घाटमाथ्यावर दोन दिवसांपासून सुरु झालेल्या श्रावणसरींमुळे पिकांना जीवदान

Author: Share:

जातेगाव: नांदगाव तालुक्यातील पूर्वभाग म्हणजे घाटमाथा या परीसरात चालू हंगामात अगदी वेळेवर जून महिण्यात सुरु होणार्‍या मृग नक्षत्रापासून वरुण राजाने वेळोवेळी हाजरी लावल्यामुळे या परीसरातील नगदी पिके असलेल्या कपाशी व मका यासह मुग, मट, कुळीद, ऊडीद, बाजरी ईत्यादी धान्य कडधान्यांची पिके सुरुवाती पासुनच जोमात होती. परंतु विस दिवसांपासून पावसाने अचानकच ऊघडीप दिल्याने व ऊन्हाळ्या सारखा ऊन पडायला लागल्याने सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत पिके कोमेजून जात होती. मुरमट जमिनीतील पिके करपू लागली होती. तर काळपोटी तग धरुन ऊभी होती परंतु जमिनीस मोठमोठ्या भेगा पडायला सुरुवात झाली होती.

सुरुवाती पासूनच पिकांना पोशक असा पाऊस होत असून मोठा पाऊस झाला नसल्याने परीसरातील नद्या नाले ओसांडून वाहिले नसल्याने पाझर तलाव, नाला बंडींग, माती बंधारे, सीमेंट बंधारे ईत्यादींना पाणी न आल्याने ज्यांच्या शेतात विहीरी आहे. त्यांनाही मुबक पाणी नसल्याने जेमतेम पाणी पिण्यासाठी व जनावरांसाठी राखीव ठेवले होते. असे वाटायचे की तोंडाशी आलेला घास निसर्ग हिसकावून घेत आहे. परंतु गेल्या दोन दि्वसांपासून श्रावणाच्या सरते शेवटी श्रावणसरींना सुरुवात झाल्याने पिकांनाही जिवदान मिळाले असून शेतकरी बांधवाचा सच्चा साथी असलेल्या सर्जा राजाच्या पोळा या वार्षीक सणाची खरेदी शेतकरी बांधवांनी मनमोकळी केली व सर्जा राजाचा बैल पोळा सण गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरु असल्याने व येथील पिके सुरुवाती पासूनच पाऊस चांगला असल्याने शेतकरी बांधवांनी उत्सहात साजरा केला.

येथे सार्वजनिक पोळा, माळी समाजाचा व धनगर समाजाच्या बैलांचा स्वतंत्र असे तीन पोळ्यांची पारंपारीक ढोलताशा या वाद्याच्या गजरात व आतीषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली होती. अजूनही या पावसावर पिके तर येतील, परंतु मोठा पाऊस न झाल्याने परीसरातील विहीरींनी तळ गाठलेले असून मोठा पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

बातमी: अरुण हिंगमिरे

Previous Article

हीच ती वेळ हाच तो क्षण…समान नागरी कायदा

Next Article

तलाक़

You may also like