नांदगाव-मनमाड मध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

Author: Share:

नांदगाव-(प्रतिनिधी)  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती राष्ट्रीय एकात्मता दिन निमित्त मनमाड शहरात मनमाड उपविभागात येणारे पोलीस स्टेशन मधील अधिकारी आणि कर्मचारी यांची एकात्मता परेड आयोजित करण्यात आली. परेडमध्ये डॉ.  राहुल खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग, सोमवंशी, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक,  श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक मनमाड शहर पोलीस स्टेशन,  बशीर शेख, पोलीस निरीक्षक, नांदगाव पोलीस स्टेशन,  मोरे, पोलीस निरीक्षक, आरपीएफ मनमाड, पाटील, कार्यालयीन अधीक्षक, मनमाड नगरपरिषद, होमगार्ड अधिकारी कोल्हे, यांचेसह मनमाड पोलीस उपविभागातील सुमारे  150 ते 200 अधिकारी कर्मचारी, पोलीस पाटील, नगरपरिषद कर्मचारी, आरपीएफ कर्मचारी, होमगार्ड हजर होते, एकात्मता परेड मनमाड शहर पोलीस स्टेशन येथून दिवस पाकिजा कॉर्नर, आठवडे बाजार, नेहरू भवन, शिवाजी महाराज पुतळा, आंबेडकर पुतळा मार्गे एकात्मता चौक येथे येऊन समारोप करण्यात आला. सदर ठिकाणी डॉ. राहुल खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड,  सोमवंशी, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यांनी  मार्गदर्शन केले. त्यानंतर परेडची सांगता करण्यात आली.

Previous Article

नॅक मानांकनात के टी एच एम महाविद्यालय महाराष्ट्रात अव्वल

Next Article

नांदगाव-शेतकऱ्यांचे विजबील थकल्यांने शेती वीजपंपाचा विजपुरवठा विजमहामंडळाने केला बंद

You may also like