Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

पहलाज निहलानी सेन्सॉर बोर्डावरून कट: प्रसून जोशी फिल्म सेन्सॉर बोर्डाचे नवीन अध्यक्ष

Author: Share:
फिल्म प्रमाणीकरण बोर्ड अर्थात सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून पहलाज निहलानी यांची टर्म पूर्ण होण्याआधीच उचलबांगडी करण्यात आली असून गीतरचनाकार प्रसून जोशी नवीन अध्यक्ष असतील. विद्या बालन, वामन केंद्रे, विवेक अग्निहोत्री, नरेंद्र कोहली नवीन सदस्य होऊ शकतात.
नहलानी यांची तीन वर्षांची टर्म जानेवारी २०१७८ मध्ये पूर्ण होत होती. दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि निर्माते प्रकाश झा यांची नावे सुद्धा अध्यक्षपदाचं चर्चेत होती असे म्हटले जाते.
पहलाज निहलानी यांचं विरोधात अनेक निर्मात्यांची तक्रार होती. ते बरेच कट्स सुचवतात, अशी तक्रार अनेक निर्मात्यांनी केली होती. त्यांच्या सहकार्यांच्याही काही तक्रारी असण्याची वृत्ते आहेत. त्यामुळे हे पाऊल उचलले गेले असेल अशी शक्यता आहे.
यावर काही निर्मात्यांनी, प्रसून जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आता अधिक सुरळीतपणे सेन्सॉरप्रक्रिया पार पडेल अशी प्रतिक्रिया दिल्याचे समजते.
Previous Article

पहिली जागतिक मराठी परिषद (१२ ऑगस्ट १९८९)

Next Article

यूपीएससी परीक्षा 

You may also like