प्रश्नमंजुषा

Author: Share:

आमच्या मध्ये क्रिडामहोत्सवाचं भुत संचारत चाललं होतं. मग यात ज्या विविध स्पर्धा होत्या.त्या प्रत्येक स्पर्धेत सहभागी होणं भाग होतं. त्यामुळं की काय? आम्ही एकही स्पर्धा न सोडता हिरीरीनं भाग घेत होतो. त्या स्पर्धेत बाजी मारता येवो की न येवो.

आमच्या काँलेजमध्ये सात मुली त्यातही एक काँलेजात न येणारी. त्यामुळे सहाच उरलेल्या. त्या सहा मुली सहा दिमाखाच्या.या सहा मुलीमध्ये ही एकजुटता नव्हती. शितल, जया अर्चुचा एक गट तर रजनी वैशु आणि योगीचा एक गट असे दोन गट. त सं पाहिल्यास ह्या सहाही मुली बोलायच्या एकमेकांशी. पण त्यांचं फारसं पटत नव्हतं. तसा विचार केल्यास दहा पुरुष परवडले.पण एक महिला परवडत नाही म्हणतात.

आता आम्ही पाहतो आहोत महिलांवर अत्याचार होतात. पण एक महिला जी करु शकते.ते पुरुष करीत नाही फक्त ती ताकद असावी.

स्रीयांनी शिवबा घडविला. भीमराव घडविला.तिनं देश चालविला. बांग्लादेश बनविला. एवढी ताकद स्रीयात असते.ती ताकद या अजीत च्या बहिणीतही होती. आम्ही काँलेजला जेव्हा जात असु तेव्हा एकंदर पाहणीवरुन सांगतो की आमच्या काँलेजमधील या मुली पुढे होवुन काहीच करु शकत नव्हत्या. क्रिडामहोत्सवामध्ये ही कोणती धमाल केली नाही. पण त्यांच्या पासुन जी प्रेरणा मिळाली ती वाखाणण्याजोगी आहे.

दहा मुलांनी जरी हे काम तु चांगले करतोस असे जरी म्हटले तरी आपल्याला प्रोत्साहित झाल्यासारखे वाटत नाही. उलट तो अपमान वाटतो.तसे उलटे उत्तर आपणच त्या माणसाला देवुन मोकळे होतो. याउलट एखाद्या मुलीने जर प्रोत्साहन पर एक प्रशंसात्मक उद्गार काढला तर आपली छाती दिड इंच फुगून येते. अंगावर मुठभर मांस चढल्यासारखे वाटते.


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


ती किमया आमच्या वर्गातील या मुलींना चांगली जमत होती.कोणाला केव्हा कसं उचलुन धरावं.कोणाला केव्हा पाडावं यात या मुली माहीर होत्या. त्यांच्या प्रशंसोद्गारानेच आम्ही क्रिडामहोत्सवामध्ये विजय हासील केला होता.

आज प्रश्नमंजुषा स्पर्धा होती. सेवासदन डी एड काँलेजच्या हालमध्ये खुर्च्या लावलेल्या होत्या.सहा सहाचे गट पाडले होते. सहाव्या क्रमांरावर आमच्या काँलेजमधील दोन मुलं एक सहारे आणि दुसरी पांडे.पांडे हुशार होती.पण सहारे…..तरीही सहारेची वर्णी लागली होती.

सहारे तेवढा हुशार वाटत नव्हता. पण या क्रिडामहोत्सवानं दाखवुन दिलं की सहारेही काही कमजोर नाही.तोही हारी बाजी जीत सकता है।
एकाकडे सेवासदनला प्रश्न मंजुषा स्पर्धा सुरु होती. तर दुसरीकडे मैदानावर मैदानी स्पर्धा सुरु होत्या. त्यामुळे प्रश्नमंजुषा स्पर्धेचा थरार अनुभवता आला नाही. पण एक मात्र निश्चित की या ठिकाणी ही आमच्या मुलांनी बाजी मारत तिसरा क्रमांक पटकविला व दोन गुण मिळविले.

पहिला नंबर ज्या चमुचा आला ते सेवासदन काँलेज ब-याच फरकानं समोर होतं. त्याच्यामुळं त्यांचा पहिला क्रमांक आला होता.शेवटचे दोन मिनिटं राहिले होते. बाजुच्या यमुनाबाईला एक गुण जास्त होता.अशावेळी प्रश्न दारात ऊभा. उत्तराची वाट पाहात. जसा सावकार कर्जासाठी दारात येतो तसा…..वेळ न दवडता सहारेनं बेल वाजवली.तसा इशारा होताच उत्तर विचारलं गेलं तर उत्तर बरोबर निघालेलं.पाहातो काय तर वेळ संपलेली आणि सामना समसमान झालेला. यमुनाबाई आणि महाराष्ट्र अध्यापक दोघेही सारख्या गुणावर. आता काय करावे?शेवटी दोघांपैकी कोण विजेता हे ठरविण्यासाठी आणखी एक प्रश्न विचारण्याचं ठरविलं गेलं. प्रश्न होता, “सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?” जसा आयोजकांनी प्रश्न विचारला.तसे आपण जिंकलो पाहिजे या इराद्याने घंटी वाजविली गेली.सहारे आणि पांडेची उत्तराप्रती गुंतागुंत. एक म्हणत होता महात्मा फुले तर दुसरा म्हणत होता राजा राम मोहन राय.सारखी गुंतागुंत. मग वैशु हुशार. उत्तर वेगळंच होतं.पण वैशु हुशार असल्याने सहारेला थोडं कन्फ्युजन असल्याने वैशुचं उत्तर बरोबर असेल असं त्याला वाटलं.त्यामुळे की काय पांडे चं उत्तर प्रमाण मानुन सहारे उत्तर दिलं. राजा राम मोहन राय. उत्तर चुकलं होतं. पण तरीही आम्ही हारलो होतो.

मला मात्र या निकालाचं आश्चर्य वाटते की सहारेनं दिलेलं उत्तर जरी चुकलं असलं तरी याने प्रयत्न केला होता उत्तर देण्याचा. पण बाजुची यमुनाबाई चुक की बरोबर हे उत्तर न देताही जिंकली कशी? कदाचित महाराष्ट्र काँलेजच्या द्वेष करणा-या मंडळींनी महाराष्ट्र अध्यापक विद्यालय हारावं यासाठी तर साजिश केलेली नव्हती. तरीही आमचा विजयरथ कोणी रोखु शकला नाही.आम्ही आमच्या पुढील काळात अनेक स्पर्धेमध्ये चुरस दाखवत पुढे जात राहिलो व चँम्पीयन शिप हासील केली.
आजही जेव्हा जेव्हा ही चँम्पीयन शिप आठवते. तेव्हा चेह-यावर त्या आठवणीचे रोमांच उभे राहतात. एकमेकांचे सहकार्य आजही आठवते. त्या मुलींचे दोन गट जरी असले तरी क्रिडामहोत्सवामध्ये त्यांनी केलेली एकी आठवते नव्हे तर स्पर्धेसाठी त्यांनी ही केलेली प्रयत्नांची पराकाष्ठाही आठवते.

आम्ही प्रश्नमंजुषा हारलो असलो तरी त्या प्रश्नमंजुषेत मिळालेल्या दोन गुणाच्या भरवशावर व त्याच्या योगदानावर आम्हाला चँम्पीयन शिप जिंकता आली. जणु त्या दोन गुणांनी आमच्या चँम्पीयन शिप जिंकण्याला मदत केली होती. यामुळे क्रिडामहोत्सवामध्ये सहारेचेही योगदान होते हे विसरुन कसे चालेल.

आज ही सहारे मिशीवर ताव देत असतो..कदाचित मीही चँम्पीयन शिप मध्ये योगदान दिले आहे असे तर तो सांगत नाही. असे पदोपदी वाटते. कदाचित हेच सत्य आहे आणि हा राजही आहे त्याच्या मिशी वाढविण्याचा……हेही आपल्याला लक्षात घेण्यासारखे आहे.

लेखक: अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५०


असे दर्जेदार साहित्य वाचण्यासाठी आमचे पेज LIKE आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/


 

Previous Article

इस्राईलच्या राजकारणाकडे बघताना

Next Article

आधुनिक हिरकणी

You may also like