Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

ढेकु येथे श्री संत सेवालाल संस्थेद्वारे गुणवंतांचा सत्कार

Author: Share:

नांदगाव (प्रतिनिधी) – ढेकू तांडा ता नांदगाव येथे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर श्री संत सेवालाल महाराज कर्मचारी वृंद यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोहळ्यासाठी नांदगावचे तहसिलदार मा चंद्रकांत देवगुणे साहेब प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. व्यासपिठावर ढेकूच्या सरपंच सौ ज्योती भाऊसाहेब सुर्यवंशी, उपसरपंच श्री बळीराम चव्हाण, दिनेश चव्हाण, गोपीनाथ राठोड सर, कांतीलाल राठोड सर, ग्रामसेवक एस बी सैंदाणे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन, दिप प्रजलन करून करण्यात आली.

तसेच मान्यवरांचसत्कार करण्यात आला त्या नंतर देवगुणे साहेबांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले व १० वी नावाच्या उतीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात  आला देवगुणे साहेबांनी आपल मनोगत व्यक्त करतांना सांगितले की शिक्षण म्हणजे आपला आत्मा आहे आपण शिक्षण घेतलेच पाहीजे,खुप शिका मंत्री, खासदार, आमदार, कलेक्टर, क्लास वन अधिकारी, SP, तहसिलदार, PI, बना पण आपल्या जन्म देणाऱ्या आईवडीलांना कधीही विसरू नका असा संदेश गुणवंत विद्यार्थ्यांना दिला गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये संदेश राठोड, तन्मय चव्हाण, ईश्वर चव्हाण, ईश्वर आडे, अश्वीनी जाधव, वैशाली राठोड, निलेश चव्हाण आदींचा समावेश होता.

सरपंच सौ ज्योती सुर्यवंशी, दिनेश चव्हाण, गोपीनाथ राठोड सर, कांतीलाल राठोड सर, मोतीलाल राठोड ग्रा प सदस्य, भाऊसाहेब सुर्यवंशी आदीनी मनोगत व्यक्त केले. ग्रामस्थ, पालक, तरूण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळ्याचे आयोजन श्री किसन राठोड, रोहीदास चव्हाण, मोतीलाल राठोड, खुपचंद राठोड, गोपीनाथ राठोड, नेमीचंद राठोड, कांतीलाल राठोड, प्रकाश चव्हाण, आदीनी मेहनत घेतली. कार्यक्रमीचे सुत्रसंचालन रोहीदास चव्हाण सर, मोतीलाल राठोड ग्रा.प सदस्य यांनी केले. तर आभार भाऊसाहेब सुर्यवंशी यांनी मानले व सोहळ्याची सांगता करण्यात आली.

बातमी: प्रा.सुरेश नारायणे

 

असे लेख/बातम्या व इतर साहित्य नियमितपणे वाचण्यासाठी आमच्या Facebook Page ला Like आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/

 

Previous Article

मागे वळून पाहताना… भाग २

Next Article

कृषी संजीवनी अंतर्गत भालुर येथे दुधाळ जनावरांना टेगिंग करण्याच्या योजनेचे उदघाटन

You may also like