शाळा

Author: Share:

कुमुद विद्या मंदिर ही आहे माझी शाळा,
तिला आहे मुलांचा खूप लळा ।। धृ।।

शिक्षक शिकवितात आम्हाला छान
म्हणूनच आम्ही आहोत खूप महान ।।१।।

आमची शाळा खूप छान
बाजूला आहे विशाल मैदान ।।२ ।।

शिक्षकांच्या मदतीने करतो आम्ही प्रगती
मदतीला आहेत बोलक्या भिंती ।।३।।

शिक्षक आहेत आमचे तिसरे गुरू
आम्ही त्यांच्याकडून ज्ञान मिळवू ।।४।।

कितीही येऊद्या अडथळा
तरीही शिकायला जाईन मी शाळेला ।।५।।

मुख्याध्यापिकांनी वाढवली शाळेची शान
त्यामुळे त्यांना मिळाला पुरस्कार छान ।।६।।

अशा या शाळेतील आम्ही सारी मुले
संस्कारांनी उमललेली जणू तेजस्वी फुले ।।७।।

– भूमी सिद्धार्थ जाधव


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline


 

Previous Article

कुमारी मातांचा प्रश्न; जागतिक चिंतनाचा विषय

Next Article

विजयदुर्ग

You may also like