प्रा.सुरेश नारायणे यांना गोदारत्न पुरस्कार जाहीर

Author: Share:

नांदगाव (प्रतिनिधी) – नाशिक परिसर वृत्तपत्र लेखक संघातर्फे देण्यात येणारा गोदारत्न हा मानाचा पुरस्कार साहित्यीक,व्याख्याते,व सामाजिक कार्यकर्ते प्रा.सुरेश नारायणे यांना जाहिर झाला. पुरस्कार वितरण नाशिक येथे सार्वजनिक वाचनालयाच्या लिमये सभागृहात ११ सप्टेंबरला होणार आहे.

शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष कैलास कोते पाटील, आमदार सीमा हिरे ह्यांच्या उपस्थितीत दिला जाणार आहे अशी माहीती संघाचे अध्यक्ष रमेश कडलग यांनी दिली विविध वर्तमान पत्रात सामाजिक लेखन, व व्याख्यानांद्वारे सामाज प्रबोधन व जनजागृतीचे कार्य लक्षात घेवुन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे मविप्र संस्थेचे अध्यक्ष तुषारदादा शेवाळे, सरचिटणीस निलीमाताई पवार,सभापती माणिकराव बोरस्ते, नांदगाव तालुका संचालक दिलीपदादा पाटील, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागिय सल्लागार सुनिल मालपाणी, राज्यप्रकल्प अधिकारी डी.डी. शिंदे आदिंनी प्रा. नारायणे यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे

Previous Article

कम्युनिष्ठ विचारधारा अन हत्या…

Next Article

नांदगाव-न्यु.इंग्लिश स्कुल येथे शिक्षकदिन संपन्न

You may also like