समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्टद्वारे अंध अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

Author: Share:

समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्ट व सक्षम कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने शिष्यवृत्ती प्रदान सोहळा रविवार दि. ३ जून २०१८ रोजी मालाड कोळी समाज, मालाड (प) येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमात ६५ अंध अपंग विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. ट्रस्टच्या कार्याची ओळख श्री. किशोर लट्टू यांनी दिली. चीफ कमीशनर ऑफ फिजीकल डिसेबलचे डॉ. कमलेश कुमार पांडे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. श्री. सुशील राजगडीया व इतर पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.

या कार्यक्रमात दृष्टीबाधीत श्री. भास्कर जाधव ह्यांना सन्मान पत्र, सन्मान राशी व स्मृतीचिन्ह देऊन जीवन गौरव सन्मान प्रदान करण्यात आला. सन्मानपत्राचे वाचन श्री. किशोर नार्वेकर ह्यांनी केले.

नेत्रदानाचे रेजिस्ट्रिशन करणारे श्री. संजय कार, श्री. अशोक भातवडेकर व सुनीता जालान ह्यांना ट्रस्टतर्फे नेत्रदाता कार्ड देण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष अनंतराम भट ह्यांनी उपस्थित श्रोत्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे डॉ. कमलेशकुमार पांडे ह्यांनी संबोधन करताना केंद्र सरकार दिव्यांग व्यक्तींप्रती संवेदनशील आहे असे सांगताना ते म्हणाले की फिजीकली डिसेबलचा कायदा ५ महिन्यात पारित केला व लागू सुद्धा करण्यात आला आहे. पूर्वी अपंगांची ७ श्रेणी होती ती वाढवून आता २१ श्रेणी करण्यात आली आहे. हायर एज्युकेशन, टेक्निकल एज्युकेशनमध्ये दिव्यांग व्यक्तींना आरक्षण देण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींना लागणार्‍या साहित्याचे (Instument) वितरण ६५०० कार्यक्रमातून करण्यात आले आहे.

दिव्यांगांसाठी लागणारे आय कार्ड केंद्र सरकारने UDID (Unique Disability I Card) च्या स्वरुपात सुरु केले, जे आता सर्व राज्यांमध्ये लागू आहे. सुगम भारत योजनेच्या अंतर्गत दिव्यांगांसाठी पुष्कळ सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. NHFC च्या माध्यमातून दिव्यांगांना ‍ऋण सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. दरवर्षी प्रतिभासंपन्न दिव्यांग व्यक्तींना ३ डिसेंबर रोजी सन्मानित करण्यात येते.
समाजाने दिव्यांग लोकांची मदत केली पाहिजे. समाजातील एक मोठा वर्ग कमकुवत आहे आणि देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी कोणताही वर्ग कमकुवत राहिल्यास देश पुढे जाऊ शकत नाही. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे उदाहरण देताना ते म्हणाले की शृंखलेतील एक भाग जर कमकुवत असेल तर ती शृंखला कमकुवत राहते, या शृंखलेतील सर्व भाग सशक्त झाला पाहिजे असं त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की देशाला जर सशक्त बनवायचे असेल तर प्रत्येक वर्ग सशक्त झाला पाहिजे.

या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते. हिंदी विवेक मासिकाचे संपादक श्री. अमोल पेडणेकर, वनवासी कल्याण आश्रमाचे श्री. कमलाकर बेडेकर, संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचे श्री. प्रभाकर सरडे इ. मान्यवरांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली.

सक्षमचे श्री. रमेश सावंत ह्यांनी आपल्या सुंदर विचारांनी कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. हरीश जालान ह्यांनी केले आणि श्री. राजेश पाटील ह्यांनी आभार प्रदर्शन केले. अशा प्रकारे समर्पण सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि सक्षम कोंकण प्रांताचा ११ वा शिष्यवृत्ती प्रदान सोहळा संपन्न झाला.

Previous Article

सावरकरांनी माफी मागितली या आरोपांचे खंडन करणारे पुस्तक; Savarkar’s Mercy Petitions: Objections & amp; Facts

Next Article

गावाकडे पहा

You may also like