पुस्तक दिन

Author: Share:

सोशल मिडियाच्या जगात हल्ली आपल्या हातुन बर्याच गोष्टी सुटत चालल्या आहेत. त्यातील एक म्हणजे पुस्तक. खर तर वाचनाची गरजच कुणाला वाटू लागलेली नाही. माणुस पैशांच्या मोहापायी त्याला पैशांशीवाय दुसर काही दिसत नाही. सद्ध्या तीच एक आवश्यक गोष्ट माणुन माणुस त्याच गोष्टीकडे लक्षदेवुन आहे. पैसा मुल्यवाढत असताना हीच एकमेव संपत्ती आहे, असं मानणे तसे फारच चुक आहे. ज्यांच्याकडे भरपुर पुस्तक असतात त्यांना पुस्तकाचा त्यांच्याकडे संग्रह असतो त्यांना आपण खरे श्रीमंत का म्हणू नये.

काही लोकांना पुस्तकांच्या संग्रहाचा छंद असतो पण महाराष्ट्रातील एक गाव असे आहे त्या गावात पुस्तकांचा संग्रह आहे. ते गाव म्हणजे सातारा जिल्हातील भिलार गाव.भारतातील पहील पुस्तकांच गाव म्हणुन ओळखल जाणार हेगाव. ह्या गावात तब्बल 15000 पुस्तकांचा संग्रह आहे. ह्या गावात 25 ठिकाणी पुस्तक वाचणाचे स्थान निश्चीत केले. साहीत्य, कविता, पर्यावरण, लोक, महीला, आत्मकथा अशी पुस्तक उपल्बध आहेत. पुस्तकांची गाव योजना ब्रिटनच्या वेल्स शहरातील हे ऑन वे ने प्रभावीत आहे.

वस्तुत :वाचन आणि पुस्तके या दोहोंना जीवनात फार महत्वाचे स्थान आहे. 23 एप्रिल हा दिवस जागतीक पुस्तक दिन म्हणुन साजरा केला जातो. लेखकांकडून सामान्य जनतेला प्रवृत्त करण्यासाठी साजरा केला जातो. मिग्युएल डी सर्वेंट्स नावाच्या लेखकाला श्रध्दांजली म्हणुन सर्वप्रथम 1923 मध्ये स्पेनमध्ये हादिवस साजरा करण्यात आला. मिग्युएल डी सर्वेंट्स यांची ही पुण्यतिथी होय. जागतिक पुस्तक दिन आणि प्रकाशन दिन साजरा करण्यासाठी 1995 मध्ये युनेस्कोने प्रथम तारीख निश्चित केली.

सर्वच जन हा दिवस साजरा करु शकतात. बाजारपेठत जावुन किंवा पुस्तकालयात जावुन हा दिवस आपण साजरा करु शकतो. ज्या दुकानात प्रसिद्ध लेखकांची पुस्तक असतात तेथे ही पुस्तक दिन साजरा होतो. लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणुन बरेच प्रयत्न केले जातात.

वाचनालय हा एकमेव स्रोत पुर्वी होता, पण हल्ली ऑनलाइन ई पुस्तक मिळायला लागलीत. बरेच ठिकाणी बुकस्टॉल लावून पुस्तक विकले जातात. बरीच ऑनलाईन संकेतस्थळे हल्ली पुस्तक विक्रीची काम करताय. पुस्तक थेट घरपोच पोहचण्याचेही दुर्गम भाग ज्याठिकाणी पुस्तक मिळणार नाही तेथे पुस्तक पोहचवली जातात. पण महत्वाचे म्हणजे वाचन संस्कृती टिकवली पाहीजे. आपण वाचाल तर वाचाल हाच संदेश पुस्तक दिना निमित्त देवू इच्छीतो.

@ विरेंद्र सोनवणे
8888244883


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


Previous Article

पुस्तका… पत्रास कारण की…

Next Article

माझी(च) मानसिकता

You may also like