Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

पु. भा. भावे ह्यांच्या फाळणीवरील कथांचे रविवारी पार्ल्यात अभिवाचन

Author: Share:

 

मुंबई: भाषाप्रभू पु भा भावे स्मृती समितीच्यावतीने भाव्यांच्या फाळणीवरील निवडक कथांचे आणि लेखांचे अभिवाचन येत्या रविवारी २० ऑगस्टला सायंकाळी ६.०० वा. स्वातंत्र्यवीर सेवा केंद्र, सनसिटी चित्रपटगृहासमोर, जैन मंदिराशेजारी, विले पार्ले पूर्व येथे आयोजित करण्यात आले आहे.

भाव्यांच्या ३७ व्या पुण्यतिथी निमित्ताने होणाऱ्या ह्या कार्यक्रमात ओमप्रकाश शिंदे (खुलता कळी खुलेनामधले डॉ विक्रांत), धनश्री करमरकर, सुबोध सुर्वे, संजीव तांडेल, प्रेरणा निगडीकर आणि अरविंद कुळकर्णी सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. भावे समिती गेली ३७ वर्षे प्रबोधनाच्या आणि मनोरंजनाच्या माध्यमातून भावे साहित्याच्या प्रसाराचे काम यथाशक्ती यथामती निष्ठेने करीत आहे.

Previous Article

हिंदुत्ववाद आणि हिंदुधर्मवाद

Next Article

२६/११ सारख्या हल्ले थांबवण्यासाठी महत्वाचे पाऊल: तटरक्षक दलासाठी ३१,७४८ कोटी मंजूर

You may also like