राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मनमाड विजयादशमी; उत्सव निमित्त पथसंचलन व शस्त्रपूजन संपन्न

Author: Share:

नांदगाव (प्रतिनिधी) मनमाड शहर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेच्या वतीने विजयादशमी उत्सवानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे पथसंचलन संपन्न झाले. रा.स्व.सं संघातर्फे संपूर्ण वर्षभरात 6 उत्सवांचे आयोजन करण्यात येते. त्यातच रा.स्व.संघाचा स्थापना दिन विजयादशमी महोत्सवाचे यंदा 92 वे वर्ष आहे. 1925 पासून सलग या उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रसिध्द क्रीडा प्रशिक्षक श्री प्रविणजी व्यवहारे तर प्रमुख वक्ते म्हणून श्री योगेश्‍वर घोगले (पुणे) हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश शर्मा यांनी केले तर सांघीक गीत स्वप्निल मोहरीर यांनी सांगितले. राजेश घुगे यांनी अमृतवचन सादर केले. तर जेष्ठ स्वयंसेवक सुनिल केळकर यांनी वैयक्तिक पद्य सांगितले. मान्यवर वक्ते व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यावेळी शस्त्रपूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.स्व.संघाचे नांदगाव तालुका कार्यवाह ऍड.कनिष्क उबाळे यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य नित्यसाधना पध्दतीवर अवलंबून असून स्वयंसेवकांनी 92 वर्षाच्या या परंपरेला नित्य संघशाखेवर येवून पुढे चालवावे असे प्रतिपादन आपल्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वातून प्रमुख वक्ते योगेश घोगले यांनी केले. यावेळी प्रविण व्यवहारे यांचेदेखील शुभेच्छापर भाषण झाले. या कार्यक्रमानंतर मनमाड शहरातील प्रमुख मार्गांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सवाद्य पथसंचलन काढण्यात आले. पथसंचलनाच्या मार्गात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि स्वर्गीय वसंतरावजी नाईक या महापुरुषांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन मानवंदना देण्यात आली.

या कार्यक्रमास  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित जनकल्याण समितीचे कर्वे साहेब, जांभोरे साहेब,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, वनवासी कल्याण आश्रमाचे प्रकाशजी गाडगीळ सर, प्रकाश कुलकर्णी, आण्णाभाऊ साठे विचारमंचचे शरदजी बेंद्रे, वाल्मीकी नवयुवक संघाचे नाशिक जिल्ह्याचे प्रमुख राजाभाऊ पवार आदी मान्यवरांसह जेष्ठ स्वयंसेवक किशोर नावरकर, आण्णा सोनवणे, विक्रम सप्रे, शाम व्यवहारे, डॉ.सुहास जाधव, रितीक चव्हाण, प्रसन्न शिंदे,चेतन गंगेले, तालुका प्रचारक शेटे,आदी प्रमुखांसह स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन रा.स्वं.संघाचे प्रमुख रमाकांत मंत्री, प्रमोदजी मुळे आणि शहर कार्यवाह अक्षय सानप यांनी केले. या पथसंचलनामध्ये नांदगाव रा.स्वं.संघाच्या वाद्यपथकाने सहभाग घेतला. तर मनमाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली या पथसंचलनात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनास पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

बातमी: प्रा. सुरेश नारायणे

असे लेख/बातम्या व इतर साहित्य नियमितपणे वाचण्यासाठी आमच्या Facebook Page ला Like आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/

Previous Article

नांदगाव-महिला संरक्षण कायदा व सुरक्षाकवच विषयी कार्यक्रम संपन्न

Next Article

मांडवड येथे साथीचा आजारांचे थैमान; आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

You may also like