Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

संवत २०७५ मार्केट कसे असेल?

Author: Share:

लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला सेन्सेक्स ३४९९१ वर बंद झाला. मुहूर्त ट्रेडिंग वर २४५ अंकांची वाढ घेऊन सेन्सेक्सने ३५२३७ ची पातळी गाठली आहे.  संवताच्या शेवटी विशेषतः मार्केटने खोल उडी घेतली. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले. अनेक समभाग मागच्या वर्षीपेक्षा खाली ट्रेंड करताहेत. तर काही समभागांनी वर्षभरात प्रचंड उसळी घेतली.

सेन्सेक्स ३४००० वरून तब्ब्ल ३८६९६ गाठून आता ३४९९१ वर आला आहे. ३८६९६ वरून त्याची घसरण अनेकांना आदळवून गेली. मात्र ३३५०० वर सेन्सेक्स ने उत्तम सपोर्ट घेतला आहे. त्यामुळे ही घसरण थांबली असेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. त्याच्या पुढील सपोर्ट ३२५०० आहे. मात्र तिथपर्यंत मार्केटने स्वतःला आणि गुंतवणूकदारांना टेस्ट करू नये.

प्रश्न असा आहे, की मराठी गुंतवणूकदारांनी पुढील वर्षभरात मार्केटकडे कसे पाहावे? याची काही उहापोह करणारा हा लेख.

मार्केट टाइम करणे मुर्खांना जमते अशी एक म्हण आहे. सांगायचा मुद्दा असा की मार्केटचा तळ कुठला आणि उंची कुठली हे आपण सांगू शकत नाही. आता मार्केटने तळ गाठला आहे आता मी माल घेतो, आणि आता मार्केट पडणार आहे मी माल विकतो इतके पर्फेक्ट भाकीत आपण बांधू शकत नाही आणि त्याची आवश्यकताही नसते.

तुमच्याकडे असलेले पैसे आणि मार्केटची सध्याची अवस्था पाहून सद्सद्विवेकबुद्धीने हा निर्णय घ्यायचा असतो. म्हणजे काय तर तुमच्या विवेकाला जेवढे वाटतील तेवढे पैसे तुम्ही मार्केटमध्ये उतरावावेत. समभाग घेतल्यावर तो आपटला आणि जर तुमचा विवेक तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करायला सांगत असेल तर सरळ लॅपटॉप आणि समोरचे मार्केटचे चॅनल बंद करून चहा पीत बसावे. तुमचा विवेक अल्पकालीन गुंतवणुकीचा असेल तर लिमिट प्राईस सेट केल्याशिवाय गुंतवणूक करू नये.

आता आपण जे समभाग पाहणार आहोत ते आजपासून पुढील एक वर्षांसाठी आणि काही त्यापुढील वाटचालीसाठी असतील. अर्थात, आपण काही समभागांचा लेखाजोखा पाहणार आहोत. जे मागील वर्षी चालले किंवा मागील वर्षी आपटले आणि म्हणून उत्तम किमतीत उपलब्ध आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया (स्क्रिप कोड: ५००११२)

सीएमपी: २८६.६५

मागील वर्षी अंडरपरफॉर्मर हा समभाग आताच्या प्राईस वर घेतल्यास ह्या वर्षी बरा नफा देऊ शकेल. समभागाने ३००वरून उतरून २५० ची लिटमस टेस्ट बऱ्यापैकी पार केली आहे. सध्याच्या प्राईज वर त्याला डिमांड हि मिळते आहे. त्यामुळे सेफ गेम पद्धतीने स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला पुढील वर्षापर्यंत नफा कमावून देऊ शकतो असे वाटते.

स्टेट बँक ऑफ इंडिया तुमच्या पोतडीत असावा, दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून. ह्या समभागाचे ह्या किमतीच्या आसपास एक्युम्युलेशन सुद्धा करणे श्रेयस्कर राहील.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (स्क्रिप कोड: ५३२५४०)

सीएमपी: १९४२.८०

टाटा ग्रुप मधील हा समभाग सेलिब्रिटी समभाग आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा समभाग तुमच्याकडे असला पाहिजे. मागील वर्षी २२०० ची पातळी टच करून हा समभाग आता १९०० च्या घरात खेळतो आहे. दीर्घकालसाठी गुंतवणूक करण्यास हरकत नाही. वर्षभरासाठी स्टॉप लॉस १७९० ठेऊन गुंतवणूक करावी असे वाटते. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस तुमचा सेफ गेमर ठरू शकेल.

टीसीएस ची किंमत अधिक वाटत असेल तर इन्फोसिस सुद्धा ६६० च्या किमतीत उपलब्ध आहे आणि त्याचे मागील वर्षभरातील परफॉर्मन्स पाहता ५००चा उत्तम सपोर्ट त्याला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुक आणि एक्युम्युलेशन साठी इन्फोसिस उत्तम पर्याय दिसत आहे.

एबीबी लिमिटेड (स्क्रिप कोड: ५००००२)

सीएमपी: १३२९.५०

एबीबी मागील वर्षी १७०० पर्यंत जाऊन १३०० वर येऊन स्थिरावला आहे. १२८० वर त्याला सपोर्ट दिसत असून १२५० चा स्टॉप लॉस ठेऊन वर्षभरासाठी गुंतवणूक करता येऊ शकेल.

हॅवेल्स इंडिया (स्क्रिप कोड: ५००००२)

सीएमपी: ६५०.००

ह्या समभागाने मागील सहा महिन्यात प्रॉमिसिंग आलेख दाखवला आहे. ५५० वरून ७१९ टच करून तो आता ६४७ वर ट्रेंड करत आहे. ह्या समभागात गुंतवणूक ह्या वर्षी लाभदायक ठरू शकेल. मुमेंटम स्टॉक म्हणून ह्यावर्षी तो तुमच्या पोतडीत ठेवायला हरकत नाही.

टाटा स्टील (स्क्रिप कोड: ५००४७०)

सीएमपी: ५८२.००

टाटा स्टील मागील वर्षभरात अंडरपरफॉर्मर राहिला आहे. त्यामुळे ह्या वर्षी त्याच्याकडून थोड्या अपेक्षा आहेत. विशेषतः ५५० च्या लेव्हल ला तो सपोर्ट घेत आहे. त्यामुळे एक्युम्युलेशन करून हा समभाग तुमच्याकडे जमवत जाणे उत्तम होईल.

सन फार्मास्युटिकल्स (स्क्रिप कोड ५२४७१५)

सीएमपी: ५७९.१५

टाटा स्टीलसारखीच ह्याचीही स्थिती आहे. फक्त मागील सहा महिन्यात ५५० चा सपोर्ट दाखवत समभाग ५१३ वरून ६७६ पर्यंत जाऊन आता ५७९ वर येऊन स्थिरावला आहे. त्यामुळे ही एक उत्तम बेट ठरू शकेल. विशेषतः टाटा स्टील सोबत गुंतवणूक करून कालांतराने त्यातील कुठला समभाग ओव्हरपरफॉर्म करतो आहे हे पाहून गुंतवणूक वाढवता येईल.

बायोकॉन लिमिटेड (स्क्रिप कोड: ५३२५२३)

सीएमपी: ६३२.९०

वरील दोन समभागांप्रमाणेच हा समभाग असून सध्या तो ६२९ ला उपलब्ध आहे. मागील सहा महिन्यात तो ४०० वरून ६९१ ची पातळी गाठून आला आहे. ५५० आणि ६२० वर त्याने चांगला सपोर्ट दाखवल्याने, ह्या समभागाची निवड करता येईल.

इंडियाबुल्स व्हेंचर्स (स्क्रिप कोड: ५३२९६०)

सीएमपी: ४०७.५०

हा समभाग मागील वर्षी ३०० रुपयाला उपलब्ध होता तो आज ८०० ची पातळी गाठून गेल्या काही दिवसातील मार्केटच्या पडझडीमुळे ४०० च्या पातळीवर येऊन स्थिरावला आहे. कंपनी उत्तम आहे. ते स्वतः शेअरब्रोकर असल्याने त्यांचे उत्पन्न मार्केटवर अवलंबून आहे. मार्केट दीर्घकालीन उत्तम चालेल अशी खात्री असल्यास समभागही उत्तम परफॉर्म करेल अशी आशा करायला हरकत नाही. अर्थात समभागाने अल्पावधीत एवढी उसळी घेतल्याने चिंता आणि भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे जपून पावले टाकावीत, पण पावले टाकून रिस्क घेण्यासारखा समभाग आहे. इतर काही एनबीएफसी कंपन्यांचे समभाग पाहता इथूनही तो वर जाऊ शकेल.

इंटरनॅशनल पेपर एपीएमम (स्क्रिप ५०२३३०)

सीएमपी: ५२५.५०

मागील सहा महिन्यात विशेषतः मागील तीन महिन्यात स्क्रिपणे खूप जास्त उठाव दाखवला आहे. मागील सहा महिन्यात ३५० वरून तो आता ५२० वर आला आहे. मुमेंटम स्क्रिप म्हणून त्याच्याकडे अल्पकालीन गुंतवणूक करता येऊ शकेल.

ह्या वर्षी अशाच समभागांचे परीक्षण करणारे लेख मराठी पैसा ह्या सदरात आपण टाकणार आहोत. ते वाचण्यासाठी हर्षद माने ९९६७७०६१५० वर तुमचा मोबाईल नंबर स्मार्ट महाराष्ट्र अपडेट्स साठी पाठवावा. आणि smartmaharashtra.online सतत वाचत राहा.

ह्या वर्षी शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ होवो आणि म्युच्युअल फंडातील तुमची गुंतवणूक अशीच वाढत राहो अशी प्रार्थना करून हा लेख इथेच थांबवूया.

शुभं भवतु ।

Previous Article

आज महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पुलंची जन्मशताब्दी: जन्मशताब्दी महोत्सव

Next Article

पंडित तुलसीदास बोरकर

You may also like