विसरभोळ्या शहरांच्या यादीत पुणे सातव्या क्रमांकावर !

Author: Share:

पुणेकरांवर नेहमीच अनेक विनोद होत असतात. असाचं एक विनोदी विक्रम पुणेकरांच्या नावावर आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या सुशासनाच्या यादीत पुण्याचा देशात पहिला नंबर लागला होता.परंतू आता आलेल्या नव्या सर्वेक्षणात पुण्यातील लोक विसरभोळे असल्याचं समोर आलयं.

कॅब सेवा देणाऱ्या उबर या कंपनीने लॉस्ट अॅंड फाउंडस इंडेक्स नावाने एक सर्वेक्षण केलं आहे. यातं सर्वाधिक विसराळू शहरांच्या यादीत पुणे सातव्या क्रमांकावर आहे, तर बंगळुरुने पहिला क्रमांक पटकावला आहे.

टॅक्सीत प्रवासा दरम्यान कोणत्या शहारातील लोकं आपल्या वस्तू विसरतात, या आधारावर हा सर्वेक्षण केला गेला. सकाळी ६ व दुपारच्या जेवणानंतर लोक सर्वाधिक वस्तू विसरतात असेही या सर्वेक्षणातून समोर आलयं.

Previous Article

 ७३ अंकांनी वाढून सेन्सेक्स ३२९९६.७६ वर बंद

Next Article

अॅट्रोसिटी कायद्याबद्दल सरकारी अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा !

You may also like