व्यंगनिबंधकार राज आणि मनसे

Author: Share:

राजसाहेबांची बरीच भाषणे ऐकलीत.राजसाहेबांच्या व्यंगचित्र बघून सुचलेले हे शीर्षक अन सततची त्यांची मोदीसरकारवरच एक रट लावावी तशी त्याच विषयांवर काढलेली व्यंगचित्रे. व्यंगचित्र हे लेखकाने २००० शब्द रंगाची अन व्यंगचित्रकाराने एकच व्यंगचित्र काढावे. पण हल्ली राज यांचे व्यंगचित्र नसून ते व्यंगनिबंधच जास्त वाटतात. असो पण २००६ सालची मनसे,त्यांनंतरचे मनसेचे यश आणि मनसेची अधोगती.हे जाणून घेणे तेवढेच गरजेचे कारण आज महाराष्ट्राच्या निवडणुकीतील एकेकाळचा किंगमेकर आणि आजचा नकोरे मेकर असच म्हणावे लागेल.
९ मार्च २००६ रोजी स्थापना झालेली मनसे आणि आजच्या मनसेत खूपच फरक दिसून येईल.

एकाच मुद्द्यावर खेळवून ठेवणारे राज आज लोकांना कंटाळवाणे वाटतात कारण आज जनतेला विकास हवा आहे महाराष्ट्राच भलं करणारा नेता हवा आहे. पण राज यांच्या भाषणात नेहमी एकच मुद्दा जोर धरतो तो म्हणजे परप्रांतीय लोंढे. आज संपूर्ण भारतात कुणालाहि कुठेही संविधानात राहण्याचा हक्क असताना त्यांना महाराष्ट्र सोडून जा. म्हणने कितपत योग्य जे परप्रांतीय पोटाची खळगी भरण्यासाठी एवढ्या लांब मुंबई पुणे सारख्या शहरात येतात. ते येऊन उद्योग धंदे करतात का मराठी माणसाला कोणी थांबवलंय उद्योग धंदे करन्यापासून सुरु करा उद्योग धंदे.


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 


माणसाला एकच पद्धतीचे जेवण दररोज दिले तर ते काही काळ माणूस जेवतो पण नंतर त्याला त्याचा कंटाळा येतो अन तो नवीन काहीतरी मिळेल याच्या शोधात जास्त असतो. तसलीच काहीशी अशा सुरुवातीला लोकांना मनसेकडून होती पण काहीकाळानंतर जनता हुशार झाली आणि मनसेला विसरण्यापलीकडे जनतेसमोर पर्याय नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे मतांतील विभाजन. २००९ च्या निवडणुकीत १३ जागाजिंकून महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळाच ठसा उमटवला. भाजप सेनेचीच मते विभागली गेली आणि २००९ ची निवडणूक भाजप सेनेला पराभव पचवावा लागला. मनसे लोकांचा विश्वास संपादन करण्यात नापास झाली.

राज साहेबांचे भाषण शैली काही औरच आहे. पण नुसत्या भाषण शैलीने जनता आकर्षित नाही होत तर तेवढ्या हिमतीने कामही करणे गरजेचे. नाशिककरांनी आज साहेबांवर विश्वास दाखवला आणि नाशिक महानगर पालिका मनसेच्या ताब्यात दिली. पण पाच वर्ष्यात जनतेची कामे करण्यात राजसाहेब आणि राजसाहेबांनी जनता पूर्णपणे नापास झाली.तो राजसाहेबांच्या छापील कागद अन ते नियोजन कागदावरच राहिले ते प्रत्येक्षात उतरले नाही.

राज साहेबांच्या मोदी मुक्त भारतच्या नार्याला हि काहि अर्थ उरत नाही. राज यांचे सर्वीकडे पराभव होत आहेत. आज राजसाहेबांच्या एकच आमदार एकाच महापौर नगरसेवकही बोटावर मोजण्याइतपत राहिले असताना राजसाहेब मोदिमुक्त भारताचा नारा देतात. २१ ते २२ राज्यात ज्या पक्षाचे सरकार आहे. मग मोदी मुक्त भारत कसा होणार. राजकारणात भाषणात बोलणे आणि प्रत्येक्षात समाजात जाऊन काम करणे खूपच कठीण. बुलेट ट्रेन पासून तर नाणार पर्यंत सर्वीकडे नकोरे पूराण ऐकायला मिळत आहेत. ह्या गोष्टींवर राजकारण का ? का तुम्हाला सत्तेबाहेर बसून जनतेची प्रगती झालेली महाराष्ट्राची प्रगती झालेली सहन नाही होता. भाषणात तुफान फटके बाजी करणे. मिमिक्री करणे भाषणात लोकांचे मनोरंजन करणे. या साऱ्या गोष्टींमुळे लोक मतदान करत नसतात. सभेतील गर्दी मतात परिवर्तित नाही होत.

२०१४च्या निवडणुकीत उद्धव साहेबांना टाळी देण्याचे जाहीर केले पण खुद्द उद्धव साहेबांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. आता राज साहेब एक हाती सत्तेसाठी जनतेसमोर हात पसरवत आहेत. जनतेने १३ आमदार १ महानगर पालिका देऊन हि तुम्ही जनतेची किती कामे केलीत तेव्हा तुम्हाला जनता महाराष्ट्राचे पालक बघेल महाराष्ट्राची सत्ता तुमच्या हातात देईल.? जनतेला नुसत्या भूल थापानी जनता मत देत नाही.
२०१९ च्या निवडणुकीत हि राज यांना फार यश मिळेल असे दिसत नाही कारण पक्षाला दिशा, पक्षाचे धोरण, पक्ष संघटन यातील कमकुवत पण आणि मनसेतून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या फार त्यामुळे अजून बरीच निवडणूका राज यांच्या पक्षाला भवितव्य नाही. राजसाहेबांनी नवनवीन उपाययोजनाही नापास झाल्या आहेत. २००६ मध्ये राज साहेबांच्या पक्षाचं पक्ष संघटन खूपच मजबूत होते पण २००९ नंतरच्या १३ आमदाराच्या गुंडगिरीने विधानभवनातील दादागिरी लोक चांगलेच जाणून आहेत. १३ आमदारांच्या मतदारसंघातील प्रगती विकास चांगलाच लोक जाणून आहेत.

राज साहेब हे सारासार विचार न करता सरळ मोदींच्या वर आपल्या व्यंगचित्राने टीका करतात. एकी कडे विकासाला आडकाठी करणे आणि दुसरीकडे विकासाला मोदींचे लहान बाळ दाखवून त्यावर टीका करणे. त्यावर खूप मोठे निबंध लिहिणे. प्रकल्पांना विरोध करणे, नाणार प्रकल्पाला विरोध करणे आणि पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या भावांवर आंदोलनं करणे असल्या चुकीच्या वागणुकीलाच जनता उत्तर दिल्याशिवाय राहत नाही.

राज साहेबानी बुलेट ट्रेन का नको? नाणार प्रकल्प का नको? याचे उत्तर राजसाहेब उत्तर देतील का?

लेखक: विरेंद्र सोनावणे


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 


Previous Article

माझं पहिलं प्रेम

Next Article

राहुलजींची १५ मिनिटे आणि पार्श्वभूमी !

You may also like