर्ण करता येत नाहीत. ‘हा बघू’ असा शब्दप्रयोग जास्त वेळा करणार्या व्यक्ती. ज्यांना अंघोळ, शौचविधी व कपडे घालून आवरायलाही वेळ लागतो अशा व्यक्ती. फारच लॉजिकली सांगायचे झाले तर ज्यांना घड्याळ काही वेळ पुढे करून ठेवावे लागते असे व्यक्ती.

*मंदाग्निः-
ज्यांना योग्य वेळी भूक लागत नाही,किंवा खाल्लेले वेळेवर पचत नाही.

*अनारोग्यी:-
रोगावस्थेत किंवा जे सतत येनकेन प्रकारे आजारी असतात.थोडक्यात ज्यांची गाडी सारखी गॅरेजला लागते अशी मंडळी.

*सुकुमारः-
म्हणजे कोमल प्रकृतीचे.

सुखोचितः-
सुखी व आरामदायी जीवन जगणारे(उदाः A.C.घरातून A.C.कारमध्ये व A.C.कारमधून A.C. आॅफिस मध्ये असा उभयमार्गी चालू असतो असे सुखजीवी.)
म्हणजेच उपरोक्त व्यक्तींनी आपला आहार गुरु(पचायला जड)नसावा याची काळजी घ्यावी!

@डॉ.मंगेश देसाई
आयुर्वेदाचार्य
योग व संमोहन उपचार तज्ञ,पुणे.
7378823732.

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline

Previous Article

“स्वच्छंद” विंदा विशेष, रंगगंध अभिवाचन स्पर्धा व अन्य कार्यक्रम

Next Article

श्रीपाद नारायण पेंडसे

You may also like