निकाल

Author: Share:

आजच १० वी चा निकाल आला. काही मुले आनंदाने रस्त्याने धावत धावत सांगताहेत की ” अरे मी पास झालो रे” काहीना तर इतके मार्क्स पडले तरी कसे ह्याचा विचार ते करताहेत. त्यातल्या त्यात काही मुलांना आपल्याला जास्त मार्क्स मिळतील पण त्याना तर अपेक्षे पेक्षा पण कमी मार्क्स मिळाले. पण वरीलसर्व मुले पास आहेत हे महत्वाचे.

वर्ष भर आपण १० वी च्या वर्गात आहोत चांगला अभ्यास केला पाहिजे ह्याचं टेंशन त्या मुलाला असते. आपल्या मुलाने १० वीत चांगले मार्क्स मिळविले पाहिजे म्ह्णजे त्याला पुढील शिक्षणाचा छान मार्ग सापडेल. मग घरात सुरु होतो “अभ्यास कर, अभ्यासाला बस, जास्त फिरु नको.. फिरण्यापेक्षा अभ्यास कर” अशा सूचनांचा भडिमार. आपला मुलगा/मुलगी शाळेत काय जातोय कि नाही, किंवा तो व्यवस्तीत अभ्यास करतोय की नाही, ह्याची चिंता पालकाना सतत सतावत असते अन ती असलीच पाहिजे . कारण १० वीत गेलेला मुलगा हा वाईट मार्गाला ही जाऊ शकतो.ते वयचं तस असते.

कधी कधी तर काही पालक आपल्या मुलाना तर मारतातच. “समोरचा तो किंवा ती बाहेर नाही निघत,सतत अभ्यास करत असतो.. अन तु नुसता इकडे तिकडे हिंड” अशी वाक्य घराघरातून ऐकायला मिळतात. पण मारुन कधी प्रश्न सुटतात का?


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


उलट सुटणारे प्रश्न वाढतच जातात.

प्रत्येक मुलगा/मुलगी आपल्या पध्दतीने अभ्यास करत असतो.

साधारणपणे पाहिले तर मुले जास्तीत जास्त अभ्यासात वेळ घालवतात. प्रतेक विध्यार्थयाची अभ्यास करन्याची क्षमता ही वेगळी वेगळी असते . अन त्यांच्या क्षमते नुसार ते अभ्यास करून मार्क्स मिळवतात. काही मुले स्वतच्या क्षमतेपेक्षा जास्त अभ्यास करून जास्त मार्क्स मिळवतात. काही मुलांची जास्त मार्क्स मिळवायची क्षमता असुन सुध्दा त्यान्ना कमी मार्क्स मिळतात . अस का होत ? ह्या प्रश्नाचे उत्तर कोणीच शोधत नाहीत. पालकांनी ह्या वर थोडा विचार केला पाहिजे.

कमी मार्क्स मिळाल्या वर आपले आई- वडील आपल्याला मारतील, माझे मित्र मला चिडवतिल,

आता सर्व काही संपले, मला आता कुठेच प्रवेश मिळणार नाही असे खुप सारे प्रश्न त्या मुलाच्या मनात घोटाळतात अन ह्यातुन आत्महत्या सारख्या वाईट गोष्टीकडे मुले वळतात.

काल परवा सकाळी सकाळी पेपर मधे एक बातमी वाचली अन अत्यंत वाईट वाटले. एका दहावीच्या मुलाने रिझल्ट लागायच्या एक दिवस अगोदर आपल्याला कमी मार्क्स मिळातिल ह्या भीतीने आत्महत्या केली. अन अन तोच मुलगा ६७ % ने पास झाला होता. ह्या असल्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. कदाचित मुलांकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षांमुळे तर आत्महत्या होत असतिल ना ? ह्या वर गांभीर्याने विचार सर्व पालकांनी केला पाहीजे.

सरते शेवटी आपण आपल्या मुलांना समजुन घेणं हे खुप महत्वाचे आहे. जे काम समजावून सांगून होत असेल त्या कामाला मारून सांगण्यात काय अर्थ आहे.

लेखक: महेश सुनंदा किशोर बेलदार


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


 

Previous Article

स्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार

Next Article

गाठ

You may also like