Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

बॉम्बस्फोट नकोत; प्रबोधन हवे!

Author: Share:

हिंदू राष्ट्राचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी बॉम्बस्फोट करण्याची आवश्यकता आहे का ? उत्तर ” नाही ” असे आहे ० ‘ हे माझे हिंदुराष्ट्र आहे’ असे प्रत्येक हिंदूने मनातल्या मनात म्हटले तरी येथे हिंदुराष्ट्र अस्तित्वात येणार आहे ० एव्हढे सामर्थ्य ह्या मंत्रात आहे ० हिंदुराष्ट्राच्या अस्तित्वाशी मुसलमानांचा जेव्हढा संबंध त्याहूनही कितीतरी अगणित पटीने संबंध हिंदूंचा आहे ० वर्ष २००८ मध्ये मालेगावात बॉम्बस्फोट झाला ० त्यात प्राणहानी झाली ० तेव्हाच्या काँग्रेस सरकारने भारतीय भूदलातील कार्यरत अधिकारी कर्नल श्रीकांत पुरोहित ,साध्वी प्रज्ञासिंग आणि अन्य काही हिंदुत्व समर्थकांवर आरोपपत्र दाखल केले ० आतन्कवादी प्रवृत्ती,व्यक्ती आणि गट मुसलमानातच असतात असे नाही तर हिंदूंमध्येही ते असतात असा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केंद्रातील आणि महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने केला आणि काँग्रेसी संस्कृतीतील विचारवंत आणि पत्रकार ह्यांनी त्यादृष्टीने जोरदार प्रचार केला ० परंतु गेल्या आठवड्यात विशेष न्यायालयाने हिंदू आतन्कवादाचा काँग्रेसचा मुद्दा फेटाळून लावला ० हिंदूंमध्ये आतन्कवादी गट अस्तित्वात आहेत ह्याचे पुरावे मिळत नाहीत असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे ० परंतु मालेगावामध्ये बॉम्बस्फोट करण्यामागे मुसलमानांना घाबरवून हिंदुराष्ट्र निर्मितीच्या दिशेने एक पाऊल टाकण्याचा पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा ह्यांचा प्रयत्न असू शकतो असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे ० आतन्कवाद आणि हिंदुराष्ट्र ह्या दोन्ही मुद्द्यांचा समाचार येथे घेऊ ०

                     एकत्वाची जाणीव ज्यातून उदित होते ते राष्ट्रीयत्व असते ० इतिहासाच्या प्रारंभापासून आसेतुहिमालय अशा ह्या देशातील म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कामरूप पसरलेल्या ह्या भूप्रदेशातील हिंदू इतिहासाच्या प्रारंभापासून ह्या एकत्वाच्या जाणिवेने एकमेकांशी घट्टपणे जोडलेले आहेत ० एकच उदाहरण द्यायचे म्हणजे गंगेच यमुनेचैव गोदावरि सरस्वति नर्मदे सिंधु कावेरि जलेस्मिन संनिधिं कुरु हा श्लोक म्हणत म्हणजे भारतातील सर्व प्रमुख नद्यांच्या पवित्र पाण्याने स्नान करून मी दिवसाची सुरवात करीत आहे असे प्रत्येक हिंदू मानत आला आहे ० हे हिंदुराष्ट्र आहे हे आपण संयुक्त राष्ट्रसंघाला सांगायचे आहे ० बहुसंख्येचे राष्ट्र होते हा संयुक्त राष्ट्रसंघाचा नियम आहे ० जगात हिंदू हा एकच लोकसमूह असा आहे की ज्याने स्वतःचे राष्ट्र पाहिजे अशी मागणी केलेली नाही ० ती  मागणी लोकसभेने एकमुखाने करायची आहे इतका उपाय साधासोपा आहे ० त्यासाठी बॉम्बस्फोटाची  किंवा कसल्याही हिंसाचाराची आवश्यकता नाही ० अशी मागणी आजपर्यंत का झाली नाही कारण काँग्रेसला हिंदुराष्ट्र नको आहे ०

 

असे साहित्य वाचण्यासाठी आमचे Facebook Page Like करा

https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/

                     काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात म्हणजे डिसेंबर १८८५ मध्ये हिंदुराष्ट्र मोडून हिंदी राष्ट्र निर्मितीचा प्रस्ताव पारित झाला ०   प्रत्येकाने आपल्यातील हिंदुत्व,मुसलमानत्व,ख्रिस्तीत्व नाहीसे करून हिंदी किंवा भारतीय किंवा इंडियन म्हणून स्वतःला समजावे आणि सगळ्यांनी मिळून नवे हिंदी राष्ट्र निर्माण करावे असा संकल्प सोडण्यात आला ० तीन वर्षांनी सर सय्यद अहमद ह्यांनी हिंदू आणि मुसलमान  ही दोन स्वतंत्र आणि युद्धमान राष्ट्रे आहेत आणि एका म्यानात जशा दोन तलवारी राहत नाहीत तसे समान पातळीवर हिंदू आणि मुसलमान ह्यांचे सहजीवन अशक्य आहे असे स्पष्ट केले ० बाराशे वर्षाचे मुसलमानांचे वितुष्ट नाहीसे करण्यासाठी त्यांना बरोबर घेऊन हिंदूंनी उदारपणे आणि सद्हेतूने नव्या राष्ट्र निर्मितीचा प्रयोग केला ० पण मुसलमानांनी तो फेटाळला ० आपण मुसलमानच राहणार आहोत आणि अखंड भारताचे अखंड पाकिस्तान करण्याचा संकल्प आपण सोडलेला नाही हे त्यांनी लक्षात आणून दिले ० त्याने लोकमान्य टिळक सावध झाले आणि भविष्यात जे वाढून ठेवले आहे त्याला समर्थपणे तोंड देता यावे म्हणून गणेशोत्सव आणि शिवजयंत्युत्सव सुरु करून त्यांनी हिंदूंना संघटित करण्याचा प्रयत्न केला ० दुसरीकडे त्यांनी लखनौ करार म्हणून ओळखला जाणारा संधीही केला आणि मुसलमानांना महत्वपूर्ण सवलती देऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न चालू ठेवला ० टिळकांचे निधन झाल्यानंतर गांधींच्या हाती काँग्रेसची आणि देशाच्या राजकारणाची सूत्रे आली ० त्यांनी मुसलमानांच्या मनात अविश्वास निर्माण होईल अशी  म्हणजे ‘ वंदे मातरम ‘ म्हणण्यापासून संघटन करण्यापर्यंत कोणतीही गोष्ट करायची नाही असे ठरविले ० उलट मुसलमानांचे प्रेम संपादन करण्यासाठी  हिंदूंनी आपली स्वातंत्र्य चळवळ बाजूला ठेवून त्यांच्या खिलाफतीचा प्रश्न अग्रहक्काने लढवायचा पण त्या प्रीत्यर्थ मुसलमानांनी गोहत्या करू नये अशी अट घालायची नाही अशी भूमिका गांधींनी घेतली ० जोपर्यंत मुसलमान हिंदी राष्ट्रात सामील होण्यास पुढे येत नाहीत तोपर्यंत त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे  असे गांधींनी हिंदूंना बजावले ० ह्या भूमिकेचा अतिरेक झाला तेव्हा पाकिस्तान शक्य  झाले ०

                       स्वतंत्र भारतात आपली सत्ता टिकवण्यासाठी हीच भूमिका काँग्रेसने चालू ठेवली ० हिंदी राष्ट्रात अल्प आणि बहू संख्यांक असा भेद असणार नाही तर सर्व  विधिविधानासमोर समान असतील असे १८८५ मध्ये ठरले होते ० पण काँग्रेसने मुसलमान हे केवळ धार्मिक नव्हे तर भाषिक आणि राष्ट्रिक अल्पसंख्यांक आहेत असे मानून त्यांच्या मनात हिंदूंविषयी नित्य अविश्वास आणि भीती राहील असे वर्तन केले ० स्वतःला मुसलमान म्हणविणे ही  काँग्रेसने गौरवाची आणि हिंदू समजणे ही निंद्य गोष्ट ठरविली ० मुसलमान हे सत्तेवर न आलेले  पण रिमोट कंट्रोल हाती आलेले छुपे राज्यकर्ते ठरले तर बहुसंख्याक असूनही आणि भारताच्या सार्वभौमत्वास, अखंडत्वास आणि एकात्मतेस बाधा पोचेल असे एकही अपकृत्य हातून न घडूनही हिंदूंना अपराधी ठरविण्यात आले ० हा सगळा इतिहास हिंदुत्वनिष्ठांनी लोकांस समजून सांगायचा आहे ० बॉम्बस्फोट करण्याची आवश्यकता नाही ० काँग्रेसपेक्षा वेगळ्या पद्धतीने मुसलमानांचा प्रश्न सोडविता येतो हे नरेंद्र मोदींनी दाखवून दिले ० त्यांची गुजरातमधील राजवट हा वस्तुपाठ होता ० त्यामुळे मुसलमानांच्या मतांवाचून हिंदू सत्तेवर येऊ शकतात हे सिद्ध झाले ० सत्तेवर आल्यानंतर नरेंद्र मोदी हिंदू-मुसलमान असा भेद न करता सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करतात हे त्रितलाकविरोधी विधेयकाने अधोरेखित झाले ० हिंदूस्थान हे हिंदूंचे अनादिकालापासून स्वयंसिद्ध राष्ट्र आहे, ते नेहमीच धर्मनिरपेक्ष राहिले आहे आणि राज्य करतांना हिंदू भेदभाव करीत नाहीत ,त्यामुळे भारतापासून फुटून निघण्याच्या फाजील राजकीय महत्वाकांक्षा धरल्या नाहीत तर सर्व अल्पसंख्यांक हिंदू राष्ट्रात सुखेनैव राहून आपले ऐहिक आणि पारलौकिक हित साधू शकतात हे सावरकरांनी हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदावरून अनेकवार स्पष्ट केले आहे ० यथावकाश मुसलमानांना ते पटेल आणि राष्ट्रिक आणि भाषिक अल्पसंख्याकत्व त्यजून धार्मिक अल्पसंख्यांक म्हणून ते भारताच्या विकासाच्या वाटचालीत हिंदूंना मन:पूर्वक साथ देतील ह्यात शंका नाही ० त्यासाठी प्रत्येक हिंदूने हे हिंदुराष्ट्र आहे असे मनातल्यामनात म्हटले तरी चालणार आहे ० हिंदुत्वनिष्ठ विचारवंतांना मात्र प्रबोधन पर्व नेटाने चालवावे लागणार आहे ०

                     हिंदू आतन्कवादाचा काँग्रेसचा मुद्दा हा मुसलमानांचा गौरव आणि हिंदूंची निंदा हा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या विचारपूर्वक ठरविलेल्या नीतीचा भाग आहे ० मुसलमानांनी हिंदी राष्ट्रात सामील व्हावे म्हणून गांधीनी ही भूमिका घेतली ० त्यांनी मुसलमानांनी बाराशे वर्षात हिंदूंवर केलेल्या अत्याचारांकडे डोळेझाक करण्याचे ठरविले ० त्यादृष्टीने  इतिहासाची पाठयपुस्तके बदलली ० अफजलखान वधाचा धडा शिकवायचा नाही असे आदेश निघाले ० स्वातंत्र्यलढ्यात शिवाजी आणि राणाप्रताप प्रेरणास्थान ठरणार नाहीत ह्याची काळजी काँग्रेसने घेतली ० शिवाजीचे मराठे औरंगजेबाशी लढले नसते आणि त्यांनी त्याला साथ दिली असती तर तो म्हणजे औरंगजेब इंग्रजांना भारतावर राज्य करण्यापासून रोखू शकला असता असे विचार मांडण्यापर्यंत काँग्रेसी विचारवंतांची मजल गेली आहे ० भारताची संस्कृती हिंदू संस्कृती नसून ती हिंदूमुस्लिम मिश्र संस्कृती आहे अशी काँग्रेसची भूमिका आहे ० आज जे भारत आणि पाकिस्तान नावाचे दोन भूभाग अस्तित्वात आहेत त्या दोन्हीवर इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले आहे ० पण  लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता केवळ भारतात सुखरूपपणे नांदत आहे आणि पाकिस्तानात ती औषधालाही सापडत नाही कारण भारतात हिंदू बहुसंख्य आहेत आणि पाकिस्तानात ते नाहीत हे आहे ह्या गोष्टीकडे काँग्रेस मुद्दा कानाडोळा करते ० काँग्रेसने हिंदूमुस्लिम संबंधात पॅरिटीचे तत्वज्ञान राबविले आहे ० पॅरिटी म्हणजे समानता ० ही समानता मुसलमानांचा गौरव आणि हिंदूंची निंदा करून काँग्रेसला साधायची आहे ० मुसलमानांची धर्मांधता जोपासण्यासाठी राजीव गांधींनी शाहबानो प्रकरणात मुल्लामौलवींच्या संगनमताने प्रतिगामी विधेयक संमत करून घेतले आणि त्याच काँग्रेसने राममंदिराचे आंदोलन जातीय आणि धर्मनिरपेक्षताविरोधी ठरवून प्रभू रामचंद्राविषयी अश्लाघ्य वर्तन केले ० काँग्रेसने सर सय्यद अहमद ह्यांची जन्मशताब्दी साजरी केली आणि सावरकरांना स्वातंत्र्यसोहोळ्याचे आमंत्रणही दिले नाही ० ब्रिटिशांविरुद्ध नव्हे तर हिंदूंविरुद्ध लढणाऱ्या मोपल्यांच्या वारसदारांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून केरळमध्ये आजही मानधन मिळत आहे ० भारताची एकात्मता आणि अखंडता टिकून राहावी म्हणून रा स्व संघाने आपले हजारो कार्यकर्ते प्रचारक म्हणून देशभर कानाकोपऱ्यात पाठविले आहेत आणि समर्पित वृत्तीने ते सेवा करीत आहेत  ० पण काँग्रेसच्या दृष्टीने संघ ही देशविरोधी संघटना आहे ० मुसलमानांमध्ये आहेत तसे हिंदूंमध्येही आतन्कवादी आहेत असे काँग्रेस उघडपणे उच्चरवाने म्हणते त्यामागचे मर्म लक्षात घेतले पाहिजे ० एव्हीतेव्ही मुसलमान हिंदूंच्या मुली पळविणार आहेतच त्यापेक्षा त्यांना मानाने बोलावून लग्नातच त्या मुली त्यांना हिंदू का देत नाहीत असे म्हणण्यासारखे हे पॅरिटीचे काँग्रेसचे तत्वज्ञान आहे ० एव्हढी विवेकशून्यता,नीतिभ्रष्टता आणि विश्वासहीनता दुसरीकडे कोठे पाहावयास मिळेल काय ?

लेखक: अरविंद विठ्ठल कुळकर्णी

संपर्क: ०९६१९४३६२४४

Previous Article

‘लोकपाल’ फक्त आंदोलनापुरतेचं..?

Next Article

शरद जोशी समजून घेताना : प्रारंभ

You may also like