सई परांजपे

Author: Share:

परांजपे यांचा जन्म पुण्यात १ मार्च १९३६ साली झाला. सई परांजपे या रॅंग्लर परांजपे यांच्या नात तर शंकुतला परांजपे यांच्या कन्या. सई परांजपे या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या पदवीधर आहेत. त्यांनी आपल्या काराकिर्दीची सुरुवात आकाशवाणीतून उद्घोषक म्हणून केली.

बालसाहित्य :

लिखानाचं बालकडू त्यांना घरातूनच प्राप्त झालं. शाळेय शिक्षण घेत असताना वयाच्या आठव्या वर्षी त्यांच “मुलांचा मेवा” हे पूस्तक १९४४ साली प्रसिद्ध झाले. इथपासूनचं सई परांजपे यांनी बालसाहित्यास सुरुवात केली. सई परांजपे यांची बालनाट्य सूद्धा खूप गाजली, तसेच बालनाट्यांना पुरस्कारही लाभले. “शेपटीचा शाप”, “झाली काय गंमत”, “हरवलेल्या खेळण्यांचे राज्य”, “माझा खेळ मांडू दे” ही त्यांची गाजलेली बालनाट्य. “जादू चा शंख”, व  “सिकंदर” हे बालचित्रपट लोकप्रिय झाले होते.

चित्रपट  :

सई परांजपे यांच कार्यक्षेत्र हे केवळ बालसाहित्यापर्यंत विसावलेलं न्हव्तं. तर त्यांनी चित्रपटसृष्टीत सूद्धा आपलं स्थान प्राप्त केलं आहे. “चष्मेबद्दूर”, “कथा”, “स्पर्श”, “दिशा”, “साज”, “चुडिया” यासारखे चित्रपट त्यांनी केले. “स्पर्श” या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पूरस्कार मिळाले.

मालिका :

लहान पडद्यावरील “अडोसपडोस” व “छोटे-बडे” या मालिका खूप लोकप्रिय झालेल्या.

नाटक  :

मराठी रंगभूमीवरील सई परांजपे यांचे योगदान अतुलनीय आहे. “बिकट वाट वहिवाट” या नाटकाचे दिग्दर्शन सई परांजपे यांनी केले होते. तसेच “सख्खे शेजारी” , “जास्वंदी” , “माझा खेळ मांडू दे” ही सई परांजपे यांची नाटके मराठी नाट्यभूमूीच्या इतिहासातील महत्तवाची नाटके मानली जातात. बालसाहित्य, दिग्दर्शन, नाटक, लेखक यासारखी चौफेर कामगिरी सई परांजपे यांनी य़शस्वीरित्या पार पाडली.

पुरस्कार :

१९८५ चा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार- स्पर्श चित्रपटासाठी.

१९९३ साली “चूडिया” या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार.

२००६ साली पद्मभूषण पुरस्कार.

२०१२ सालचा राजा परांजपे पुरस्कार.

२०१७ सालचा (पाचवा) आरती प्रभू पुरस्कार.

मसापचा २०१७ सालचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार – “सय-माझा कलाकार” या पुस्तकाला.

अमेरिकेतील महाराष्ट्र फांउडेशनतर्फे देण्यात येणारा साहित्या पुरस्कार (१३-०१-२०१८).

संदर्भ :  विकीपीडीया मराठीसृष्टी. कॉम

Previous Article

शालोम: “अस्त उदय”

Next Article

१९ मार्च

You may also like