रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी दिला राजीनामा: मोदींनी सांगितले थांबायला

Author: Share:
दोन मोठ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे अध्यक्षांनी राजीनामा दिल्याच्या पाठोपाठ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सुद्धा नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याने, दिल्लीमधील वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र अजून पंतप्रधानांनी त्यांना थांबायला सांगितले आहे. सुरेश प्रभू यांनी ट्विटर वरून हि माहिती सांगितली.  
बुधवारी उत्तरप्रदेशमध्ये कैफियत एक्स्प्रेस चे डबे घसरून झालेल्या अपघातात ७० जण जखमी झाले होते तर शनिवार मुझफ्फरनगर मध्ये उत्कल एक्स्प्रेस ला झालेल्या अपघातात २३ मृत्युमुखी आणि १०० हुन अधिक जखमी झाले होते. 
त्यामुळे व्यथित होऊन आपण नरेंद्र मोदी यांना राजीनामा दिला मात्र त्यांनी आपल्याला थांबायला सांगितल्याचे प्रभूंनी ट्विटर वर सांगितले आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली २ दशकातील रेल्वेच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. दोन गुंतवणूका रेल्वेत झाल्या असाही उल्लेख प्रभूंनी ट्विट मध्ये केला आहे. 
Previous Article

नंदन निलकेणी देणार इन्फोसिस ला ‘आधार’ ?

Next Article

जोगेश्वरीच्या चिंतामणीचे जल्लोषात स्वागत

You may also like