Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

नांदगाव येथील मविप्रच्या महाविद्यालयात माती व पाणी परिक्षण होणार

Author: Share:

नांदगाव – शेतीतील माती व शेतीसाठी लागणारे पाणी यातील घटकावर शेतीतील पिक अवलंबुन असते. वाढती लोकसंख्या व त्यांच्या गरजेनुसार लागणारे अन्नधान्य यांचा पुरवठा करण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर आपल्या शेतात करत असतात. त्यामुळे मातीची पोत व दर्जा खालावत असतो परिनामी उत्पन्नावर घट होते या सर्व बाबी लक्षात घेता नांदगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे माती व पाणी परिक्षण सुरू करण्यात आले आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आय पटेल उपप्राचार्य प्रा.संजय मराठे यांनी ही संकल्पना मांडली व रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा मनोज गवारे यांनी त्वरीत परिक्षणाचे काम सुरू केले आहे. परिक्षणासाठी लागणारे गोष्टींचा बीरकाईने अभ्यास करून त्यावर प्रात्यक्षिक घेण्यात आले. यासाठी रसायनशास्त्र विभागातील डॉ. पवन तांबडे, प्रा.भरत शेळके, डॉ.भागवत चवरे, प्रा.लक्ष्मण देढे, दिपक गोरडे, शंकर थोरात यांची मदत लाभली आकीब शेख, नरेंद्र सुरसे, गायत्री घुगे, अपेक्षा पवार, रेश्मा शेख या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पाणी परिक्षण केले. ईलेक्ट्रीकलकंडेक्टीव्हीटी, क्लोराईड,नायट्रेट, सामु, अमोनियम, कँल्शियम, ऑक्सिडायजेशन, सबस्टन, मँग्नेशियम, टी.डी.एस.बल्क, डेन्सीटी, कँल्शियम कार्बोनेट व जिप्सम, इ.घटकाचे परिक्षण होते. परिसरातील शेतकऱ्यांनी महाविद्यालयात येवुन माती व पाणी परिक्षण करून घ्यावे असे आवाहन प्राचार्य डॉ.एस.आय. पटेल यांनी केले आहे

बातमी: प्रा.सुरेश नारायणे

Previous Article

शरदा स्तवन

Next Article

मनाचा गाभारा

You may also like