शहापूर मधील सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयात पार पडला संविधान जनजागृती कार्यक्रम… 

Author: Share:
प्रतिनिधी -राहुल हरिभाऊ: शहापूर – जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेलं राष्ट्र म्हणून भारताकडे पाहिले जाते याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे. मात्र बहुतांशी युवकांना हा देश ज्या संविधानानुसार चालतो या बद्दल फारच कमी माहिती असल्याचे दिसून येते. युवकांना संविधानाची परिपूर्ण माहिती होण्यासाठी शहापूरच्या सोनू भाऊ बसवंत महाविद्यालयात संविधान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहापूरमध्ये बाळ संरक्षण ह्या विषयावर काम करत असलेल्या साद फाऊंडेशन व सोनू भाऊ बसवंत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यशाळेची सुरुवात संविधान प्रस्तावना वाचून झाली.
 आपल्या रोजच्या जीवनात संविधान उपयोगी पडत असते. ते समजून घ्यायला हवे. असे मत यावेळी प्रा. कांबळे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले कोरो या संस्थेचे नागेश जाधव यांनी भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना समजावून सांगताना विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. लोकशाहीची मूल्ये आपण आपल्यात रुजायला हवीत असं मत यावेळी नागेश जाधव यांनी व्यक्त केलं. साद फाऊंडेशनच्या अॅडव्होकेट पल्लवी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना युवकांच्या विकासासाठी, प्रश्नांसाठी आता युवकांनीचं पुढे यायला हवं असं मत व्यक्त केलं. यावेळी संविधान जनजागृती प्रदर्शनीला विद्यार्थ्यांनी भेट दिली. जागृती लिहे या विद्यार्थ्यांनीने यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
साद फाऊंडेशनच्या माध्यमातून व एन एस एस व एन सी सी यांच्या सहकार्याने राबवलेल्या या कार्यक्रमात साद फाऊंडेशनचे अॅडव्होकेट पल्लवी, मयुरी शिंदे,प्रदिप पवार, विद्या मोरे, संकेत भेरे, अमन साळुंखे , दत्तात्रेय पाटील, कोरो संस्थेचे नागेश जाधव, स्वाती पाटील, सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयाचे प्रा. कांबळे, प्रा. तडवी यांसह अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते.
Previous Article

सिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद यांच्या वतीने शालेय लेखन साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न 

Next Article

जलयुक्त शिवार योजने अंतर्गत निफाड तालुक्यातील मरळगोई बुद्रुक गावाची निवड

You may also like