भरपावसातही श्रमजीवीचे सैनिक आंदोलनात

Author: Share:
भिवंडी प्रतिनिधी, मिलिंद जाधव  ९जुलै : धुळे जिल्ह्यात घडलेल्या अमानवी कृत्याच्या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक आणि विद्युल्लता पंडित यांनी जाहीर केलेले एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आज भर पावसातही यशस्वीपणे पार पडले. सर्वत्र पावसाचा प्रचंड जोर असताना पावसाची आणि पूर परिस्थितीची तमा न बाळगता श्रमजीवी संघटनेचे सभासद कार्यकर्ते उपोषणात सहभागी झालेले दिसले, पाच जिल्ह्यात एकाच वेळी 23 ठिकाणी तहसील कार्यालयासमोर उपोषण झाले. ठाणे पालघर या दोन जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून सरकारचे आणि जनतेचे लक्ष या संवेदनशील परिस्थितीकडे वेधण्यात आले.समतेचा संदेश देण्यासाठी उपोषणात सहभागी झालेल्या सर्व श्रमजीवीच्या सैनिकांनी समाजात माणुसकीचा आदर्श प्रस्थापित केला असून या सर्व सैनिकांचा मला सार्थ अभिमान वाटतो अशी प्रतिक्रियाश्रमजीवी संघटनेचे संस्थापक माजी आमदार *विवेक पंडित* यांनी काढले.
समाजात सद्यस्थितीत वाढलेला जातीय तणाव, सामाजिक आणि धार्मिक तेढ त्याचबरोबर कुणालाही कायदा हातात घेण्याची प्रवृत्ती आणि त्यातून जाणारे निष्पापांचे बळी याविरोधात श्रमजीवी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे. या परिस्थितीत  समाजात माणुसकीची जपणूक करण्याची भावना वाढीस लागणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत ९ जुलै २०१८ रोजी श्रमजीवी संघटनेने महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात प्रत्येक तहसील कार्यालया समोर एकाच वेळी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
आपला देश हा धर्मनिरपेक्ष विचार सरणीचा आहे. सर्व धर्म समभाव अशी व्यवस्था आपल्या राज्यघटनेला अभिप्रेत आहे. समानतेचा संदेश देणाऱ्या, विविध संत महात्म्यांचा वारसा आपल्या देशाला आहे. मात्र आज  आपल्या देशात प्रचंड अस्वस्थता आहे. जातीय धार्मिक तणाव प्रचंड वाढलेला आहे. जाती पतीच्या नावाने समाजात आक्रमकता माजली आहे. कायदा हातात घेणे, कोणालाही शिक्षा करण्याचा अधिकार आपणास आहे ही भावना वाढीस लागण हे या लोकशाही समाज व्यवस्थेला अत्यंत घातक आहे असे असे मत श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष *रामभाऊ वारणा* यांनी व्यक्त केले.
समाज प्रभोधन करणाऱ्या विचारवंतांच्या हत्या, डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी यांच्या हत्या, जातीय दंगलींमध्ये झालेले मृत्यू याच अराजकतेतून जात असलेले निष्पापांचे बळी अस्वस्थ करणारे आहे. याबाबत देखील सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
 परवाच धुळे जिल्ह्यातील राइनपाडा येथे नागपंथी, डवरी, गोसावी समाजातील  भिक्षा मागणाऱ्या जणांना मुलं पकडणारी टोळी समजून लोकांनी चक्क ग्रामपंचायत मध्ये निर्दयीपणे ठेचून मारले, हे अत्यंत संताप जनक आणि निषेधार्थ आहे. हे एक उदाहरण झाले मात्र महिला मुलींवरचे अत्याचार, मागास वर्गीयांवरील, आदिवासींवरवरील अत्याचार हे सर्रास वाढले आहेत.याकडेही श्रमजीवी ने निवेदनातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत..
  *श्रमजीवी संघटना*  गेली साडे तीन दशके गरीब कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे, या कालावधीत संघटनेने कधीच कोणत्याही जातीयवादाचे समर्थन केले नाही. समाजात समानतेचे वातावरण असावे याच दृष्टीने काम केले आणि यापुढेही याच धर्तीवर काम करत राहील. आणि म्हणूनच वरील सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी श्रमजीवी संघटनेने दि.९/७/२०१८ रोजी सर्व तहसिल कार्यालयासमोर हे एक दिवसीय उपोषण केले,हे लक्षणीक उपोषण कोणा एका सरकारच्या, पक्षाच्या किंवा जाती धर्माच्या विरोधात किंवा समर्थनार्थ नाही. हे उपोषण केवळ माणूसकीचे समर्थन करणारे आहे. असे संस्थापक माजी आमदार #*विवेक पंडित* आणि संस्थापिका विद्युल्लता पंडित यांनी सांगितले आहे.
प्रत्येक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्फत यावेळी निवेदन देण्यात आल्याची माहिती सरचिटणीस बाळाराम भोईर आणि विजय जाधव यांनी दिली.संघटनेचे राज्याचे, जिल्ह्याचे आणि  तालुक्यातील सर्व पदाधिकारी तसेच गाव,झोन चे कार्यकर्ते युवक कार्यकर्ते सभासद या उपोषणात सहभागी झाले होते.
Previous Article

वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का? भाग ३

Next Article

येवला तालुक्यातील आंबेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून तयार केला रस्ता

You may also like