Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

भारतीयत्वाच्या बाता, राहुलजी, तुम्ही मारू नका !

Author: Share:

असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 


राहुल गांधी ह्यांना त्यांच्या मातोश्रींनी काँग्रेसचे अध्यक्ष केले आहे ० पण आता त्यांना पंतप्रधान व्हावयाचे आहे ० प्रत्येक नागरिकाला पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा बाळगता येते ० त्यात चूक नाही ० पण आपण विशिष्ट घराण्यात जन्माला आलो एव्हढ्या एकाच भांडवलावर आपणास पंतप्रधान होता येईल अशी लालसा फोपावू देणे ह्यात लोकशाही व्यवस्थेशी द्रोह आहे ० राहुल गांधी ह्यांना पंतप्रधान व्हायचे आहे पण लोकांशी संवाद साधण्याचे जे कौशल्य नगरसेवकापाशी किंवा ग्रामपंचायतीच्या सभासदापाशी असते तेही राहुलना अजुन संपादन करता आलेले नाही ० “माझी आई इटालियन आहे पण अनेक भारतीयांपेक्षा ती अधिक भारतीय आहे हे त्यांचे अलीकडील विधान उदाहरणादाखल घेऊ ० कर्नाटक विधानसभेच्या १२ मेला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत एका प्रचार सभेत बोलतांना ते आणखी असे म्हणाले की माझ्या आईने भारतासाठी पुष्कळ त्याग केला आहे ० अतोनात सोसले आहे ०

सोनिया गांधी इटालियन असल्या तरी अनेक भारतीयांपेक्षा त्या अधिक भारतीय आहेत हे वाक्य उच्चारतांना राहुलना ‘गॉस्पेल ट्रूथ’ सांगत असल्याचा साक्षात्कार झाला असेल पण काही लाचार काँग्रेसजन सोडले तर बाकीच्या समस्त भारतीयांना ते वाक्य किती अपमानास्पद वाटले असेल ह्याची काँग्रेस अध्यक्षांना कल्पना येणार नाही ० म्हणून भारतीयत्व म्हणजे काय ह्याविषयी राहुल ह्यांचा अध्ययन वर्ग घेण्याचा प्रत्येक भारतीयाला हक्क आहे ० ह्या वर्गात राहुल ह्यांनी काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत ० पहिला प्रश्न म्हणजे राजीव गांधींशी लग्न झाल्यावर किती वर्षांनी सोनियांनी भारताचे नागरिकत्व आपण स्वीकारले पाहिजे हा विचार सुरु केला ०

भारताचे नागरिकत्व स्वीकारले नसतांना किती वर्षे त्या भारताच्या पंतप्रधानांच्या अधिकृत शासकीय निवासस्थानात सर्वत्र संचार करीत ठसक्यात राहत होत्या ० अशाच परिस्थितीत भारतीय मुलीला इटलीच्या पंतप्रधानांकडे राहता आले असते का ? “जर राहता येणार नसेल तर सोनियाजींनी जे काही केले तो त्याग नव्हता तर भारतीयांच्या अति सहिष्णू वृत्तीचा त्यांनी लाभ उठविला असे म्हणावे लागेल ० त्याकरिता जर अभिनंदन करायचेच असेल तर ते भारतीय जनतेचे करावे लागेल ० पण त्यागाच्या वगैरे गोष्टी करून भारतीय जनतेकडून कोणत्याही प्रकारचे श्रेय उपटण्याचा विचारही राहुल ह्यांनी मनात आणणे चूक ठरेल ० कारण नागरिक नसतांना परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांच्या अधिकृत शासकीय निवासस्थानी सर्व काही पाहता येईल आणि ऐकता येईल अशा प्रकारे मुक्काम ठोकणे ह्याला इतर देशात काय म्हणतात हे राहुल ह्यांना माहीत करून घेता येईल ० इंदिरा गांधींच्या निधनानंतर इटलीला परतण्याचा विचार सोनियाजी करीत होत्या का ह्या प्रश्नाचेही उत्तर दयावे लागेल ०

सोनियाजींनी भारतासाठी पुष्कळ सोसले आहे , त्याग केला आहे असे राहुल ह्यांचे म्हणणे आहे ० सासू इंदिरा गांधी आणि पती राजीव ह्यांची निर्घृण हत्या झाली ह्याकरिता त्या कुटुंबाचे सभासद म्हणून सोनियाजींना जे दु:ख सोसावे लागले त्यात सगळा भारत त्यावेळी सहभागी झाला आहे ० जे सोनियाजींच्या वाट्याला आले ते दु:ख कोणाच्याही वाट्याला येऊ नये अशीच प्रार्थना भारतीयांनी देवापाशी केली आहे ० ते दु:ख मोठे आहेच ० पण एक लक्षात ठेवले पाहिजे की ह्या राजकीय हत्या आहेत ० त्यांना कार्यकारणभाव आहे ० त्या इतिहासाच्या भाग झाल्या आहेत ० त्या दु:खाचे भांडवल ठरावीक मर्यादेपेक्षा अधिक सोनियाजींना करता येणार नाही ० ते अप्रशस्त ठरेल ० कारण त्या त्यागाची भरपाई कितीतरी अधिक प्रमाणात त्यांना मिळाली आहे ०

भारताचे पंतप्रधानपद आपल्याला मिळावे अशी सोनियाजींची इच्छा होती ० त्यादृष्टीने त्यांनी त्यावेळी हालचालही केली होती ० शेवटच्या क्षणी काही शहाण्या लॊकांनी त्यांनी पंतप्रधान होण्यात जे अवाढव्य आणि अतिरेकी अनौचित्य दडलेले होते ते त्यांच्या लक्षात आणून दिले त्यामुळे सोनियाजींना तो विचार सोडून द्यावा लागला असे सांगितले जाते ० पण त्याने काही बिघडले नाही ० त्या सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा झाल्या ० प्रदीर्घ काळ पडद्याआडून त्यांनी भारताचे मध्यवर्ती सरकार चालविले ० ह्या काळात भ्रष्टाचाराचे महाघोटाळे झाले ० त्याविषयी सोनियाजींनी खेद व्यक्त केलेला नाही ० उलट भारतीय जनतेला मूर्ख समजून औद्धत्य प्रगट करण्याची संधी त्यांनी सोडलेली नाही ०

ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशहितावाचून दुसरा विचार केला नाही, देशसेवेसाठी सर्वस्व समर्पित अशा तरुण आणि उच्च विद्याविभूषित हजारो प्रचारकांची तेजस्वी परंपरा निर्माण केली, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक समरसता खोलवर रुजविण्याचा विडा उचलला आणि विविध समाज घटकांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी नवनिर्माणाचे अगणित प्रकल्प देशभर उभे केले, ज्या संघात कधी जात विचारली जात नाही त्या संघावर निरर्गलपणे घाणेरडे आरोप करताना सोनियाजींची सद्सद्विवेकबुद्धी कधी विचलित झाली नाही ० तरीही सर्वसामान्य भारतीयांची त्यांच्याप्रती असणारी वागणूक नेहमी आदरपूर्वकच होती ० परंतु भारतीय मानसिकता किती विशाल आहे ह्याची जाणीव त्यांना झाली असे दिसले नाही ० त्यांना आता राहुलला पंतप्रधान करायचे आहे ० भारतीयांच्या सोधिकपणाचा किती लाभ उठवायचा त्यांचा विचार आहे ? ज्याअर्थी आपली आई इटालियन असूनही अनेक भारतीयांपेक्षा अधिक भारतीय आहे असे राहुल बोंबलून सांगत आहेत त्याअर्थी त्यांना आपल्या चुका कळल्या असतील असे वाटत नाही ० म्हणून केवळ कायद्याने नव्हे तर अंत:करणाने भारतीय होणे राहुल आणि त्यांच्या मातोश्री ह्यांना शक्य आहे काय ह्याचा विचार करू ०

सोनियाजी इटालियन असूनही भारतात राहिल्या म्हणून अनेक भारतीयांपेक्षा त्या कितीतरी अधिक भारतीय आहेत हे राहुल सांगत आहेत ० म्हणून त्यांना विचारायचे आहे की बाळा ,मग तू का वर्षातले सहा महिने परदेशात अज्ञात स्थळी दडलेला असतोस ? तुला भारत आवडत नाही का ? सोसण्याविषयी राहुल गांधी बोलतात ० तेव्हा त्यांना सांगितले पाहिजे की देशाचे विभाजन होतांना हिंदू स्त्रियांवर जे अनन्वित अत्याचार झाले ते फाळणीचे संकट पेलण्यास नेहरू असमर्थ ठरले म्हणून ना ? नेहरूंनी त्याहीवेळी देशाची क्षमा मागितली नाही ; पुढेही नाही ० सोनियाजींना त्या अत्याचारांची माहितीही नसावी ० भारतीयांच्या जिव्हारी लागलेल्या अशा कितीतरी गोष्टींची सोनियाजींना माहितीही नसावी ० तरीही त्या’ अधिक भारतीय ‘ आहेत असे आम्हाला ऐकविले जात आहे० नेहरू परिवारातील बाकीच्या सदस्यांचा भारतीयत्वाशी किती संबंध आहे ते वानगीदाखल पाहू ० नेहरूंचे माध्यमिक शिक्षणही लंडनला केम्ब्रिजला झाले ० ते भारतीय विद्यार्थ्यांपेक्षा इंग्लिश विद्यार्थ्यात अधिक रमत ० त्यांना भारतातून जाणाऱ्या पत्रात स्वातंत्र्य चळवळीचा उल्लेख असेल तर ती पत्रे त्यांच्यापर्यंत वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांकडून पोचू दिली जात नसत ० नेहरू तेथे शिकत असतांनाच मदनलाल धिंग्राने करझन वायलीची हत्या केली ० त्याकरिता त्याला फाशी झाली ० त्या घटनेने लंडनमधील वातावरण ढवळून निघाले ०

भारतात देशभक्तीची मोठी लाट उसळली ० हौतात्म्याच्या पवित्रतेने वातावरण भारून गेले ० पण विद्यार्थी नेहरू अलिप्त राहिले ० ते कारागृहात, इतर भारतीय विद्यार्थी गेले त्याप्रमाणे, मदनलालला भेटावयाला गेले नाहीत ० त्यांच्या आत्मचरित्रात मदनलालचा उल्लेख नाही ० नेहरू पंतप्रधान झाल्यावर राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद ह्यांनी त्यांना आवाहन केले की नेहरूंनी पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी परदेशी पाहुणे भेटावयास येतील तेव्हा दुभाष्या उपस्थित ठेवून त्यांच्याशी हिंदीत संभाषण करावे ० त्यामुळे हिंदीला राष्ट्रभाषा करण्याच्या दृष्टीने प्रतिष्ठा प्राप्त होईल ० नेहरूंनी हिंदी तेव्हढी प्रगल्भ भाषा नाही असे सांगून ती कल्पना मोडून काढली ० पंतप्रधान असतांना नेहरू अलिगढ मुस्लिम विद्यापीठात पदव्युत्तर स्नातकांसमोर भाषण करण्यासाठी गेले होते ० तेथे त्यांच्या लक्षात आले की सर्वसामान्य हिंदूला रामायण-महाभारताविषयी जेव्हढी आत्मीयता वाटते तेव्हढी त्या विद्यार्थ्यांना वाटत नाही ० परंतु तसे परिवर्तन व्हावे म्हणून नेहरूंनी पुढे काही केल्याचे दिसले नाही ० सोरटी सोमनाथाच्या मंदिराचा सरदार पटेलांनी जो जीर्णोद्धार केला त्याला राष्ट्रपती राजेंद्रप्रसादांनी, भारतीय संघराज्य सेक्युलर असल्यामुळे, जाऊ नये असा आदेश नेहरूंनी काढला ० तो न मानता आणि हा केवळ जीर्णोद्धार नसून’ राष्ट्रीय पुनरुत्थानाचा क्षण’ आहे असे सांगून राजेंद्रप्रसाद त्या समारंभाला उपस्थित राहिले ० तेव्हा त्यांनी तेथे केलेले भाषण आकाशवाणीवरून प्रसृत होणार नाही अशी व्यवस्था नेहरूंनी केली ०

वंदे मातरम राष्ट्रगीत होऊ नये म्हणून नेहरूंनी किती सबबी सांगितल्या ० ते बॅण्डवर वाजत नाही अशी एक सबब त्यांनी सांगितली तेव्हा संगीतकलानिधी मास्तर कृष्णराव ह्यांनी त्यांना पोलिसांच्या बॅण्डवर ते वाजवून दाखविले ० पण नेहरूंनी निर्णय बदलला नाही ० कोणत्या अधिकारात नेहरूंनी काश्मीरचा मोठा भूभाग पाकिस्तानला देऊन टाकला ? कोणत्या अधिकारात नेहरूंनी पटेलांना तुम्ही काश्मीर प्रश्नात लक्ष घालू नका असे सांगितले ? कारण काश्मीर ही आपली खाजगी मालमत्ता आहे असे त्यांना वाटत होते ० त्याच अधिकारात आपल्याला पंतप्रधान व्हावयाचे आहे असे राहुल गांधी सांगत आहेत ० ही घमेंड, हा मालकी हक्क मोडायला हवा ०

त्यापेक्षा राहुलजींना एक सूचना करावीशी वाटते ० त्यांनी नॅशनल हेराल्ड हे नेहरूंनी सुरु केलेले, नंतर बंद पडलेले आणि ज्याची मालकी सध्या सोनियाजींकडे आहे असे दैनिक पुन्हा सुरु करावे आणि पाच वर्षे नीट चालवून दाखवावे ० ते जमले तर सार्वजनिक जीवनात उतरण्याचा त्यांनी विचार करावा ० अन्यथा त्यांच्या परदेश वाऱ्या त्यांनी चालूच ठेवाव्या आणि मस्तपैकी खुशालचेंडूचे जीवन जगावे ० अधिक काय सांगणार ?

लेखक: अरविंद विठठल कुळकर्णी
संपर्क: ०९६१९४३६२४४


असे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज 

www.facebook.com/SmartMaharashtraOnline 


Previous Article

कर्नाटकात कमळ फुलणार…

Next Article

त्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप?

You may also like