Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

‘आरे’मध्ये सापडला दुर्मिळ कोळी

Author: Share:

जंगल म्हणजे केवळ मोठे प्राणी नाहीत. जंगल म्हणजे तिथे आढळणारे जैववैविध्य. एकीकडे आरे कॉलनीमधील जैववैविध्य नाकारताना दुसरीकडे बेंगळुरू येथील आंतरराष्ट्रीय जैवशास्त्रीय विज्ञान केंद्राच्या माध्यमातून केलेला अभ्यास महत्त्वाचा ठरत आहे. जंपिंग स्पायडर श्रेणीमध्ये तब्बल १२२ वर्षांनी पिरँथस डेकोरस या कोळ्याचा शोध लागला असून, तो ‘आरे’मधील जंगलात सापडला आहे. या आधी हा कोळी १८९५मध्ये म्यानमार येथे सापडला होता.

पिरँथस डेकोरस ही प्रजाती अस्तित्वात होती; मात्र, एकंदरच कोळ्यांबद्दल आपल्याकडे फारसे संशोधन झालेले नाही. ‘आरे’मध्ये असे कोळी सापडत असतील तर याबाबत अधिक संशोधन झाल्यास निसर्गाच्या अनेक आश्चर्यचकीत करणाऱ्या बाबी आपल्याला कळू शकतील, असे मत या कोळ्यांवर संधोशन करणारे राजेश सानप व्यक्त करतात. बेंगळुरूच्या आंतरराष्ट्रीय जैवशास्त्रीय विज्ञान केंद्राच्या राजेश सानप आणि जॉन केलब यांनी हे संशोधन केले आहे. हे संशोधन जॅपनीज जर्नल ऑफ अरॅकनॉलॉजीने स्वीकारले असून ऑगस्ट महिन्यामध्ये ते प्रसिद्ध केले जाईल.

सानप यांना सन २०१५मध्ये आरे कॉलनीत पिरँथस डेकोरस हा कोळी दिसला होता. त्यानंतर २०१६मध्ये यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात आले. या कोळ्याची मादी या सर्वेक्षणात दिसली होती. सूक्ष्म निरीक्षणानंतर या प्रजातीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. १९व्या शतकातील संदर्भांच्या आधारे या संशोधनाला मान्यता मिळाली. हे दोन्ही कोळी झाडांच्या खोडामध्ये राहात असल्याचे दिसले आहे. सध्या हे कोळी दाट झाडाझुडपांमध्ये आढळून आले असले तरी पाऊस सुरू झाल्यावर त्यासंदर्भात आणखी माहिती मिळू शकेल. हे कोळी गवतामध्येही दिसू शकतात.

जम्पिंग स्पायडर

पिरँथस डेकोरस हा कोळी आपल्या जाळ्याच्या आधारे मोठे अंतर पार करतो. अशा प्रकारे तंतूंच्या आधारे अंतर पार करणाऱ्या कोळ्यांना जंपिंग स्पायडर असे म्हणतात. जागतिक स्तरावरील कोळ्यांपैकी सुमारे १३ टक्के कोळी हे जंपिंग स्पायडर प्रकारात मोडतात.

वन्यजीवांचा व्हावा विचार

विकासासाठी ‘आरे’तील वनसंपत्तीवर घाव घालताना किती लहानमोठ्या वन्यजीवांना धोका निर्माण होणार आहे. त्या दृष्टीने अभ्यास व्हावा अशी अपेक्षा सानप यांनी पिरँथस डेकोरसच्या निमित्ताने व्यक्त केली आहे.

Previous Article

मोदी शासनाची ३ वर्षे

Next Article

दहावीचा निकाल जाहीर: ‘कोकण’च इथेही अव्वल !

You may also like