माझा पाऊस आज गहिवरला

Author: Share:

खिडकीच्या काचेवर कुणीतरी खट खट आवाज करून मला बोलावत होत. कामात मग्न मी, दुर्लक्षित करत होतो तो आवाज… नव्या स्वप्नांचा विचार करत असताना कोणीतरी रुसलाय आपल्यावर असं वाटत होत. खिडकी वर पुन्हा ठोठावल्याचा आवाज आला…
मी पुन्हा दुर्लक्षित केलं, स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडायला मला वेळच नव्हता. मी पुन्हा माझ्या कामात रुजू झालो…

पुन्हा कोणी तरी खिडकी वाजवत होत,,,,
मला राग आला…
मी ताडकन उठलो,
माझा राग अनावर झालं,,
मी खिडकी पाशी गेलो,,,
कुणीतरी जोरात रडतंय असा आवाज येत होता ….
मी धावत खाली गेलो ….
जोराचा पाऊस….
मी आडोशाला थांबलो….
चिंब भिजलेली झाडाची पाने माझ्यावर वर्षाव करीत होती…. ती थंड हवा मला आपलंसं करीत होती…

आणि अचानक,

मला आवाज आला …..
का रे रुसलास माझ्यावर ???माझं काय चुकलं का ? मी तुझ्या आठणीतला लहानपणीचा दोस्त, आठवतंय,
तुला आठवतंय का रे लहानपणी आपण एकत्र खेळायचो, तू कविता म्हणायचास येरेयेरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा
मी बरसायचो तू चिंब भिजायचा,
पापा तुला माझ्याबद्दल वाईट साईट काही पण सांगायचे,, मी चांगला नाही,,, माझ्यामुळे तू आजारी पडशील, पण तू सगळ्यांना झिटकरून माझ्याजवळ यायचास..

आपण आपली दुःख विसरून एकत्र खेळायचो, मी बरसायचो.

हो, बरसायचो…
कारण तुला नाचताना मला बघायला मिळायचं ,

तू होड्या कारायचास ,
मनसोक्त होऊन मला एकरूप व्हायचास… किती छान वाटायचं…
खरंच खूप छान वाटायचं….. हेच तुझं रूप बघण्यासाठी मी दरवर्षी आठवणीने बरसायचो, तुला शोधायचो.. तुझी वाट बघायचो…पण तू अजून पर्यंत आलाच नाहीस…. पण, एक विचारू का,


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


आता काय झालं ? नक्की??
खरंच कळेल का रे मला ?
माझा एवढा तिरस्कार का?
तू मोठा झालास, मला आनंद झाला, नव्या स्वप्नांना गवसणी घालतोय हे बघून सुद्धा बरं वाटलं, पण मित्रा माझं काय ? मला मात्र एकटं टाकलंस, खरंच, मला कळेल का काय चुकलं माझं ? अरे, तुझ्या कवित्येत पण बदल झालाय रे हल्ली,, rain rain go away काय झालं असं ज्यामुळं तू मला दुरावलंस, नक्की तू मोठा झालायस कि मी वृद्ध ,,,,, लहानपणी निरागस होऊन एकरूप व्हायचास खट्याळ उड्या मारायचास, आता कदाचित educated झालायस तू तुझ्या त्यावेळच्या पापांसारखंच.
मला मुक्त व्हावंसं वाटतंय रे, खरंच मला मुक्त व्हायचंय, पण मला मुक्त व्हायला माझ्यात न्हायला तू आलाच नाहीस रे, होड्या पण दिसेनाश्या झाल्यात,
असो……
पण मित्रा,
एक सांगू का,,,
आयुष्यात कधीही कुठेही
जेव्हा तुला कोणी दुखावेल ना,,
जेव्हा तुला कोणी नाराज करेल,
एकटेपणा वाटेल, तेव्हा तुझ्या व्यस्त आयुष्यातून थोडा वेळ काढून मला भेटायला येशील, मी तुझी वाट बघतोय

मी गहिवरलो, खरंच, मी पळत सुटलो अव्यक्त भावनांनी त्या माझ्या जुन्या मित्राला भेटायला आणि अलींगण दिलं, काळीज गहिवरले, नभ हि दाटून आले, मला माझ्या बालपणात असल्याचा भास झाला,
मेघास त्या आज अश्रू अनावर झाले, माझिया आसवांना मी मुक्त केले, कोणी त्याला पाऊस म्हणाले तर कोणी काही….. पाऊस रडत होता आणि पावसात मी……
आम्ही दोघे इतके एकरूप झालोय कि नभ अश्रू ढाळतोय कि माझ्या डोळ्यातून पाऊस पडतोय हेच कळत नव्हतं, आज आसवांच्या पाऊसात चिंब भिजतोय, खरंच माझा लहानपणीचा पाऊस मला भेटायला आलाय…

तुम्हाला पण आठवतोय ना आपला लहानपणीचा पाऊस या कि एकदा भेटून आणि जमलंच तर व्यक्त व्हा, मुक्त व्हा.

लेखक: ओंकार नंदकुमार करळे
संपर्क: ८१४९२६८०१६


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


Previous Article

नांदगाव येथील महाविद्यालयात क्रांतीज्योती महात्मा फुले जयंती साजरी

Next Article

शहीद शुभम मुस्तापुरे

You may also like