Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

मुंबईतील सर्वात मोठा नवरात्रौत्सव; “रुपारेल नवरात्री उत्सव २०१७”साठी “दांडिया क्वीन” फाल्गुनी पाठक सज्ज

Author: Share:

मुंबई : दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक यांच्या नावे लवकरच एक मोठा विक्रम होणार आहे. कारण फाल्गुनी पाठक २१ सप्टेण्बर ते २९ सप्टेंबर २०१७ दरम्यान बोरीवलीच्या स्वर्गीय श्री. प्रमोद महाजन क्रीडा संकूल येथे “रुपारेल नवरात्री उत्सव २०१७” येथे आपल्या आवाजाने रसिकांना वेड लावायला येत आहे. १३ एकर क्षेत्रफळाचे हे मैदान असून फाल्गुनी पाठक बोरीवलीमध्ये सलग दोन वर्षे सादरीकरण करणार आहे.

भूमिपूजनाच्या प्रसंगी भाजपचे खासदार श्री गोपाळ शेट्टी आणि भाजपचे दहीसर विभागाचे आमदार सौ. मनिषा चौधरी, श्री. योगेश सागर – आमदार, श्री. विजयभाई गिरकर – आमदार यांसोबत आयोजक आणि स्थानिक नगरसेवक आज सकाळी बोरीवलीच्या स्वर्गीय श्री. प्रमोद महाजन क्रीडा संकूल येथे उपस्थित होते. रुपारेल रियाल्टी हे शोबिझ एंटरटेनमेंट सह “रुपारेल नवरात्री उत्सव २०१७” चे मुख्य प्रायोजक आणि आयोजक आहेत.

या प्रसंगी भाजपचे खासदार श्री गोपाळ शेट्टी म्हणाले की “मुंबई म्हणजे विविध संस्कृतीचे एकत्रिकरण आहे. नवरात्री हे या संगमाचे उत्तम उदाहरण आहे. आता सर्वात मोठा नवरात्री उत्सव मुंबईत होणार आहे, म्हणून लोक दहीहंडी प्रमाणे नवरात्रीसाठी राष्ट्रीय स्तरावर मुंबईची निवड करतील.

रुपारेल रियाल्टीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अमित रुपारेल म्हणाले की “आजच्या संस्था ह्या भाव-बंधनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक संस्कृतीबद्दल आदर दाखवण्यासाठी उत्सवांना मान्यता देत आहेत. रूपारेल ही एक धर्मनिरपेक्ष कंपनी असल्याने सर्व उत्सव उत्सुकतेने आणि उत्साहपणे साजरा करण्यावर विश्वास ठेवतात. आमच्याकडे बरेच ग्राहक आहेत जे नवरात्रीबद्दल उत्सव म्हणून प्रचंड उत्सुक आहेत. दांडिया कुटुंबियांसोबत साजरे करण्याचे एक निमित्तच आहे; दांडियाच्या निमित्ताने कुटुंब एकत्र येतात, आम्हाला दंडियामध्ये कौटुंबिक भाव-बंध पाहून खूप आनंद होतो.”

श्री. संतोष सिंह, आयोजक व शोबिझ एण्टरटेनमेंटचे संचालक म्हणाले की “जेव्हा एखादा उत्सव भव्यतेने साजरा होणार असतो, तेव्हा आमचे प्राधान्य सुरक्षेला असते. म्हणूनच आम्ही अतिरिक्त सुरक्षा आणि कडक जमाव व्यवस्थापन उपाय तैनात केले आहे, विशेषतः महिलांसाठी, जेणेकरुन ते सुरक्षित आणि तणावमुक्त राहून उत्सवाचा आनंद लुटू शकतील.

फाल्गुनी पाठक या एक निर्विवाद उत्कृष्ट नवरात्री गायिका आहेत. गेल्या दोन दशकात त्यांच्या लोकगीतांना आणि बॉलिवूड गाण्यांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभलेला आहे. या वर्षी त्यांच्या “जोडे रेजो राज” या नवीन गुजराती गाण्याने फाल्गुनी पाठक रसिकांना आश्चर्यचकित करणार आहेत. याविषयी बोलताना फालगुनी पाठक म्हणाल्या की “माझ्या कार्यक्रमांच्या परंपरेनुसार, भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी मी विविध भाषांमधील गाणी गाणार आहे. याव्यतिरिक्त, मी या संधीचा वापर करण्यासाठी खुपच उत्सुक आहे आणि म्हणून नवरात्रीच्या घटकाला समोर ठेवून मी “जोडे रेजो राज” हे जुने गाणे पुन्हा तयार केले आहे, ज्यामुळे गरबा नृत्याचा ताल परिपूर्ण होईल.”

हा पहिला धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम असणार आहे, जो लाखो लोकांना एकत्र आणणार आहे. कांदिवली आणि दहिसर प्रमाणे बोरीवलीमध्ये सुद्धा गुजराती लोकांची संख्या जास्त आहे. कार्यक्रमाचे स्थळ इतके सोयिस्कर आहे की लोक सहजपणे या ठिकाणी पोहोचू शकतील.

Previous Article

गौरी गणपतींचे कोकणात थाटामाटात विसर्जन

Next Article

ब्राह्मण लक्षण

You may also like