Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

गरिबी आणि न्यू इंडिया एकमेकांना पूरक नाहीत- राष्ट्रपती

Author: Share:

भारत उद्या ७० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना २०२२ पर्यंत भारताला ‘न्यू इंडिया’ करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. ‘न्यू इंडियामध्ये गरिबीला कोणतेही स्थान नसेल,’ असे राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात म्हटले.

आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांचे आपल्यावर ऋण आहेत. आपण त्यांना विसरू शकत नाही. त्यांनी ज्या त्यांच्या स्वप्नासाठी बलिदान दिले अशा देशाचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम्ही मला रक्त द्या हा नारा दिला, आणि लाखो भारतीय त्याने प्रेरित होऊन स्वातंत्र्यलढ्यात उतरले. नेहरू, सरदार पटेल, डॉकटर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाची संस्कृती आणि धरोहर घडवण्यासाठी प्रयत्न केल्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात केला.

स्वच्छ भारत अभियान, जीएसटी, नोटाबंदी अशा नवीन शासनाच्या योजनेचे कौतुक करताना ‘२०२२ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील. तोपर्यंत देशातील सर्व घरांपर्यंत वीज पोहोचायला हवी. चांगले रस्ते, रेल्वेचे जाळे, दळणवळणाच्या सुविधा यांचा वेगाने विकास व्हायला हवा अशी अपेक्षा व्यक्त करताना राष्ट्रनिर्माणाच्या या प्रक्रियेत सर्व देशवासियांनी सक्रीय सहभाग घ्यायला हवा असे आवाहन त्यांनी केले.

शासन कायदे बनवेल पण, आपल्याला प्रत्येकाला कायद्याचे पालन करणारे नागरिक होऊन कायद्याचे पालन करणारा समाज घडवावा लागेल. शासन जीएसटी लागू करीत आहे, पण आपल्याला प्रत्येकाला उद्योग संस्कृतीत आणि दैनंदिन व्यवहारात त्याला रुजवावे लागेल.

‘संवेदनशील समाजात स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जात नाही. यासोबतच धर्माच्या आधारेदेखील भेदभाव केला जाऊ नये. कुपोषणाची समस्या संपवण्यासाठी प्रयत्न आवश्यक असून प्रत्येक भारतीयाने स्वत:च्या क्षमतांचा विकास करायला हवा. देशाच्या प्रत्येक नागरिकाने स्वत:च्या प्रगतीसाठी प्रयत्न करावेत.  देशवासियांनी कुटुंबासोबत समाजाचा विचार करायला हवा. सर्वांनी मिळून अशा देशाची निर्मिती करावी, जिथला प्रत्येक नागरिक सुखी असेल अशा भावना व्यक्त केल्या.

Previous Article

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला श्रीलंकादहन

Next Article

महाराष्ट्राच्या ४१ पोलिसांना राष्ट्रपती पदक

You may also like