Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

नांदगाव येथील महाविद्यालयात मविप्र संकुलाचा समाजदिन उत्साहात संपन्न झाला

Author: Share:

नांदगाव: महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहु महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे या महान विभूतिंनी शिक्षणाच्या कार्यात स्वःताला झोकुन देवुन कार्य केले. या कार्याची प्रेरणा घेवुन रावसाहेब थोरात, गणपतदादा, मोरे, विठोबा कांदळसकर, डी.आर. भोसले किर्तिवानराव निंबाळकर या समाज धुरीनांनी नाशिक येथे १९१४ ला उदोजी मराठा बोरिडींगची स्थापना करून नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक या संस्थेची स्थापना केली, म्हणून अशा समाज पुरूषांचे स्मरण ठेवण्यासाठी रावसाहेब थोरात यांचा जन्मदिन मविप्र संस्था १९८२ सालापासुन समाजदिन साजरा करते.

या महापुरूषांच्या जयंतीतून त्यांच्या कार्याचे स्मरण होते व नवीन पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन एम.एस.जी. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.आर.के. देवरे यांनी केले ते नांदगाव महाविद्यालयात आयोजित मविप्र संकुलाच्या समाजदिन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नव्याने तिसऱ्यांदा संचालकपदी निवडुन आलेले दिलीपदादा पाटील होते. तर व्यासपीठावर आण्णासाहेब पगार, प्रभाकर मोरे, दामुआण्णा पाटील, शिवाजीराव कवडे, संजीव धामणे, गोटुआण्णा पाटील नंदलाल वर्मा, प्राचार्य डॉ.एस.आय.पटेल, जी.व्ही.गोटे, आदर्श शाळेचे मुख्याध्यापक जमदाडेसर, अद्यापक विद्यालयाचे प्राचार्य एस पी काळोगे, आय टी आयचे प्राचार्य बोरस्ते सर अशोक जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमा आधी समाज ध्वजाचे गजमल रामचंद्र जाधव यांनी ध्वदारोहण केले व ध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी न्यु इंग्लिश स्कलचे संगीत शिक्षक नवघरे सर व विद्यार्थीनींनी समाज गीत म्हटले. तर मान्यवरांनी सरस्वती व छ.शिवाजी महाराज व संस्थेचे आद्यसंस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात काकासाहेब वाघ, भाऊसाहेब हिरे, अण्णासाहेब मुरकुटे, गणपतदादा मोरे, डी.आर.भोसले, अँड.बाबुराव ठाकरे, अँड.विठ्ठलराव हांडे, डॉ.वसंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ.एस आय पटेल यांनी प्रास्तविकेतुन नांदगाव मविप्र संकुलाच्या प्रगतीचा आढावा सादर केला व शाखेचे काम गुणवत्ता, पारदर्शकता व शिस्त या त्रिसुत्रीनुसार चालु असुन संस्थेचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय न्यु. इंग्लीश स्कुलचे मुख्याध्यापक डी.व्ही.गोटे यांनी प्रमुख पाहुण्याचा परिचय करून दिला. डॉ. देवरे म्हणाले की आजच्या आजी माजी संचालक मंडळाने निस्वार्थी मनाने कार्य केले, म्हणून संस्थेच्या चारशेच्या वर शाखा आहेत. आपण इतरांसाठी काहीतरी केले पाहीजे या भावनेतुन संस्थेचा विकास झाला. वडाचे झाड जसे स्वतःला जमिनीत गाडुन घेते व इतरांना सावली देते तसे या समाज कार्य करणाऱ्या असे ते संस्थेची गौरव करतांना म्हणाले समाजधुरीनांनी स्वतःला समाजकार्यात गाडुन घेवुन कार्य केले. म्हणून मविप्र संस्थेचा विकासासाठी ते झटले म्हणुन आज संस्थेचा विस्तार वाढला आहे.

सभासदांनी मला तिसऱ्यांदा निवडुन दिले त्याबद्दल आभार मानले व तालुक्यातील मनमाडला आय.टी.आय व सेमी इंग्रजी, भालुर येथे व जातेगांव शाळेचे वालकंपाऊंडचे बांधकाम, जनता विद्यालय बाणगाव येथे ज्युनियर कॉलेज सुरू करण्याचा मानस आहे. तर नांदगाव तालुक्यातील संस्थेच्या सदस्यांना व त्याच्या पत्नीला वैद्यकिय उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार त्यांनी सभासदांनी केलेल्या सत्कारास उत्तर देतांना व अध्यक्षीय भाषणात मत व्यक्त केले यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष गुप्ता, आण्णासाहेब पगार, सभासदांच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक जाधव यांनी मनोगतातुन संस्थेच्या विकासाचा आढावा घेतला व नवनिर्वाचित संचालक दिलीपदादा पाटिल यांना पुढील काळात कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी मविप्र संकुलातील आदर्श प्राथमिक शाळा, न्यु इंग्लिश स्कुल, आय.टि.आय, अध्यापक विद्यालय या शाळेतील मृणाल पाटील, तेजस पगार, तनिष्का थोरात, सिध्दी बागुल, तेजस्वीनी आहेर, पंखुरी फणसे, चेतन बोरसे, अमोल मडके, राहुल गरूड, शिल्पा महाले, ज्ञानेश्वर जाधव, निलेश हनमंते, शेख शोएब अली अहमद, सृष्टी बडजाते, कुणाल साळुंके, प्रतिभा थोरात, सागर आग्रवाल, तृप्ती गवळी, पंकज चवळे, स्वनाली शेवाळे, सोनाली गोराडे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख अतिथींतिच्या हस्ते करण्यात आला. अद्यापक विद्यालयाच्या प्राचार्य एस.पी. काळोगे व सहकारी शिक्षकांनी दिलीपदादांना रशियन शिक्षण तज्ञांसोबत काढलेल्या फोटो भेट देवुन सत्कार केला. तसेच सुदाम कवडे यांना विशेष कामगीरी बद्दल दिलीपदादा पाटील यांच्या हस्ते सत्कार केला या कार्यक्रमाचे समाज ध्वज संचलन प्रा. दिनेश उकिर्डे व प्रा.बी.पी .शिंदे यांनी केले तर सुत्रसंचालन उपप्राचार्य प्रा.संजय मराठे यांनी केले.

याप्रसंगी प्रभाकर काकळीज, सोमनाथ पाटील, प्रभाकर (आबा) मोरे, एच न पाटील, शरद पगार, दिलीप पाटील, नंदलाल वर्मा, शिवाजी कवडे, विठ्ठल आहेर, अनंत आहेर, प्रभाकर कवडे, आण्णा कवडे, रविंद्र कवडे, राजेन्द्र काकळीज, देवचंद गोराडे, रोहीदास आहेर, राजेंद्र वाघ, नंदू पाटील, मेजर ज.का. साळुंके माणिकराव कवडे उपस्थित होते. आय.टी.आय.चे प्राचार्य बोरस्ते सर यांनी आभार मानले सुदाम कवडे, व्ही.वाय.काकळीज, उपमुख्याध्यापक कापडणीस, पर्यवेक्षक काळे सर, प्रा.आर.टी.देवरे, प्रा.एस.एम.नारायणे आदर्शचे मुख्याध्यापक जमदाडे व मविप्र संकुलातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

बातमी: प्रा. सुरेश नारायणे, नांदगाव

Previous Article

मिरा-भाईंदर महापालिकेत कमळ फुललं

Next Article

नांदगाव महाविद्यालयात नेटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न

You may also like