श्रीरामनाम, रामरक्षा हे सारे केल्याचा फायदा….

Author: Share:

रम म्हणजे रमणे, तर रम या धातूला काना लावून म्हणजे त्याची शक्ती वाढवून जो शब्द बनतो तो म्हणजे राम…रमण्याची आत्यंतिक जास्त किंवा शेवटची अवस्था, म्हणजे “राम”. आपण म्हणतो की त्या गोष्टीत काही राम नाही, म्हणजेच तेथे रमण्यासारखे काही नाही. रमा [ सुंदर मादक स्त्री, जिच्यात मनुष्य रमतो ती, इथे विष्णूची पत्नी असा अर्थ घेऊ नये ] , रम [ दारू, सुरा, वारुणी, लिकर, विस्की, व्होडका, वाईन {लाल व पांढरी}, शाम्पेन] आणि रमी [ पत्ते, जुगार, मटका, कसिनो आणि सुखासाठी, आनंदासाठी खेळले जाणारे सर्व खेळ] या सगळ्या सुखाच्या साधनांमध्ये आपण “रमतो” त्यात “राम” असल्यानेच….तसेच “राम” हा शब्द “रं” या अग्निबिजा पासून बनला आहे. अग्नी पासून “रूप” मिळत. म्हणून “राम” हा दाढीमिशा रहित, सदा तरुण दाखविला आहे. राम या जपाने शरीरात, पोटात अग्नी उत्पन्न होऊन अन्न पचन सुलभ होते. पाठीच्या मणक्यातील क्रमांक तीनचे “मणिपूर” चक्र जागृत होते. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. मग ती चांगली का असेना!!!! म्हणून नुसत्या राम या जपाने शरीराचा दाह होण्याची शक्यता असल्याने त्याच्या मागे, “श्री” हा फिकट नारिंगी रंगाचा “फिल्टर” लावला आहे आणि “राम” या नावाला सौम्य केले आहे. तसेच “राम” या नावाला अजून सौम्य करण्या साठी “श्रीरामचंद्र” असेही म्हंटले जाते. चंद्र हा अतिशय सौम्य असल्याने “राम” या नावातील दाहकता त्यामध्ये कमी होते. श्री राम जय राम जय जय राम या मंत्रा मधेही हाच उद्देश आहे.
रामरक्षे मध्ये राम हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने प्रथमा पासून संबोधन पर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने चालवला आहे. आणि तो त्यात जवळपास ७७ वेळा येतो. रामरक्षा शेवटी म्हणते की विष्णूच्या सहस्रनामा एव्हढे सामर्थ्य केवळ “एका” राम नामात आहे. भूतबाधा, शारीरिक विकार यावर रामरक्षेचा पाठ केला आणि त्याचा अंगारा लावला तर उत्तम फायदा होतो असा अनेकांचा अनुभव आहे. पण उगाच एक वेळेस कोणतेही स्तोत्र म्हणून उपयोग होत नाही आणि होणार नाही. रात्री झोपण्यापूर्वी हात पाय धुवून एखादी मंद सुवासाची अगरबत्ती [मसाला” अगरबत्ती वापरा, कृत्रिम सेंट वाली नको. अगरबत्ती आपले मन प्रसन्न करण्यासाठी असते, देवाचे नव्हे. देव नेहमीच प्रसन्न असतो. तो अप्रसन्न झाल्यावर पूर, भूकंप,वादळे,परचक्र {परकीयांचे हल्ले}, मोठे अपघात, हत्या या गोष्टी होतात. कमीतकमी ११ वेळा रोज एक स्तोत्र म्हंटले तर उपयोग होतो अन्यथा निराशा पदरी येते. तरुणांनी एकत्र येऊन एखाद्याच्या घरी अथवा जवळच्या मंदिरात रामरक्षा, भीमरूपी स्तोत्र, बजरंग बाण, हनुमान चालीसा, अथर्वशीर्ष अशी स्तोत्रे सामुहिकरीत्या म्हंटली तर शक्तीचा “भौमितिक गुणाकार” [२ दुने चार, चार चोक सोळा अशाच पद्धतीने तिथे जेव्हढी उपस्थिती असेल गुणिले तेव्हढाच आकडा इतक्या प्रचंड प्रमाणात “रेसोनांस” म्हणजे “समस्पंद गती” होऊन या गुणाकारा एव्हढी शक्ती प्रत्येकाला मिळेल आणि तीही कुणाचीही शक्ती कमी न होता. याचा फायदा स्वत: ते तरुण, आपला समाज, आपला देश आणि मग सारे विश्व असा सगळ्यांना होईल….

रामरक्षेतील आपण जे म्हणतो “श्री हनुमान कीलकम “….तर हनुमान हे हा रामरक्षा मंत्र किंवा त्याच्या अर्थाचा दरवाज्यावर लावलेल्या कोड Language [सांकेतिक लिपी] च्या कडी किंवा अर्गलेतील अडकवलेला एक {जबरदस्त कीलक म्हणजे खिळा आहे}. जर आपल्याला हा “कीलक” काढता आला तर रामरक्षेचे गूढ नक्की उकलेल. हे वैदिक आणि याज्ञिक गुरुजींनो संशोधकांना मदत करा रे……

रामप्रभूंच्या चरणी एक प्रार्थना करून थांबतो. “हे रामप्रभू….तुम्ही आमच्या अंतर्यामी वसलेले आहात. आमच्या मनात, शरीरात, नगरात, राज्यात, देशात, जगात आणि साऱ्या विश्वात काय चालले आहे हे आपण चांगलेच जाणता. आणि अशा परिस्थितीत काय करायचे तेही जाणता….मग आता ऋषी, मुनी, योगी, ध्यानी, सिद्ध, जपी, तपी, संत, महंत आणि देवांच्या अवतारांच्या या भूमीत हे दुर्दैवाचे दशावतार का? तुमचेच मंदिर पाडणारे, तुमचा हृदये जोडणारा सेतू या भारतात आहेत. आणि हा सेतू तोडणारया यांत्रालाच ते “हनुमान ” यंत्र असे नाव देतात? यापेक्षा काही जास्त आम्हाल अजून बघावे लागणार आहे का प्रभू? अधर्मी माणसे कुचकटपणे विचारतात की तुमच्या “रामाला” स्वत:चे मंदिर आणि सेतू वाचवता आला नाही? मग तो तुम्हाला काय वाचवणार….आमच्या हृदयात, मन आणि मनगटात आता काही “राम” राहिला नाहीये का राघवा ? हे दशरथनंदना या देशात “रथी महारथी” असूनही “साथीचा” रोग आल्याप्रमाणे माझेच बांधव स्वत:च्याच बांधवांशी भांडून चुकीच्या मार्गाने आणि चुकीच्या नेत्यांच्या मागे का जात आहेत? तुमचे “धनुष्यबाण” आणि तुमचाच अवतार श्रीकृष्ण श्रीकृष्ण यांचे “सुदर्शन चक्र” आता अडगळीत पडले आहे का कौसल्यासुता? तुम्हाला आणि कृष्णाला आम्ही फक्त प्रतिमेत, तसबिरीत आणि मूर्तीत पुजायचे का? तुमचा आदर्श, शक्ती, युक्ती, शौर्य आम्हाला प्राप्त होणार नाहीये का? असे म्हणतात की रामायणातून कसे वागावे हे शिकावे आणि महाभारतातून कसे वागू नये हे शिकावे…..हे मर्यादा पुरुषोत्तमा आम्हाला सर्वांना हे ओळखण्याची बुद्धी दे….चुकलेल्यांना योग्य मार्ग मिळू दे…..सर्वांना सुखा समाधानात आणि आनंदात ठेव….तुझे नाम सर्वांच्या मुखात आणि काम सर्वांच्या हातात सदैव असू दे….या विश्वात कोणीही उपाशीपोटी निजू नये….आणि गर्वाने जागा होऊ नये….आणि या अत्यंत प्राचीन वैदिक धर्माची पताका पुन्हा एकदा नव्या तेजाने विश्वात फडकू दे……..रे महाराजा…….

रामा चरणी जाऊ शरण , मस्त होऊ नामस्मरणी
कोणासाठी साई आहे, दत्तनाम कुणा वाणी…

कोणी म्हणे येशू ख्रिस्त, कोणी म्हणे त्याला अल्ला…
हेतू एक इथे आहे, देवाजीच्या नामी डल्ला……

कुणी म्हणतो लक्ष्मी त्याला, विष्णू कृष्ण कोणी म्हणे
कुणा बुद्धमहावीर, त्याच्या कडे अंती जाणे….

मूर्तीपूजा ही पहिली, पायरी रे साधनेची,
साधनेच्या बळे मिळे , अंती पायरी मोक्षाची

त्रेतायुगी राम जिंके, क्रोध, राग दुर्गुणाला,
डावा पाय पुढे सांगे, ओळख रे या खुणेला ….

मोडलेले धनुष्य हे, एक प्रतिक योगाचे,
मणक्याला साधनेने, मोडा पुन्हा जोडायाचे ….

परावाणी जागल्याने कबीराच्या हाती काम
राम हमारा जप करे, हम बैठे आराम….

अंती एव्हढे सांगणे, उठा उठा रे बंधुंनो,
कलादास म्हणतो हे, आता जागा रे सारयांनो …..

 

लेखक: डॉ. हेमंत सहस्रबुद्दे

Previous Article

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला श्रीलंकादहन

Next Article

गरिबी आणि न्यू इंडिया एकमेकांना पूरक नाहीत- राष्ट्रपती

You may also like