विकृती आणि त्याच विकृत राजकारण

Author: Share:

विकृत लोकांच्या विकृतीला बळी पडणार्या निष्पाप मुली ज्यांना कुठलीच समज नसलेल्या देवाघरची ही निष्पाप फुले ह्या रांटी जनावरांचा राक्षसांचा बळी जाताय. देवाचाही थरकाप उडववून देणारी ही रांटी जनावरं राक्षसी प्रवृतीची ही माणूकीला काळीमा फासणारी ही जणावरं समाजात मुळीच राहण्याच्या लायकिची नसतात.

तरी ह्या विकृतीच मुळ शोधुन ह्यावर प्रतिबंधात्मक उपाय करायला हवा.जेणे करुन ही जणावरं शोधली जातील अन त्याच्यावर योग्य तो उपचार होउन पुढे घडणारी घटणा थांबता येईल.कायदातर व्हावाच कठोरातल्या कठोर पण त्याबरोबरीने ह्याही उपाय योजनांची गरज.

ह्या अशा घटना घडल्यावर विरोधक आधी आक्रमक होतात. त्यांना आयत खाद्य मिळत, सत्ताधार्यांना वेठीस धरायला. घटनेच गांभीर्य नसलेला तो विरोध, गरम तव्यावर आपली पोळी भाजण्याचा तो प्रयत्न. ह्या असल्या राजकारणाची किव येते.कॉंग्रसने काढलेल्या त्या मेणबत्ती मोर्चात खुद पक्षाच्या अध्यक्षांची बहीण प्रियंका गांधीलाच धक्का बुक्की होते. राहुल साहेब स्वताच मोर्चात हसताना दिसले. नक्की तुम्ही मोर्चा घटनेच्याच निषेधार्थ काढला होता का ? हाच प्रश्न उपस्थित होतो. प्रियंकाजींना झालेली ती धक्काबुक्की निषेध करण्यासारखीच.

विकृत घटनेचही विकृत राजकारण होतय .विकृत लोकांना कुठलाही धर्म नसतो.ह्या अतीसंवेधनशील घटनेच वेगवेगळ्या पद्धतीने निष्कर्ष काढणे तेवढेच धोक्याचे असते. विकृतीच कधीही समर्थन होऊ शकत नाही.

विकृती निर्माण होण्याचे बरीच कारण असु शकतील. विकृत लोकांची मानसीकता, संतुष्टी नसलेली,बाल पणाच्या चुकांमुळे विकृतीची आग हळु हळु ज्वालामुखीचे रुप धारण करते. ह्या आगीत निष्पाप बाल वयातल्या मुली भस्मसात होतात .कठुआ ची निर्भयाची अशा घटना होतच राहतात त्याला कारण तेच विकृत लोकांची विकृत मानसीकता, संतुष्ट नसलेली ही आग. मानसोपचार तज्ज्ञांना संशोधन करण्याची गरज.लोकांनी असली मानसिकतेची लोक ओळखुण लगेचच दक्षता घेत माहीती देण्याची गरज.प्रबोधन होऊन मुलींना याविषयी जागृत कराव . मुलीना शासनाने मोफत प्रशिक्षण द्यायला हवेत. जेणेकरुन ह्यामुली स्वत:लढू शकतील. कुणा विकृत व्यक्तीची नजर ह्या बघीणीवर नाही पडणार, त्यावाघीणी सारख्या लढल्या पाहीजे. जागृत लोकांनी अतिदक्ष राहण्याची गरज.

लेखक: विरेंद्र सोनावणे

Previous Article

साधनेशिवाय कलाकार घडत नाही : कीर्ती शिलेदार

Next Article

विकासाच्या नावाखाली शहरे निसर्गाला गिळंकृत करताहेत : डॉ. अनिल अवचट

You may also like