सिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद यांच्या वतीने शालेय लेखन साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न 

Author: Share:
भिवंडी प्रतिनिधी मिलिंद जाधव: दि. 11-7-2018 रोजी भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद  शाळा  मोहंडूळ येथे जिल्हा परिषद शाळा  मोहंडूळ, कुडवळपाडा, ठाकूरपाडा  केंद्र  वडवली येथील  एकूण  90 विद्यार्थ्यांना व जिल्हा परिषद शाळा  देसलेपाडा (दहागाव )ता. शाहापूर येथील  45 विद्यार्थ्यांना अशा एकूण  135 विद्यार्थ्यांना  शालेय  लेखन  साहित्य  (वह्या, पेन, पेन्सिल, रबर,शाॅपनर,पट्टी,पाट्या ,कलर बाॅक्स) संस्थेचे  वतीने  वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरूषांच्या प्रतिमांना  पुष्पहार अर्पण  करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाम आगिवले प.स.सदस्य  यानी भूषविले.
प्रमूख  पाहूणे गिता मुंडे  सरपंच मोहंडूळ राम फर्डे उपसरपंच  मोहंडूळ  भास्करजी गायकवाड अध्यक्ष सिद्धार्थ फाऊंडेशन  संतोष  गाढे कोकण विभाग अध्यक्ष  कास्ट्राईब शिक्षक संघटना विजय जाधव  ठाणे जिल्हा अध्यक्ष  दिनेश  शिंदे  कार्याध्यक्ष  पर्विण  कांबळे  अध्यक्ष  भिवंडी तालुका अशोक ठाणगे  सानेगुरुजी  शिक्षक संघ  सचिव म.रा.रूपाली पाटील  केंद्र प्रमुख विशेष सहकार्य एकनाथ जाधव  मुख्याध्यापक  मोहंडूळ शरद ठाणगे  मुख्याध्यापक  ठाकूरपाडा मंगल डोके मॅडम मुख्याध्यापक कुडवळपाडा वैशालीताई बागूल ,  साहेबराव शेवाळे  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  संस्थेचे अध्यक्ष  भास्करजी गायकवाड, उपाध्यक्ष जगदीशजी गायकवाड, सहसचिव बी.डी चन्ने, कोषाध्यक्ष  अशोक गायकवाड, शैक्षणिक समिती प्रमूख  संतोषजी गायकवाड, संचालक प्रकाश कांबळे, सदस्य शिक्षक संजीव जाधव, संदीप  गायकवाड ,मिलिंद  गायकवाड संचालक  बलिराम गायकवाड यांनी विशेष परिश्रम  घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कोषाध्यक्ष अशोक गायकवाड  व कार्यक्रमाचे प्रास्ताविक  उपाध्यक्ष शिक्षक जगदीशजी गायकवाड  तर आभार   शरद ठाणगे यांनी मानले.
Previous Article

वेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का? भाग ४

Next Article

शहापूर मधील सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयात पार पडला संविधान जनजागृती कार्यक्रम… 

You may also like