जिल्हा नियोजन समिती बैठक : रायगड जिल्ह्यासाठी २५५ कोटींचा २०१८-१९ चा जिल्हा विकास आराखडा मंजूर

Author: Share:

अलिबाग : जिल्हा वार्षिक योजनेच्या सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता रायगड जिल्ह्यासाठी १७४ कोटी ७० लक्ष रुपयांच्या विकास आराखड्यास आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस मान्यता देण्यात आली. राज्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक पार पडली. यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचे पालकमंत्र्यांनी स्वागत केले.

जिल्हा नियोजन समितीची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रकाश महेता हे उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सर्वश्री जयंत पाटील, आमदार सुरेश लाड, भरत गोगावले, सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, धैर्यशील पाटील, मनोहर भोईर, प्रशांत ठाकुर, जि.प. उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील तसेच जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे, जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे तसेच सर्व विभागांचे प्रमुख आदी उपस्थित होते.

२०१९-१९ च्या आराखड्यास मंजुरी

यावेळी सन २०१८-१९ साठीचा जिल्हा विकासाचा जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा सादर करण्यात आला. त्यात जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनेअंतर्गत १७४ कोटी ७० लक्ष रुपयांचा आराखडा असून विशेष घटक योजनेअंतर्गत २४ कोटी ६६ लक्ष ७५ हजार रुपयेआदिवासी उपयोजनेसाठी ५५ कोटी ९५ लक्ष ३४ हजार रुपयांचा असा एकूण २५५ कोटी ३२ लक्ष हजार रुपयांचा आराखडा मांडण्यात आला.

ग्रामीण रस्त्यांसाठी भरीव तरतूद

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे तसेच रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी ३३ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. तर शाळा दुरुस्तीसाठी कोटी, आरोग्य सुविधा, दवाखाने आदींसाठी 8 कोटी रुपये तर पशुसंवर्धन विभागासाठी कोटी रुपये, वन विभागासाठी १३ कोटी तसेच जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची कार्यालये बांधणे, गावांत स्मशानभूमि बांधणे आदींसाठी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

जिल्ह्याच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र बैठक

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विकासकामांसंदर्भात येत असलेल्या अडचणी व प्रश्नांसंदर्भात लवकरच एक सर्वसमावेशक बैठक घेण्यात येईल, असे श्री. महेता यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या सभेत विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्ह्यात उभारण्यात येत असलेले जिल्हा नियोजन भवनाचे काम ३१ मार्च पर्यंत पूर्ण करुन नियोजन भवन कार्यान्वित करण्यात यावे, असे निर्देशही पालकमंत्री श्री. महेता यांनी दिले.

तीन पर्यटन स्थळे ‘ब’ वर्गात समाविष्ट करण्यासाठी ठराव

जिल्ह्यातील शिवथरघळ ता. महाड, मुरुड, आणि विन्हेरे ता. महाड येथील झोलाई देवस्थान या पर्यटनस्थळांचा ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळांत समावेश करण्यात यावा असा ठराव मंजूर करुन तो शासनाकडे पाठविण्यात आला.

महाराष्ट्र वार्षिकी’ देऊन नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत

आजची बैठक ही जिल्हा नियोजन समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिलीच बैठक होती. या सर्व सदस्यांचे स्वागत गुलाबपुष्प व महाराष्ट्र वार्षिकी हे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेले पुस्तक देऊन करण्यात आले. यावेळी श्री. महेता म्हणाले की, नवनिर्वाचित सदस्यांनी हे पुस्तक वाचावे, जेणे करुन या अभ्यासपूर्ण पुस्तकातील माहितीचा उपयोग सदस्यांना जिल्ह्याच्या नियोजनात योगदान देताना होईल.

बातमी साभार: महान्यूज 
Previous Article

मंत्रिमंडळ निर्णय : महिला उद्योजकांसाठी राज्याचे विशेष धोरण

Next Article

महिला बचत गटाने शोधली प्रगतीची वाट: जुट प्रक्रियेतून 2 लाखांची विक्री

You may also like