Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

डॉ रघुनाथ अनंत माशेलकर  

Author: Share:

जन्म: १ जानेवारी १९४३

रघुनाथ माशेलकर यांचा जन्म माशेल, गोवा येथे झाला. लहानपणी पित्याचे छत्र हरवल्यानंतर त्यांच्या आईने अतिशय प्रतिकूल परिस्थितीतुन जिद्दीने शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. राज्यातून अकराव्या क्रमांकाने शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठातून १९६६ मध्ये रासायनिक अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. १९६९ मध्ये त्यांनी पीएचडी झाले. युनिव्हर्सिटी ऑफ सॅल्फोर्ड, लंडन आणि डेन्मार्क मध्ये विद्यापीठदेखील अध्यापनाचे काम त्यांनी केले.

१९८९ मध्ये पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत संचालक म्हणून नेमणूक झाली. त्यांच्या प्रयत्नामुळे भारतीय शास्त्रज्ञांचे अनेक शोध अमेरिका आणि युरोपमध्ये निर्यात होत आहेत. त्यानंतर त्यांची कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च या संशोधन संस्थेचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेथे ते अजूनही कार्यरत आहेत. संशोधनाच्या माध्यमातून देशाच्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानातील प्रगतीसाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी असंख्य संशोधक निर्माण केले आहेत.

डॉक्टरांचे नाव सर्वसामान्यांना अधिक सुपरिचित आहे ते त्यांनी हळद, बासमती तांदूळ आणि कडुनिंब या भारतीय कृषी वस्तूंचे बौद्धिक संपदा हक्क भारताकडे सुरक्षित ठेवण्याच्या लढ्यामुळे. हळद, बासमती तांदूळ व कडुनिंब यांवरील संशोधन आणि त्यांवर भारतीयांचा असणारा परंपरागत हक्क अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि पुराव्यांसह मांडून त्यांची पेटंट अमेरिकेच्या हाती जाऊ दिली नाहीत. त्यापुढे, भारताचे बौद्धिक ज्ञानसंपदेचे धोरण ठरवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. जिनिव्हा येथे भरलेल्या जागतिक बौद्धिक ज्ञानसंपदा संघटनेच्या माहिती तंत्रज्ञान विषयक समितीत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आणि या समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे.

त्यांनी शंभरच्या वर शोधनिबंध लिहिले आहेत. त्यांची वीस पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांना अनेक मानसन्मान आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून त्यामध्ये १९९१ ची पद्मश्री, २००० चा पदमभूषण, २००१ साली मिळालेला शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार २००३ मध्ये महाराष्ट्र भूषण हे महत्वाचे पुरस्कार समाविष्ट आहेत. याशिवाय, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुरस्कार, २००२ सालचा प्रियदर्शनी ग्लोबल ॲवॉर्ड यांचा समावेश आहे.

१९९८ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीने त्यांना फेलोशिप देऊ केली, अमेरिकन नॅशनल एकेडमी ऑफ सायन्सेस ने सुद्धा त्यांना मानद सल्लागार म्हणून २००५ मध्ये नियुक्त केले. हा सन्मान मिळणारे ते सातवे भारतीय आहेत.

वैज्ञानिक क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांनी नाव कमावले आहे, ते नाव मराठी आहे, याचा आपल्याला सार्थ अभिमान हवाच. त्यांच्या पाउलांवर पाऊल टाकून अजून मराठी वैज्ञानिक निर्माण झाले पाहिजेत, आणि डॉक्टर माशेलकरांसारखाचा आपल्या ज्ञानाचा राष्ट्रकार्यासाठी वापर केला पाहिजे.

डॉक्टरांच्या ७५ व्या जन्मदिनी स्मार्ट महाराष्ट्र तर्फे मानाचा मुजरा!

संदर्भ: मराठी विश्वकोश

Previous Article

शरद जोशी समजून घेताना : प्रारंभ

Next Article

१ जानेवारी 

You may also like