Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

राहुल,बाळा ,तुला वास्तव कधी समजणार ? – अरविंद विठ्ठल कुळकर्णी

Author: Share:

दिल्लीत गेले दोन दिवस म्हणजे १७ आणि १८ मार्च दिवशी भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या  ८४ व्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरुन बोलतांना जवाहरलाल नेहरू ह्यांचे पणतू राहुल गांधी ह्यांनी व्यक्त केलेल्या विचाराचा समाचार घेतला पाहिजे ० राहुल गांधी ह्यांची पक्षप्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी केलेले हे पहिलेच मोठे भाषण आहे ० पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भात तासभर चाललेल्या ह्या भाषणाला विशेष महत्व आहे ०

राहुल गांधी ह्यांनी त्यांचा काँग्रेस पक्ष महाभारतातील पांडवांचे प्रतिनिधित्व करीत असून तो सत्याचा कैवारी आहे तर भाजप कौरवांप्रमाणे वागत असून त्याला कसेही करून केवळ सत्ता मिळवायची आहे , लोकांची सेवा करण्यात त्याला स्वारस्य नाही असे म्हटले आहे ० एक राजकीय विश्लेषक म्हणून मला ही तुलना तार्किकदृष्ट्या पुढे न्यावी असे वाटते ० पांडवांनी कौरवांकडे पाचच गावे त्यांच्या चरितार्थासाठी मागितली होती ० त्यांच्या आणखी काही मागण्या नव्हत्या ० परंतु सुईच्या अग्रावर राहील इतकीही भूमी पांडवांना देणार नाही अशी घोषणा कौरवांनी केली ० त्यांनी पांडवांच्या पत्नीची ,महाराणी पांचालीची विटंबना केली ० पांडवांना वनवासास पाठविले ० सुदैवाने साक्षात कृष्ण पांडवांचा मार्गदर्शक आणि सद्सद्विवेकबुद्धीचा रक्षणकर्ता  होता ० त्यांने पांडवांना कर्तव्य काय आणि तुष्टीकरण म्हणजे काय ह्याविषयीची गीता सांगितली ० झोप उडविली ,पुरुषार्थ जागा केला आणि युद्धास प्रवृत्त केले ० काँग्रेस पक्षाचा कृष्ण तेव्हा कोण होता आणि सध्या कोण आहे ?

इंग्रज राज्यकर्ते हा तेव्हा काँग्रेस पक्षाचा कृष्ण होता ० त्यानेच काँग्रेस पक्षाची १८८५ मध्ये स्थापना केली ० इंग्रजांच्या आदेशानुसार स्थापनावर्षातच काँग्रेसने अधिकृतपणे हिंदुत्वाचा त्याग केला ० त्यानंतर आजपर्यंत हिंदुत्वनिष्ठ संघटना , नेते आणि कार्यकर्ते ह्यांची विटंबना करणे , त्यांच्याविषयी सतत खोटानाटा प्रचार करीत राहून त्यांना देशोधडीला लावणे हा एकच कार्यक्रम काँग्रेस पक्ष राष्ट्रीय स्तरावर अत्यंत उत्साहाने राबवीत आला आहे ० जगातली कोणतीही शक्ती पाकिस्तानची मागणी रोखू शकत नाही , काँग्रेस कार्यकारिणीची तर ती हिंमत नाही ही मोहनदास गांधींची घोषणा आहे ० म्हणजे काँग्रेसचा कृष्ण जो राज्यकर्ता इंग्रज त्यांने आत्मरक्षणासाठी काँग्रेसला युद्धास प्रवृत्त केले नाही ० उलट मुस्लिम लीगच्या हातावर पाकिस्तानचे उदक सोडण्यास काँग्रेसला भाग पडले ० ह्या पापात हिंदुमहासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सहभागी झाले नाहीत ० म्हणून काँग्रेसने त्यांना आजपर्यंत शत्रूवत मानले ० फाळणी झाल्यावर पाकिस्तानात हिंदू स्त्रियांवर जगात दुसरीकडे कोठेही झाले नसतील असे बीभत्स अत्याचार झाले ० त्यावेळी हिंदू स्त्रियांनी हाका मारूनही काँग्रेस त्यांच्या रक्षणासाठी धावून गेली नाही ० मात्र  संघाच्या असंख्य स्वयंसेवकांनी आपल्या जिवावर उदार होऊन पाकिस्तानी गुंडांशी दोन हात केले आणि हिंदू स्त्रियांना आणि आबालवृद्धांना जमेल तसे सुखरूप भारतात आणण्याचे मिशन अंगावर घेतले आणि ते पार पाडून दाखविले ० हिंदूंनी अहिंसाव्रताचे पालन करावे, प्रतिकार करू नये असा उपदेश गांधींनी केला होता ० हिंदी राष्ट्र निर्मितीसाठी हिंदूंनी धीरोदात्तपणे आपल्या प्राणांचे बलिदान करावे ,

 

इतिहास त्याची दखल घेईल असे आवाहन आणि आशावाद गांधींनी व्यक्त केला होता ० परंतु संघाने असे हकनाक बलिदान उघड्या डोळ्यांनी पाहणे पसंत केले नाही ० त्यांनी संघर्ष केला आणि काँग्रेसने फसवून उघड्यावर टाकलेल्या हिंदूंना कोणीतरी वाली आहे हे सिद्ध केले ०  पुढे नेहरूंनी पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान ह्यांच्याशी संधी केला आणि उभयतांनी एकमेकांच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप करावयाचा नाही असे मान्य केले ० त्याचा व्यवहारात अर्थ असा झाला की भारतात मुसलमानांवर सतत अन्याय होत असल्याची खोटी टीका खरी वाटेल अशा अभिनिवेशाने  पाकिस्तानने प्रत्येक व्यासपीठावरून करावयाची पण पाकिस्तानात हिंदूंचा निर्वंश होत असतांनाही भारत सरकारने त्यांच्या साह्यासाठी धावून जावयाचे नाही ० नेहरूंच्या ह्या तटस्थतेच्या धोरणाने पाकिस्तानात हिंदूंवर होत असलेले शासकीय आणि अशासकीय अत्याचार आपल्याला कसे निमूटपणे पाहावे लागले आणि त्याचा आपल्याला कसा मानसिक त्रास झाला ते त्यावेळचे पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त श्रीप्रकाश ह्यांनी आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे ० हिंदुहिताविषयी उदासीनता की आत्मीयता हा काँग्रेस आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना ह्यांच्यातील गंभीर मतभेदाचा मुद्दा नेहमी राहिला आहे हे राहुल गांधी ह्यांनी कौरव-पांडव शब्दप्रयोग करण्यापूर्वी लक्षात घेतले पाहिजे ०

राहुल गांधी काँग्रेसला पांडवांच्या ठिकाणी बघतात ० म्हणून सांगितले पाहिजे की कौरव-पांडव महायुद्धात रामाच्या ३२ व्या पिढीने प्रत्यक्ष भाग घेतला होता ० तरी राम हे काल्पनिक पात्र आहे अशी भूमिका काँग्रेस पक्षाने रामजन्मभूमी वादात कशी काय घेतली ? काश्मीरवर पांडवांच्या वंशजांनी राज्य केले आहे  ० तरीदेखील काश्मीरचा काही भाग पाकिस्तानला भेट म्हणून द्यावा असे नेहरूंना का वाटले ? त्यासाठी भारताच्या समर्थ सैन्याला पाकिस्तानशी युद्ध करू नका असे नेहरूंनी युद्ध चालू असतांना आणि भारतीय सैन्याची सरशी होत असतांना मध्येच का सांगितले ? नेहरूंच्या प्रपौत्राला संधी मिळेल तेव्हा हा प्रश्न विचारावा लागेल आणि ह्याचे उत्तर मिळवावे लागेल ० आजही काश्मीर खोऱ्यात हिंदूंचा निर्वंश होत आहे ० त्यावर राहुल गांधींना काही बोलतांना कधी कोणी ऐकले आहे काय ? काँग्रेस सत्तेवाचून जगू शकत नाही ० सत्तेपासून वंचित राहावे लागत असल्याने आलेल्या नैराश्यातून राहुल गांधींनी कालचे भाषण केले असावे ० पाकिस्तानसारखी काही उलट्या काळजाची कृतघ्न राष्ट्रे सोडली तर अन्य राष्ट्रात राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष इतक्या बेशरमपणे पक्षाच्या अधिवेशनात बोलत असेल असे वाटत नाही०

सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली असा एक जुनाच आरोप राहुल गांधींनी केला आहे ० हा आरोप सिद्ध करता नाही तरीही काँग्रेसकडून तो पुनःपुन्हा केला जातो ० आमचे गांधींसारखे नेते कारावासात होते आणि भूमीवर झोपत होते त्यावेळी सावरकर ब्रिटिशांना पत्र लिहीत होते असे राहुल गांधी ह्यांचे वाक्य आहे ० त्यांचे मानसिक वय अजूनही लहान मुलासारखे आहे आणि त्यामुळे आपल्या बाष्कळ बडबडण्याने आपण आपल्या पक्षाला आणि आपल्या पूर्वजांना संकटात टाकीत आहोत हे त्यांच्या लक्षात येत नाही ० सावरकरांनी एकही माफीचे पत्र इंग्रजांना लिहिले नाही ;  लिहिले असते तर इंग्रजांनीच त्यातील आशय जगात सगळ्यांना माहीत होईल अशी व्यवस्था केली असती ० त्यांच्या राजकीय उद्दिष्टांच्या दृष्टीने तसे करणे त्यांना आवश्यकआणि शहाणपणाचे वाटले असते ० सावरकरांना दोन जन्मठेपेची म्हणजे ५० वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती ० तेथे सडत न राहता तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे हा त्यांचा हक्क होता ० त्यादृष्टीने इंग्रज सरकारशी बोलणी करणे ह्याला माफी मागणे म्हणत नाहीत ० वास्तव हे आहे की तत्कालीन राज्यकर्ते  शेवटपर्यंत त्यांना ब्रिटिश साम्राज्याचा सगळ्यात  मोठा आणि धोकादायक शत्रू समजत होते ० राजकारणात भाग घ्यायचा नाही ह्या अटीवर सावरकरांना रत्नागिरी जिल्ह्यात १९२४ ते  ३७ अशी तेरा वर्षे स्थानबद्ध करण्यात आले ०

सावरकरांनी समाजसुधारणांचा एरव्ही अशक्यप्राय वाटावा असा पर्वत उभा केला ० परंतु त्यांचे सशस्त्र क्रांतीचे आणि इंग्रजांविरुद्ध असंतोष संघटित करण्याचे अन्य प्रकारचे राजकारण त्या स्थानबद्धतेतही व्यवस्थितपणे चालू होते असे इतिवृत्त प्रत्येक दोन वर्षांनी सावरकरांच्या स्थानबद्धतेचा आढावा घेतला जाई  तेव्हा असे गुप्तहेरांकडून कळविले जात असे ० सावरकर कधीही बदलणार नाहीत , भारताहिताला प्रतिकूल आणि इंग्रजहिताला अनुकूल असे कधीही वागणार नाहीत अशा निष्कर्षाला राज्यकर्त्यांना यावे लागे आणि आणखी दोन वर्षांनी स्थानबद्धतेत वाढ होई ० भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातील सर्वोच्च पराक्रम, सर्वोच्च त्याग आणि सृजनशीलतेचा सर्वोच्च आविष्कार सावरकरांच्या नावावर जमा आहे ० विश्वासार्हता ह्या एकाच विषयावर गांधी,सावरकर आणि नेहरू ह्यांचे तौलनिक कर्तृत्व काय आहे ह्याची एकदा प्रगट चर्चा होऊन जाऊ  द्या ० म्हणजे कारागृहात सहकुटुंब कोण राहत होते , मद्यप्राशन कोणाला करता येत होते आणि आपला सख्खा भाऊ त्याच कारागृहात आहे ही बातमीही कोणाला काही वर्षे कशी कळू दिली गेली नव्हती असे धक्कादायक तपशील पुढे येतील आणि काँग्रेसवाल्यांना रस्त्यातून मान वर करून फिरणे कठीण होईल ०

नरेंद्र मोदी हे काँग्रेसचे मुख्य दुखणे आहे ० ह्या माणसाला कसलाही स्वार्थ नाही ० देशहित आणि लोकसेवा ह्यावाचून ह्या माणसाला दुसरे काही सुचत नाही ० एकाही दिवसाची रजा न घेता प्रतिदिवशी १८ तास हा माणूस काम करतो आणि अंथरुणाला पाठ टेकल्यावर काही मिनिटात त्याला गाढ झोप लागते ह्यामुळे अनेकांना निद्रानाश आणि बद्धकोष्टता असे विकार जडणे साहजिक आहे ० प्रत्येक मतदार हा उत्तम नागरिक असला पाहिजे आणि खासगी तसेच सार्वजनिक जीवनात त्याचा सहवास अन्यांना सुखकारक वाटेल अशा चांगल्या सवयी त्याने  प्रयत्नपूर्वक जोपासल्या पाहिजेत ह्यासाठी मोदींची वेगवेगळी अभियाने निष्ठांपुर्वक जोरात चालू आहेत ० स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकांना चांगल्या सवयी लावण्याचे अभियान लगेच हातात घ्यायला हवे होते ० पण राहुल गांधी ह्यांच्या पणजोबांना ते सुचले नाही ० १५ ऑगस्ट १९४७ चा लाल किल्ल्यावरचा स्वातंत्र्य सोहळा आटोपून नेहरू खाली उतरत होते ० त्यांच्या समवेत काका कालेलकर होते ० जिन्यामध्ये ठिकठिकाणी पान खाऊन थुकलेले दिसत होते ० नेहरूंनी काकांना विचारले की  ” हे काय आहे ? कालपर्यंत असे नव्हते ० ” काका म्हणाले की आपण स्वतंत्र झाल्याचे हे लालभडक लक्षण आहे ० नेहरूंनी बोध घ्यायला हवा होता  आणि स्वच्छता अभियान सुरु करायला हवे होते ० पण त्यांना जागतिक राजकारणात अधिक रस होता ०त्यामुळे लोकांची मानसिकता बदलावी असे त्यांना वाटले नाही ०

 

नेहरू पंतप्रधान म्हणून अलिगढ मुस्लिम विद्यापीठात विद्यार्थ्यांसमोर भाषणासाठी गेले होते ० रामायण-महाभारताचा ऊर्जस्वल वारसा आपल्याला मिळाला ह्याचा मला अभिमान वाटतो असे तेथे नेहरू म्हणाले ० त्यावर विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आणि उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला नाही ० नेहरूंच्या ठिकाणी मोदी असते तर दुसऱ्या दिवशी त्यांनी शिक्षणमंत्र्याला बोलावून अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारताविषयी आपुलकी वाटेल ह्यासाठी काय करता येईल ह्याची चर्चा केली असती ० मग रामजन्मभूमीचा प्रश्न इतका प्रदीर्घ काळ अनिर्णीत राहू शकला नसता ० नरेंद्र मोदी हे भारतीयांची मानसिकता सकारात्मक आणि विजिगीषू करू पाहत आहेत ० इंग्रजांनी हिंदूंकडून त्यांचे राष्ट्रीयत्व काढून घेतले ० हिंदूंच्या मनात त्यांच्या पूर्वजांच्या कर्तृत्वाविषयी संशय निर्माण केला ०

त्यांना अकर्मण्यवादी बनविले ० त्याचवेळी त्यांनी मुसलमानांच्या राजकीय महत्वाकांक्षा अमर्याद फुलविल्या आणि ते हिंदूंशी शांततामय सहजीवनास होकार देणार नाहीत ह्याची व्यवस्था केली ० मोदींना हे बदलायचे आहे ० ब्रिटिशांनी केलेल्या व्यवस्थेत ज्यांचा स्वार्थ दडलेला आहे त्या सर्व वर्गांचा मोदींना विरोध आहे आणि तो वाढणार आहे ० मोदींना विरोध प्रामुख्याने दलालांचा आहे ० ज्यांचे उत्पन्नाचे घाणेरडे स्रोत बंद झाले त्यांना मोदी डोळ्यासमोर नको आहेत ० सामान्य माणसाला मात्र मोदी हवे आहेत ० हा माणूस आपल्या बारीकसारीक सुखाचाही विचार करील आणि फसवणार नाही ह्याची त्याला निश्चिती पटली आहे ० तथापि दलालांचा वर्ग एखाद्याविषयी अपसमज पसरविण्यात पटाईत आहे ० त्याचे काही दाखले राहुल गांधींच्या भाषणात मिळतात का पाहू ०

मोदी भगवान नाही असे राहुल गांधी म्हणाले ० लोकांच्या ऐहिक सुखात भर पडेल आणि त्याने राष्ट्राच्या संसाधनात वाढ होईल अशा प्रकारे विधायक दृष्टीने सतत काम करीत राहण्याची मोदींची वृत्ती लोंकाना भुरळ पाडते ० म्हणून ते चुका करू शकतात असे लोकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न राहुल गांधींसारख्या नेत्यांकडून होत असतो ० मोदींचा निस्पृहपणा लोंकांना अतिशय आवडतो ० विजयालक्ष्मी , इंदिरा,राजीव,संजय,सोनिया आणि राहुल ही नावे सोडाच पण  जवाहरलाल नेहरूंनी आपल्या जवळच्या आणि लांबच्या शंभराहून अधिक नातेवाईकांना आपल्या पदाचा दुरुपयोग करून सरकारी सेवेत सामावून घेतले होते ० ती नावे प्रसिद्ध झाली होती ० मोदींचा एकही नातेवाईक त्यांच्या पदाचा उपयोग करून घेतांना दिसत नाही ० हे राहुल गांधी ह्यांचे मुख्य दुखणे आहे ०

युवकांना रोजगार हवा असतांना मोदी त्यांना योगासने करायला सांगतात अशी टीका राहुल गांधी ह्यांनी केली ० रोजगार आणि योग ह्यांची सांगड घालायची आवश्यकता नव्हता ० दोन स्वतंत्र विषय आहेत आणि योगाची सवय शरीराच्या आणि मनाच्या संतुलनाच्या  दृष्टीने चांगली आहे ० तथापि  मुसलमान आणि काही प्रमाणात ख्रिस्ती समाज योग आत्मसात करायला त्यांच्या धर्मगुरूंच्या सांगण्यावरून उत्सुक नाही ० म्हणून त्यांना भडकावण्यासाठी योगाविषयी काहीबाही बोलण्याचे धाडस ते करीत आहेत ० रस्त्यावरून फिरणारे सामान्य काँग्रेस कार्यकर्ते आणि हेलिकॉप्टर मधून फिरणारे काँग्रेस नेते ह्यांच्यातील भिंत तोडून सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या जवळ जाण्यास आपण सहकार्य करणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले ० तसे असेल तर स्वतः: राहुल गांधींनी लगेच पक्षाध्यक्षपद सोडले पाहिजे आणि अन्य योग्य आणि तरुण व्यक्तीची निवड  केली पाहिजे ०  नेहरू कुटुंबातील व्यक्तीवांचून काँग्रेस पक्ष चालू शकणार नाही असे मानसिक पांगळेपण काँग्रेस पक्षाला आले आहे ० ते पक्षालाच नव्हे तर देशाला  घातक आहे ० राजीव गांधींचा मुलगा ,इंदिरा गांधींचा नातू आणि जवाहरलाल नेहरूंचा पणतू ह्यांवाचून आपल्यात असे काय गुण आहेत की काँग्रेस पक्षाने आपले नेतृत्व मान्य करावे हा प्रश्न राहुल गांधींनी अंतर्मुख होऊन स्वतःला विचारला पाहिजे ० वर्षानुवर्षे काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम  करणारे,प्रशासनाची माहिती असणारे आणि सकारात्मक विचार करू शकणारे कितीतरी कार्यकर्ते काँग्रेस पक्षात असतील ० त्यांना नेतृत्वाची संधी मिळाली पाहिजे ० नेहरू कुटुंबीय हा एकच गुण प्रमाण मानून एखाद्याला पक्षात सर्वोच्च पदावर नियुक्त करणे हा लोकशाहीचा आणि असंख्य सत्पात्र कार्यकर्त्यांचा म्हणजे भारताच्या सृजनशक्तीचा अपमान आहे ०

काँग्रेस पक्ष हा विचार आहे आणि संघ तसेच भाजप केवळ संघटन आहे असे वक्तव्य राहुल गांधींनी केले ० काँग्रेसचा विचार देशघातक आहे हे लक्षात आल्यावर डॉ हेडगेवारांनी संघाची स्थापना केली हे लक्षात ठेवले पाहिजे ० गांधींनी स्वातंत्र्य आंदोलन बाजूला सारून खिलाफत चळवळ सुरु केली ० त्यातून मोपल्यांचे बंड झाले ० हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले ० गांधींनी काँग्रेसला त्या अत्याचाराचा निषेध करू दिला नाही ० मोपल्यांना संरक्षण दिले ० तेव्हा काँग्रेसकडून हिंदूंहिताला वाऱ्यावर सोडले जाणार हे ओळखून संघाने दैनंदिन शाखेचे काम सुरु केले ० आज भारतातील सगळ्यात मोठी सेवाभावी संघटना म्हणून संघ लोकांना माहीत झाला आहे ० शाखेचा वटवृक्ष झाला आणि त्याच्या छत्रछायेखाली हिंदू संस्कृती आणि हिंदूंचे भवितव्य सुरक्षित झाले असल्याचा विश्वास कोट्यवधी नागरिकांना मिळत आहे ० काँग्रेसचा विचार एकात्मतेला बाधक आहे ० मुसलमानांच्या फुटीरतावादावर काँग्रेसकडे लांगूलचालनावाचून दुसरे उत्तर नाही ० सबका साथ सबका विकास  ह्याचा अर्थ संघ आणि भाजप मुसलमानांना परके समजत नाही तर  त्यांना बरोबर घेऊनच पुढची मार्गक्रमणा  होणार आहे ० काँग्रेसला हे परिवर्तन नको आहे ० काँग्रेसला मुसलमान हे मुसलमानच राहायला हवे आहेत ० मोदींना ते लवकरात लवकर भारतीय व्हायला हवे आहेत ० मुसलमानांनाही तेच हवे आहे ० तीच काँग्रेसची आणि राहुल गांधींची पोटदुखी आहे ० काँग्रेसने गांधींचे आणि नेहरूंचे दैवतीकरण करण्याचा सरकारी खर्चाने खटाटोप केला ० त्यांना मोदींना लोक आपला उद्धारकर्ता मानत असतील तर ते कसे सहन होईल ? अधिक काय लिहिणार ?  असो ०

– अरविंद विठ्ठल कुळकर्णी

 

 

Previous Article

मर्ढेकरांच्या कविता

Next Article

चवदार तळ्याचा महाड सत्याग्रह (२० मार्च १९२७)

You may also like