राहुलजींची १५ मिनिटे आणि पार्श्वभूमी !

Author: Share:

कॉग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी ह्यांना १५ मिनिटे बोलायचे आहे ० आपण १५ मिनिटे लोकसभेत बोललो तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना मान वरून करून माझ्याकडे बघण्याचे धैर्य होणार नाही असा दावा त्यांनी केला आहे ० पण बोलायची संधी दिली जात नाही अशी त्यांची तक्रार आहे ० थोडक्यात राहुल गांधी ह्यांना लोकांशी सुसंवाद साधण्याची इच्छा झाली आहे ० हे चांगले लक्षण आहे ० त्यानिमित्ताने ते तेव्हढा काळ तरी भारतात राहतील ० ह्याचा लाभ आपण उठविला पाहिजे ० भारताची संसद प्रगल्भ आहे ० संसदेच्या माध्यमातून लोकशाहीचे रहस्य अभिव्यक्त करण्याचे शास्र विकसित झाले आहे ० लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन ह्यांच्याकडून ते त्यांना समजून घेता येईल ० प्रमिला दंडवते जेव्हा प्रथम लोकसभेवर निवडून गेल्या तेव्हा रामभाऊ म्हाळगी ह्यांनी पुढे येऊन त्यांची भेट घेतली होती आणि अनौपचारिकपणे गप्पा मारून त्यांचा धीर वाढविला होता ० लोकसभेतील आयुधे कशी वापरावयाची ह्याचा एक प्रकारे प्रशिक्षण वर्ग त्यांनी घेतला ०.

स्वतः दंडवते ह्यांनी म्हाळगींच्या शोकसभेत हा अनुभव सांगितला होता ० तसे प्रशिक्षण सुमित्रा महाजन ह्यांच्याकडून राहुल गांधींना औपचारिक आणि अनौपचारिक पद्धतीने मिळू शकेल ० थोड्या नम्रतेने हे काम होऊ शकेल ० त्यासाठी मोदींचा उद्धार करण्याची आवश्यकता नाही ०
नेहरू ,त्यांचा परिवार आणि त्यांची संस्कृती ह्यात वाढलेले पंतप्रधान आणि मोदी ह्यांचे पंतप्रधानपदावर झालेले आरोहण ह्या दोन कालखंडात लोकांची मानसिकता पुष्कळशी बदलली आहे ० लोक पूर्वी विचारत नव्हते ते प्रश्न आता विचारावयास लागले आहेत ० मोदींनी त्यांना प्रगट सभांतून आणि त्यांच्या ‘ मनकी बात ‘ कार्यक्रमातून तशी जिज्ञासा त्यांच्यात निर्माण केली आहे ० राहुल गांधींना अध्यक्ष म्हणून आपला थोडाफार प्रभाव लोकांवर टाकायचा असेल तर लोकांची मानसिकता आता बदलली आहे आणि ते आपल्याला कोणताही प्रश्न विचारू शकतात ह्याचे विस्मरण त्यांनी होऊ देऊ नये ०

राहुल गांधी ह्यांना बोलायचे आहे आणि त्याचे मोदी ह्यांनी स्वागत केले आहे ० हातात कागद न घेता कोणत्याही भाषेत १५ मिनिटे सलग न थांबता बोला असे मोदींनी त्यांना समजावले आहे ० मोदींचा उद्देश राहुल गांधी ह्यांचा उत्साह वाढावा असा आहे ० पण त्यामुळे काही पत्रकार मोदींवर चिडले आहेत ० मोदी दीड तास सुद्धा उत्स्फूर्त भाषण देऊ शकतात पण ते खोट्या आश्वासनांनी भरलेले असते अशी टीका ह्या पत्रकारांनी सुरु केली आहे ० काँग्रेस सरकारांनी सत्तर वर्षात निर्माण केलेली घाण मोदी एकाग्रपणे आणि प्रामाणिक हेतूने साफ करत आहेत ० तरी काही विघ्नसंतोषी लोक त्यांच्याकडे चार वर्षाचे हिशेब मागत आहेत ० ख्रिश्चन लाँबीपुढे मान तुकवून आपले अग्रलेख मागे घेणाऱ्या पत्रकारांना दुसऱ्यांना जाब विचारण्याचा अधिकार नसतो ० म्हणून मानसिकता बदलायचे काम म्हणजे मोदी नेमके काय करीत आहेत ते सांगण्यापुरता आजचा लेख आहे ०


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 


भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे मोहनदास गांधी आणि जवाहरलाल नेहरू हे दोन मुख्य सूत्रधार होते ० त्यांनी ह्या चळवळीचा जसा बट्याबोळ केला तसा जगातील अन्य कोणत्याही चळवळीचा केला गेला नसेल ० स्वातंत्र्य चळवळीचे पर्यवसान फाळणीत झाले ० भारताने स्वतंत्र होण्याआधी आपल्या हाताने सार्वभौम शत्रूराष्ट्र निर्माण केले ० बाराशे वर्षे हिंदू मुसलमानांशी लढत होते पण ह्या हिंदू भूमीवर मुसलमानांना त्यांचे स्वतंत्र राष्ट्र स्थापन करण्याचा अधिकार हिंदूंनी कधीही मान्य केला नव्हता ०

मुसलमानांनी जसा हिंदूंचा अनन्वित छळ केला तसा सोडाच पण अन्य कोणत्याही प्रकारचा छळ हिंदूंनी मुसलमानांचा केला नाही ० प्रत्येक गोष्टीत हिंदूंशी फटकून वागण्याचा हट्ट सोडून आणि हिंदू भावविश्वाला धक्का लागणार नाही ह्याची काळजी घेत शांतपणे आणि सभ्यपणे मुसलमान हिंदुसमवेत सहजीवन सुखाने उपभोगू शकतील अशी हिंदूंची धारणा होती ० पण त्यामुळे मुसलमानांना दुय्यम स्थान प्राप्त होते असा विचार गांधी-नेहरू ह्यांच्या मनात येऊन ते अस्वस्थ होत ० त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी मुसलमानांना पाकिस्तानची भेट देण्याचे ठरविले ० तेव्हढ्याने त्यांचे समाधान झाले नाही ० म्हणून त्यांनी स्वातंत्र्यलढा संपल्यावर काश्मीरचा मोठा भूभाग पाकिस्तानला दिला ०

नेहरूंनी काश्मीरचे दोन भाग केले ० एक भाग पाकिस्तानातील आणि दुसरा भाग भारतातील मुसलमानांना दिला ० काश्मीरपासून हिंदूंनी दूर राहावे अशी स्पष्ट धमकी नेहरूंनी दिली ० तरीही काश्मिरात हिंदू त्यांचे अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत हे पाहून चिडलेल्या काँग्रेस संस्कृतीने हिंदूंना गर्भगळीत करण्यासाठी काश्मिरी पंडितांना त्यातून नेसत्या वस्त्रानिशी हाकलवून दिलेले पाहण्याची सवय लावली ० ० काश्मीर खोऱ्यात हिंदूंचा निर्वंश होईल अशी व्यवस्था केली ० काश्मीरातील मुसलमान भारतात राहावे असे वाटत असेल तर त्यांच्या पालनपोषणाचे सगळे दायित्व हिंदूंनी त्यांच्या खांद्यावर घेतले पाहिजे अशी रचना नेहरूंनी आणि काँग्रेस संस्कृतीने केली ० ह्या विषयात लोक राहुल गांधींना प्रश्न विचारणार आहेत ह्याची कल्पना त्यांना असली पाहिजे ०

जर एकाही हिंदूला फाळणी नको होती तर फाळणी कशी झाली ? पारतंत्र्यातील शेवटच्या निवडणुकीत अखंड भारताचे आश्वासन गांधी आणि नेहरूंनी हिंदूंना दिले होते तरी पुढच्या सहा महिन्यात फाळणी कशी झाली ? फाळणी रोखण्यासाठी गांधींनी एकदाही उपोषण का केले नाही आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे सहकार्य का घेतले नाही ? गांधी जिनांना वारंवार भेटत होते मग ते एकदाही सावरकर नि गोळवलकर यांना का भेटले नाहीत ? ह्या प्रश्नांची उत्तरे राहुल गांधी ह्यांना द्यावी लागतील ० असे अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत की ज्यांचे स्वातंत्र्य चळवळीच्या फलनिष्पत्तीविषयी समाधान झालेले नाही ० पण ते गांधी आणि नेहरूंच्या वैचारिक दडपणामुळे आपले मनोगत बोलू शकत नाहीत ० राहुल गांधी ह्यांना ज्याअर्थी भारतीयांशी सुसंवाद साधण्याची इच्छा होत आहे त्याअर्थी भारताच्या विभिन्न समस्या जाणून घेण्याची इच्छाही त्यांना होत असावी असा तर्क करायला थोडीफार जागा मिळू शकते ० म्हणून हिंदु-मुसलमान प्रश्न नेमका कसा आहे ते पाहू ० पुढील आठवड्यात कर्नाटक विधानसभेची निवडणूक आहे ० म्हणून त्या पार्श्वभूमीवरचे टिपू सुलतानाचे उदाहरण घेऊ ०

पेशवाईत हरिपंत फडके ह्यांच्या सेनापतीत्वाखाली टिपू सुल्तानाशी युद्ध होऊन त्यात टिपू मारला गेला ० राजवाड्यात टिपूचा किशोर वयाचा मुलगा भयभीत अवस्थेत लपून बसलेला आढळला ० फडक्यांनी त्याला पोटाशी घेऊन तो एरव्ही जसे राजेशाही भोजन घेत असेल तसे भोजन करवून घेऊन त्याला खाऊ घातले ० विजयी होऊन फडके पुण्यास परतत असतांना टिपूने बाटविलेल्या हिंदूंनी आम्हाला शुद्ध करून परत स्वधर्मात घ्या अशी करूणा त्यांच्याकडे भाकली ० परंतु धार्मिक प्रत्याक्रमण हा विषय तेव्हा राज्यकर्त्यांच्या विषयपत्रिकेवर नव्हता ० असे विषय शिवाजी महाराजांना अग्रक्रमाने हाती घ्यावेत असे वाटत असे ० शुद्धी हे त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीचे एक उद्दिष्ट होते ० स्वातंत्र्य चळवळीत शिवाजी महाराज हे काँग्रेस संस्कृतीचे कधीच आदर्श नव्हते ० म्हणून काँग्रेस संस्कृतीने हिंदू आणि मुसलमान ह्यांचे मनोमीलन होईल असा प्रयत्न प्रामाणिकपणे कधी केला नाही ० काका गाडगीळ ह्यांचे वैचारिक लिखाण वाचले की तसा ग्रह होतो ०

हे वातावरण मोदींना बदलायचे आहे ० हिंदू-मुसलमान ऎक्याचा प्रयोग १८८५ पासून अत्यंत अनैसर्गिकपणे आणि अव्यवहार्यपणे भारतात राबविला जात आहे ० बाबरी मशीद पडल्यानंतर काँग्रेसच्या काही आमदारांनी नागपूर विधान भवनात त्या घटनेचा अन्वय आणि अर्थ समजावून सांगण्यास मला पाचारण केले होते ० मी त्यांना म्हटले की , ” तुमच्यापैकी बहुतेकांचे साखर कारखाने असतील ० उसाचा शर्करांश अपेक्षेइतका आला नाही की तुम्ही अस्वस्थ होता ते मला माहीत आहे ० तुम्ही लगेच चौकशीला बसता आणि मुळापर्यंत जाण्यासाठी ऑडिटिंगला सुरवात करता ० हिंदू-मुसलमान ऐक्य नावाचा साखर कारखाना आहे असे आपण धरून चालू ० ह्या कारखान्याचे ऑडिटिंग स्थापनावर्षापासून म्हणजे १८८५ पासून आजपर्यंत म्हणजे १९९२ पर्यंत एकदाही झालेले नाही ० तशी मागणी करण्याचे धाडस तुमच्यात नाही ० कारण ह्या कारखान्याचे जे सूत्रधार आहेत त्यांना हा कारखाना तोट्यातच जायला हवा आहे ०

” माझे म्हणणे काँग्रेस आमदारांना पटले ० परंतु बदल करण्याच्या दृष्टीने काही कृती करण्याची इच्छा त्या आमदारांची दिसली नाही ० विषय तेथेच राहिला ० हा ऑडिटिंगचा विषय पुढे २२ वर्षांनी म्हणजे मोदी पंतप्रधान झाल्यावर हातात घेण्यात आला ० भारताची सार्वभौमता, अखंडता आणि स्वतंत्रता अभंग राहण्यासाठी सामाजिक समरसता निर्माण व्हायला हवी आणि सगळ्यांना विकासाचा ध्यास लागायला हवा ह्या एकाच ध्येयाने मोदी पहिल्या दिवसापासून काम करू लागलेले दिसतात ० त्यामुळे ज्यांची दुकाने बंद होऊ लागली आहेत ते लोक आपला आवाज दाबला जातो आहे अशी ओरड करतांना दिसतात ० मोदी मुसलमान,महिला आणि मागासवर्गीयांच्या विरोधात आहेत अशी त्यांची प्रतिमा निर्माण करण्याचे प्रयत्न सर्वप्रकारची कटकारस्थाने करून केले जात आहेत ०

परंतु सर्वांगीण ऐहिक विकासाचा कार्यक्रम राबवून मोदी सामाजिक समरसता निर्माण करणार आणि जागतिक रंगमंचावर भारताला मानाचे स्थान प्राप्त करून देणार असे त्यांचा आजपर्यंतचा इतिहास पहिला की म्हणता येते ० राहुल गांधींच्या १५ मिनिटांना त्यांच्या पणजोबांनी केव्हढी लांबलचक पार्श्वभूमी निर्माण करून ठेवली आहे ० तिचे ओझे त्यांना पेलवणार आहे का ? असो ०

लेखक: अरविंद विठ्ठल कुळकर्णी
संपर्क: 09619436244


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 


 

Previous Article

व्यंगनिबंधकार राज आणि मनसे

Next Article

ते डीएड चं जीवन:वादविवाद स्पर्धा

You may also like